"स्वप्नपुर्ती" च वर्ष....

 २०१० सरलं...नवीन वर्ष नवे संकल्प....आयुष्याच्या वाटेवर अशीच वर्षे सरत जातात पण त्यातील काही आयुष्यभरासाठी आपल्या मनावर कोरली जातात.कारण त्या वर्षात तुम्हाला जे हव ते मिळालेल असत किंवा नशीबाचं घोड चौखुर उधळल्यामुळे अवघी सुखं तुमच्या पायाशी लोळण घेत असतात.

आयुष्यातले स्ट्रगल्स, स्वप्न साकार करण्यासाठी अनुभवलेले कटु क्षण किंवा असा एक काळ असतो की प्रत्येक गोष्टीसाठी आपल्याला झगडाव लागत.अन जर तो संघर्ष मोठा असेल तर त्यानंतर मिळाणार्‍या यशाचं सुख हे अवर्णनीय असतं.

असच काहीसं या वर्षात झाल...माझ्यासाठी तर २०१० म्हणजे स्वप्नपुर्तीच वर्ष आहे.या वर्षाने मला खुप अविस्मरणीय अशा आठवणी दिल्या आहेत.

या वर्षात मला माझ्या आयुष्याची जोडीदार मिळाली...करीअर मध्ये बर्‍याच स्ट्रगल नंतर मला हवा असणारा माइल स्टोन गाठता आला..अन याहुन सर्वात मोठ म्हणजे माझ लहानपणापासुन पाहिलेल स्वप्न तब्बल अडीच वर्षांच्या धडपडीनंतर साकार झाल ते म्हणजे माझ्या आइ बाबांसा्ठीच घर.

माझ्या आई अन बाबांनी अवघ्या १० बाय १० च्या खोलीत तब्बल १८ वर्षे संसार केला. तेव्हाच लहानपणी मनाशी निश्चय केला होता आई - बाबांसाठी एक घर भेट देईन. अन त्या घराच नाव असेन स्वप्नपुर्ती

आज आम्ही भावंड जे काही आहोत ते केवळ आई अन बाबांमुळेच ...आयुष्यात त्यांनी आमच्यासाठी खुप सार्‍या तडजोडी स्वीकारल्या त्याही अगदी आनंदाने.लहान असताना त्याच महत्व कधीच कळाल नाही पण जस जस मोठ होत गेलो व्यवहाराची जाण आली तस त्यांच्या सारख्या तडजोडी करण्यासाठी किती धैर्य लागत याची जाणीव झाली.

१५ मे ला म्हणजे माझ्या लग्नाच्या एक दिवस अगोदर जेव्हा आई-बाबांनी गृहप्रवेश केला तेव्हा त्यांच्या चेहर्‍यावरील असलेलं समाधान पाहिल अन भरुन पावलो.त्या संपुर्ण दिवस जेव्हा जेव्हा त्यांचे शिक्षक सहकारी घर पाहण्यासाठी यायचे तेव्हा डोळ्यात माझ्यासाठी असलेला अभिमान ,चेहर्‍यावरील समाधान ही माझ्या आज पर्यंतच्या आयुष्यातील सर्वात मोठी कमाइ होती.तेव्हा मनात एकच भावना होती आई बाबा ही फ़क्त सुरुवात आहे ....आजपर्यंत आमच्यासाठी तुम्ही जी काही सुख नाकारली ते प्रत्येक सुख मी तुम्हाला देइन.अजुन खुप करायच आहे तुमच्यासाठी...तुम्ही माझ्यासाठी जे कष्ट घेतलेत त्यापुढे माझ हे कर्तृत्व खुप कमी आहे.

घराच स्वप्न साकारायला मी डिसेंबर २००७ मध्ये सुरुवात केली होती. सुरुवातीला अगदी सोप वाटणार काम किती कठीण आहे एका आठवड्यात लगेच समजल कारण माझ्या समोरील प्लॉट वाल्याने अतिक्रमणाची खोटी केस लावली.ते प्रकरण निस्तरायला मला सहा महिने गेले.कधी नव्हे ते कोर्टाची पायरी चढलो.आता तरी काम पटकन होईल अस वाटत असताना बांधकाम कंत्राटदाराने त्रास द्यायला सुरुवात केली. मी फ़क्त शनिवार -रविवार साईट वर जायचो इतर दिवशी गावाकडील मित्र त्यांना शक्य होइल त्याप्रमाणे साइटवर जायचे याचाच त्याने गैरफ़ायदा घेउन त्रास द्यायला सुरुवात केली.चांगुलपणाची सर्व कपडे उतरवुन जेव्हा धतिंगपणा केला तेव्हा कुठे तो नीट काम करायला लागला.

त्यातही काम करताना मी भरपुर वेळा तोडफ़ोड केली.सोमवार ते शुक्रवार तो काम करायचा अन शनिवार-रविवार मी गेल्यावर बर्‍याचदा त्याला तोडायला लावायचो.कारण मी दिलेल डीजाइन दिलेल एक असायच अन त्याने बांधलेल वेगळच असायच. अस तोड फ़ोडीत काम आपल चालु होत.अशे २-३ महिने गेले अन मी वैतागुन नोकरी सोडण्याचा निर्णय घेतला.दुसर्‍या चांगल्या कंपनीत कमी पगारावर जॉइन केल. अर्थात सहा महिन्यानंतर मला हवी असलेली सॅलरी मिळेल या अटीवर.

जुन्या कंपनीमध्ये जिथे मी अगदी पोटतिडकीने काम करुन कंपनी वाढवली त्यांनीच माझे सर्व पैसे बुडवले.आर्थिक दृष्ट्या तो मला खुप जोरात झटका बसला.आता नवीन जॉब असल्यामुळे कर्ज पण नाही हक्काची कमाइ पण नाही.पुन्हा एकदा सहा महिने काम बंद करण्याची वेळ आली.

नव्या कंपनीत प्रोबेशन पुर्ण केल अन लगेच कर्जासाठी अर्ज केला.नव्या कंपनीने सुध्दा त्यांचा शब्द पाळला नाही.त्या दरम्यान मंदी असल्यामुळे माझ्याकडे काहीच पर्याय नव्हता.परत काम चालु करायला मला दोन महिने लागले.कासवाच्या गतीने मी घराच काम सुरु केल.ऎन पावसाळा असल्याने काम तस हळु हळु चालु होत.२००९ च्या दिवाळीपर्यंत  स्लॅब अन सर्व बांधकाम झाल आता फ़िनीशिंग चालु होणार तेव्हाच मला तीन महिन्यासाठी इजिप्तला  जाव लागंणार होत.त्या दरम्यानच माझी विकेट पण पडली.सर्व गोष्टी एका वेळीच सुरुवात झाली होती. पण फ़क्त काही झाल तरी हरायच नाही अन खचायच तर बिलकुल नाही हेच फ़क्त मनात होत.

हे काय कमी होत..पुढ अजुन एक मोठ संकट माझ्या समोर उभ राहिल...मी कैरोला असताना बाबांना अ‍ॅटॅक आला अन त्यांची अ‍ॅन्जिओप्लास्टी करावी लागली.आता मात्र मी खचलो होतो.माझ्यासाठी तो खुप कठीण काळ होता.तेव्हा केवळ मित्रांच्या आधारामुळेच उभा राहु शकलो.यावर ही पोस्ट पण लिहली होती.

या सर्व घटनातच २००९ संपल अन २०१० सुरु झाल अन सार काही बदलल....जानेवारी मध्ये मी परत आलो.....आर्थिक अडचण पण सुटली होती त्यामुळे काहीच अडथळा नव्हता...पुन्हा एकदा नव्या जोमाने काम सुरु केल...अवघ्या तीन महिन्यात मी संपुर्ण घर पुर्ण केल. . . १६ मे ला लग्न झाल. . . .मग माझ्यासाठी माझ जगच बदलुन गेल.

जुलै मध्ये कंपनीवाल्यांना उपरती झाली अन माझ्याबाबतीत झालेली चुक मान्य करीत माझ पॅकेज अनपेक्षीत रितीने अपडेट केल.सार कस सुरळीत झाल. . . .मागच्या वर्षातील दिवस आठवले की खुप समाधान मिळत.
थोडक्यात काय "घर पाहाव बांधुन अन लग्न पाहाव करुन" अशे दोन्ही पण अनुभव मी एकाच वेळी घेतले. :)

तुमचा पण एक दिवस असतो...कधीही सतत दुःख किंवा सतत सुख अस कधीच नसत....दुःख तुम्हाला पचवता आल पाहिजे अन सुख जमिनीवर पाय ठेवुन जगता आल पाहिजे.(ही भाषा खुप गोड वाटते ना...अहो सुख मिळाल की माज करायचा नाही. . आता समजल ना ;) )

आता २०११ च स्वागत करायच पुन्हा एक नव स्वप्न,नवी उमेद , नवी आशा घेउन. . . . अन अर्थात मनमौजी पणे आयुष्याचा प्रत्येक क्षण जगयाच.

पुण्यात गाडी चालवायची आहे का????

प्रसंग क्रमांक १:

स्थळ : कात्रज सर्पोद्यान.

मी आणि मित्र पुण्याच्या बी.आर.टी. वर बौ्द्धिक करत चाललो होतो. सर्पोद्याना समोरील चौकात गतिरोधक आल्यामुळे मित्राने दुचाकीचा वेग कमी केला. अन क्षणात पाठीमागुन येणार्‍या एका महान दुचाकीस्वाराने धडक दिली. काही समजायच्या आत मी रस्त्यावर अन मित्र दुचाकी सोबत घसरत पुढे जाउन पडला.आमची काही चुक नसतानाही आम्हाला न मागता चांगलाच प्रसाद मिळाला होता.

प्रसंग क्रमांक २

स्थळ : के.के. मार्केट चौक

सकाळी नेहमीप्रमाणे हाफ़िसात निघालो होतो..के.के.मार्केटच्या चौकात बिबवेवाडीकडे जाण्यासाठी लाल दिवा पेटल्याने थांबलो.हिरवा दिवा पेटताच उजवीकडे वळुन मी आपला मार्गस्थ झालो. तोच समोर एक काकु सिग्नल तोडुन माझ्यासमोर  आली. धडक वाचवण्यासाठी मी ब्रेक लावले तोच पा्ठीमागुन येणार्‍या चा्रचाकी वाल्याने माझ्या गाडीच हलकसंच चुंबन घेतल.एवढ होऊनही काकु काहीही न घडल्याच्या अविर्भावात साळसुदपणे निघुन गेल्या.

हे मागील काही महिन्यातील मला आलेले अनुभव...तसा गाडी चालवण्याच्या बाबतीत मी म्हणजे कासव आहे.आमचा स्पीड ४०-४५ च्या पुढे कधीच जात नाही.

एकदंरीत आता तुमच्या लक्षातच आल असेल पुण्यात गाडी चालवण म्हणजे सर्वात मोठ दिव्य आहे. एकवेळ तुमच्याकडे गाडी चालवण्याचा परवाना नसला तरी चालेल पण अष्टांगअवधानी असणं अत्यंत गरजेचे आहे.कारण फ़क्त आभाळातुन सोडल तर इतर कोणत्याही दिशेने ्म्हणजे समोरुन, पाठीमागुन, उजवीकडुन, डावीकडुन अन असतील नसतील त्या फ़टीतुन कधी कोण घुसेल हे कोणीच सांगु शकत नाही.

पुण्यातील वाहनचालकांच्या काही सवयी व समज :

१. रस्त्यावरील सिग्नल म्हणजे हे केवळ रस्ता सजावटीसाठी आहे.
२. ३० सेकंदाचा सिग्नल जर पाळला तर महाप्रलय होऊ शकतो त्यामुळे पिवळा/लाल सिग्नल दिसताक्षणी शक्य तितक्या वेगाने मिळेल त्या फ़टीतुन दुचाकी ही पळवलीच पाहिजे.
३.बी.आर.टी. ट्रॅक किंवा सायकल ट्रॅक यामधुन गाडी चालवणे हा त्यांचा जन्मसिध्द हक्क आहे.
४. समोर वाहतुकीची कोंडी झालेली आहे मार्ग निघु शकत नाही अश्या वेळी आजुबाजुच्या जनतेच्या मनोरंजनासाठी आपल्या दुचाकीचा भोंगा जोरात वाजवलाच पाहिजे.
५. झेब्रा क्रॉसिंगच्या अलीकडे गाडी थांबवणे हे अतिशय कमीपणाचे अन अडाणीपणाचे लक्षण आहे त्यामुळे गाडी ही झेब्रा क्रॉसिंगच्या पुढे किंवा त्यावरच थांबवली गेली पाहिजे.
६.सिग्नलला थांबल्यानंतर एकाजागी सिग्नल सुटण्याची वाट पाहण्याऎवजी मिळेल त्या कोपर्‍यातुन आपली गाडी काढण्याचा प्रयत्न करायचा.
७.एका कानाला मोबाईल लावुन,मान तिरकी करुन गाडी चालवण्यात खर शौर्य आहे.
८. नो एन्ट्रीचा फ़लक दिसत असला तरी त्यातुन गाडी घातलीच पाहिजे त्यात खर थ्रिल आहे अन वर कोणी एखादा ओरडला तर त्याच्यावरच शिरजोरी करायची.
९.जर चारचाकी असेल तर मध्ये रस्त्यातच उभी करुन चितळेंच्या किंवा तत्सम दुकानात जाउन निवांतपणे खरेदी करायची भले तिकडे कितीही ट्रॅफ़िक जॅम झाला तरी चालेल.
१०.हेल्मेट हे फ़क्त फ़ट्टु किंवा भित्री लोक वापरतात.

पुण्यात गाडी चालवताना यांच्यापासुन सावधान:

१. पी.एम.टी. : गाडी चालवताना पी.एम.टी. जेव्हा कधी पुढे किंवा मागे येते तेव्हा मला नेहमी ती एका अजस्त्र अजगरासारखी वाटते की जो भुकेला आहे अन कधीही तुमची शिकार करु शकतो. शक्यतो गाडी चालवताना पी.एम.टी.च्या जवळपास पण भटकु नका कधी तुमची शिकार होइल हे सांगता येणार नाही. पी.एम.टी. अगदी सन्मानाने जाउन द्यायच अन मग आपण निघायच.

२. पुणेरी काकु (यात मुली सुध्दा आल्या बरं का) : यांना इंडीकेटर, हॉर्न या प्रकारांची अ‍ॅलर्जी असते. त्यामुळे या जर आजुबाजुला असतील तर कधी टर्न करतील हे साक्षात ब्रम्हदेवपण सांगु शकत नाही. यांनी चुकुन कधी इंडीकेटर दिला तरी जरा जपुनच कारण डावीकडचा इंडीकेटर देउन उजवीकडे वळण्याचा पराक्रम फ़क्त पुण्यातच होतो.

३.रिक्षावाले: पुणेकर रिक्षावाले काका हे पुण्यातील रस्तांचे अनिभिषक्त सम्राट म्हणा किंवा वतनदार म्हणल तरी चालेल.स्वतः चुक करतील अन वर तुम्हालाच सुनावतील.हे पण रस्त्यात प्रवाशी घेण्यासाठी किंवा प्रवाशी उतरवण्यासाठी केव्हाही थांबु शकतात. सिग्नल पाळण्याच कोणतही बंधन यांच्यावर नसतं.रस्ता कोणताही असो त्याचे मालक हे हेच असतात.

४.पुणेरी खड्डे: पुणे तिथे काय उणे या उक्तीनुसार पुण्यातील रस्त्यांवर खड्ड्यांची कमतरता नाही. पुण्यात असा एकही रस्ता नाही की ज्यावर खड्डा नाही.पुण्यात एकसारखा सलग रस्ता तुम्हाला सापडुच शकत नाही, सतरा पक्षांची खिचडी करुन ज्याप्रमाणे सरकार उभारणी साठी आघाडी केली जाते त्याप्रमाणेच पुण्यात पण अशेच रस्ते आढळतील. कॉंक्रीट, डांबरी, पेवांग ब्लॉक अश्या सर्व प्रकारचे रस्ते एकाच वेळी तुम्हाला आढळतील.त्यामुळे शक्यतो खड्ड्यांमधुन जो काही थोडा फ़ार रस्ता असतो त्यावरुन गप गुमान आपली गाडी चालवायची.

५.पुणेकर पादचारी: चौकातुन गाडी चालवताना यांच्यापासुन जरा जपुनच राहयच.एखाद्या बगीच्यामध्ये आपण ज्याप्रमाणे फ़ेरफ़टका मारतो अगदी त्याप्रमाणेच रहदारीच्या रस्त्यावर हे मुकतपणॆ बागडत असतात.चुकुनही यांच्या मार्गात येउ नका (ते तुम्हाला आडवे आले तरी) नाही तर अस्सल पुणेरी फ़टके मिळतील.अन अश्यावेळी तुमच्यावर तोंडसुख घ्यायला हौशे,गवशे,नवशे अशे सगळे सामील होतील.

थोडक्यात काय तर पुण्यात गाडी चालवायची असेल तर तुम्हीच तुमच्या जीवनाचे रक्षक हे लक्षात ठेवा नाही तर कधी तुम्हाला मुक्ती मिळेल हे कोणी सांगु शकत नाही.

दिपावलीच्या हार्दिक शुभेच्छा!!

तेजोमय झाला आजचा प्रकाश, जुना कालचा काळोख,
लुकलुकणाऱ्या चांदण्याला किरणांचा सोनेरी अभिषेक,
सारे रोजचे तरीही भासे नवा सहवास,
सोन्यासारख्या लोकांसाठी खास,

दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा!



 

दसर्‍याच्या हार्दिक शुभेच्छा ! ! !



ब्लॉगच्या सर्व वाचकांना व मित्रपरीवाराला विजयादशमीच्या हार्दिक शुभेच्छा!!

शुभेच्छापत्र वेबदुनिया वरुन साभार.

मुस्कान...

मुस्कान....टपोरे डोळे...गोरी पान...चेहर्‍यावर अतिशय गोड हसु... अवघी ९ वर्षाची चिमुरडी.. अगदी बाहुली सारखी.. पाहिल्याबरोबर कोणीही प्रेमात पडेल इतकी गोड...परवाच्या दिवशी लिलावती हॉस्पीटलमध्ये भेटली.पोटाचा कॅन्सर झाल्यामुळे त्यावरील उपचार सध्या तिथे चालु आहे...अवघ्या काही महिन्यांची सोबती आहे.

सतत काही ना काही बडबडत असते. पुर्ण वॉर्डमध्ये सर्वांसोबत काही ना काही गप्पा चालु असतात.प्रत्येक नर्स, वॉर्ड बॉयला हुकुम सोडत असते.एका हाताला टोचलेल्या सुया तश्याच घेउन सगळीकडे फ़िरत असते. आपल्याला काही तरी असाध्य असा रोग झालाय याची तिळमात्रही कल्पना नसलेली...स्वतःच्या एक वेगळ्या अश्या विश्वात रमलेली...प्रत्येकाच्याच चेहर्‍यावर काही क्षण का होइना सर्व दुःख विसरायला लावुन "आनंद" देणारी ही मुस्कान.

आपण काही महिन्यांचेच सोबती आहोत याची तिला कल्पना सुद्धा नाही...जीवन म्हणजे काय अन मृत्यु म्हणजे काय??हे समजण्या्चही तिच वय नाही. अश्या वयातच तिच्या नशिबी हे भोग आले आहेत.तिची आइ हे सार दुःख पचवुन ही उभी आहे.कारण बाप नसलेल्या मुस्कान ला फ़क्त तिचाच काय तो आधार आहे.
परवाच्या रात्री तिला रक्ताच्या बॉटल अन इंजेक्शन देताना पाहिल अन मन अगदी सुन्न झाल.तिच्या छोटुकल्या हातांवर जेव्हा सुया टोचत होते तेव्हा मनाला असंख्य अश्या वेदना होत होत्या.मी नाही पाहु शकलो हे सार....तिथुन उठुन थेट बाहेर येउन बसलो ते असंख्य अशे प्रश्न घेउनच की ज्यांची उत्तर मला कधीच मिळणार नाहीत.


ती संपुर्ण रात्र मी खुर्चीवर बसुन काढली...चेहर्‍यावर समोर फ़क्त मुस्कानचाच चेहरा होता...सकाळी  तिच्या चेहर्‍यावर असणार गोड हसु उपचारादरम्यान अगदी कोमेजुन गेल होत.

तिला डेअरी मिल्क खुप आवडत म्हणुन दुसर्‍या दिवशी सकाळी कॅडबरी घेउन आलो. तिला जेव्हा ती कॅडबरी दिली तेव्हा ती इतकी आनंदी झाली की बस्स....एका छोट्याश्या कॅडबरीतही एवढा आनंद सामावलेला असतो हे मला तेव्हाच समजला.जगातला सर्वात मोठ सुख मिळाल्याचा आनंद होता तो....त्या एका क्षणाने मी अंतःर्मुख झालो.
तिच्या अगदी समोरच्याच बेडवर एक अंदाजे ८०-८५ वर्षांचे आजोबा अगदी जर्जर अवस्थेत पडले होते.प्रत्येक गोष्टीसाठी त्यांना दुसर्‍यावर अवलंबुन राहव लागत होत.होणार्‍या प्रत्येक वेदना त्यांच्या सहनशक्तीच्या पलीकडच्या होत्या.पडल्या जागीच ते हे सर्व सहन करत होते. समोरच त्यांच्या ह्या वेदना अन त्यांची ही अवस्था पाहणारा त्यांचा हतबल असा मुलगा होता.
हे किती विचित्र आहे ना. . . . जिला आयुष्याचा अर्थ पण समजला नाही किंवा अजुन आयुष्य जगल पण नाही अशी मुस्कान अजुन जगायला मिळाव म्हणुन मृत्युशी लढते आहे कदाचित यात लवकरच तिची हार होणार आहे न दुसरीकडे मनसोक् युष्य जगलेले आजोबा आहेत की ज्यांना आजाराच्या वेदना असह्य होऊन ते मृत्युची वाट पाहत आहेत पण तो काही येत नाही.
हे अस का असत???
खरच ह्या विश्वात देवाच अस्तित्व आहे का???
असेल तर तो असा न्याय का करतो???

तिकोना ट्रेक...

सिंहगड,विसापुर मागच्या वेळी असे दोन्ही पण ट्रेक चुकले होते त्यामुळे ह्या वेळी काही करुन जायचचं असं ठरवल होत.ट्रेकला शनिवारी की रविवारी जायचच यावरुन मतदान झाल त्यात शनिवारला (२५ सप्टे.)बहुमत मिळाल.इथेच मोठी गोची झाली कारण २५ ला मला सुट्टी नव्हती त्यामुळे सुट्टीसाठी काहीतरी जुगाड कराव लागणार होतं.सुदैवाने तस झाल पण सुट्टी मिळुन गेली. पण तरीही काही तरी काम निघुन ऐनवेळी  हाफ़िसला जाव लागल तर?? अजुन काही अडचण झाली तर?? एक ना अनेक अश्या खुप शंका मनात येत होत्या.

पुण्याहुन येणारे आम्ही पाच लोक होतो त्यामुळे गाडी करुन जाउ या अस अगोदर ठरल होत परंतु गाडी पेक्षा बाईकवर जाणं जास्त सोयीच राहिल त्यामुळे मी अन सागर. अनिकेत, अभिजीत अन विकास अशे पाच जण मिळुन तीन बाईकवर जाउ या अस ठरल.

आता महत्वाच काम म्हणजे बाईक शोधायच ती जबाबदारी सागर सदगुणी मुलावर दिली.भरपुर प्रयत्न करुनही त्याला बाईक मिळाली नाही.तरी पण पठ्ठ्याने प्रयत्न सोडले नव्हते....शुक्रवारी रात्री मी साधारण ८.३० ला या सासमु ला फ़ोन केला तेव्हा आमचा झालेला संवाद असा..
मी: अरे काय झाल...मिळाली का बाईक??
सासमु: नाही रे...मित्राची बाइक नाही मिळत आहे.
मी: बर ठीक आहे...आपण स्कुटीवर जाउ रे...टेन्शन घेउ नकोस
सासमु: चालेल...बघु रात्री १२ वाजता मी मित्राकडे जाउन येतो...त्याने दिली तर बघु या.
(आता रात्री १२ ला कोणत्या मित्राकडे गेला होता हे विचारु नका...तो सदगुणी आहे)
मी:वक्के...फ़क्त मला तस कळव.

एकुणच रागरंग पाहुन मी स्कुटीवर जाव लागणार याची तयारी सुरु केली...अपेक्षेप्रमाणेच सासमु चा सकाळी ६.३० ला समस आला बाईक मिळाली नाही तुझी स्कुटी घेऊन ये...आपण स्कुटीवरच जाउ या....त्याला ७.१५ला वाकडला पोहच असा रिप्लाय धाडुन दिला.

मी साधारण ७.४५ ला वाकडला पोहचलो तत्पुर्वीच अनिकेत आणि मंडळी पोहचली होती.मला उशीर होण्याच कारण म्हणजे...वारजेच्या पुलावरुन थोड पुढे आल्यानंतर भटक्या वाजला म्हणुन रस्त्याच्या कडेला थांबलो होतो तोच तिथे एक काका पाठीमागुन आले...त्यांच्या बाईकमधील पेट्रोल संपल होतं..एकंदरीत त्यांची अवस्था पाहुन बर्‍याच दुरुन गाडी ढकलत आले आहेत अस दिसत होत...त्यांना थोड पेट्रोल हव होत...मी टाकी नुकतीच संपुर्ण भरली होती त्यामुळे मला पेट्रोल द्यायला काहीच अडचण नव्हती पण स्कुटीमधुन पेट्रोल काढायच कस हाच प्रश्न होता...थोडा फ़ार प्रयत्न केला पण यश काही मिळाल नाही...मलाही वेळ होत होता त्यामुळे त्यांनी तु जा मी बघतो अस म्हणल्यावर मी तिथुन निघालो....वाकडला पोहचलो तर सासमु सोडुन सगळे पोहचले होते. सासमु ला फ़ोन केला तर साहेब अजुनही होस्टेलवरच होते... "अरे तुम्ही पोहचलात काय???तुमच्याच फ़ोनची वाट पाहत होतो...१५ मिनीटे थांबा आलोच मी." अस उत्तर मिळाल्यावर आम्ही समजुन घेतल स्वारी लवकर काही येत नाही त्यामुळे तिथे बाजुलाच गाड्या लावुन आम्ही गप्पा टप्पा चालु केल्या. अखेरीस सासमु आठ वाजता पोहचला....त्यानंतर आम्ही कामशेतच्या दिशेने मार्गस्थ झालो.

माझी स्कुटी असल्याने...अनिकेत अन अभिजीत दोघांनाही अगदी निवांत बाइक चालावायला लागत होती.मला वाटत प्रथमतःच त्यांनी महामार्गावर एवढी निवांत बाइक चालवली असेल.आम्ही वाटेत असतानाच सुहासचा "आम्ही लोणावळ्यात नाश्ता करतो अहोत तुम्ही पण नाश्ता करुन घ्या" असा फ़ोन येउन गेला.रस्तामध्ये कुठे चांगले हॉटेल दिसल नाही त्यामुळे थेट कामशेतलाच नाश्ता करण्यासाठी थांबलो..कामशेतमध्ये मी पहिल्यांदाच अशी मिसळ खाल्ली की जी मध्ये मटकी व्यतिरिक्त मसुरची डाळ अन हरभरे होते.असो तिथे आमचा नाश्ता होईपर्यंत मुंबई वरुन येणार्‍यांपैकी महेंद्रकाकांची गाडी पोहचली होती.

महेंद्र काका व सुरेश (अरे आपल ते देवेंद्र) या बझकरांना भेटण्याची ही पहिलीच वेळ...याअगोदर फ़क्त बझवरची ओळख...महेंद्र काका म्हणजे चांगलच वजनदार (भारदस्त) व्यक्तीमत्व आहे ;) मग सेनापतींची गाडी आली...सेनापतींना पण प्रथमच भेटलो...आता राहिलेल्या एका गाडीची वाट पाहत होतो...एकुणच आजचा ट्रेक चांगला धमाल होणार आहे याची जाणीव झाली होती.

 तिसरी गाडी मार्ग चुकली होती त्यामुळे त्यांना घ्यायला मी,अनिकेत व सासमु महामार्गावर जाउन थांबलो.तिसरा ग्रुप आल्यानंतर आम्ही तिकोन्याच्या दिशेने मार्गस्थ झालो.पवनानगर पर्यंत आम्ही अगदी व्यवस्थित पोहचलो...तिथे गेल्यावर सासमुला सुहासला फ़ोन करु रस्ता विचारयला सांगितल अन इथेच गडबड झाली...आता भरकटायची वेळ आमच्या दोघांची होती.पवनानगरच्या थोड पुढे आल्यावर डावीकडे वळुन मग सरळ यायच होत त्याऐवजी आम्ही एकदम सरळ निघालो...धरणापासुन खुप पुढे आलो तरी आम्हाला तिकोना येण्याच काही चिन्ह दिसेना..मला तर प्रत्येक डोंगर तर तिकोनाच आहे की काय असा भास व्हायचा...बराच वेळ झाल्यावर मग जाणवल की आपण रस्ता भरकटलो आहोत.तोपर्यंत सर्वजण तिकोन्याच्या पायथ्याशी पोहचले होते....संपुर्ण रस्त्यावर फ़क्त आम्हीच होतो त्यामुळे रस्ता विचारायचा तरी कोणाला?? थोड अंतर मागे फ़िरल्यावर एक मावशी भेटल्या मग त्यांनी व्यवथित मार्ग सांगितला...आम्हाला पवना ध्ररणाच्या सुरुवातीला परत जावा लागणार होत...शेवटी एकदाच आम्ही तिकोन्याच्या पायथ्याला पोहचलो तोपर्यंत ११.३० झाले होते.
सर्वांची ओळख झाल्यावर रोहन ने सर्व सुचना दिल्या त्यानंतर गडाच्या दिशेने सर्व लोक निघाले.उन भरपुर होत त्यामुळे चांगलीच दमछाक होणार होती.आजुबाजुचे डोंगर हिरवाइने नटले होते....समोरच पवना धरणाचा जलाशय दिसत होता.एकंदरीतच सर्व वातावरण अगदी मस्त होत.फ़ोटोगिरी अन गप्पा टप्पा करत आम्ही सर्वजण गडावर पोहचलो.

एवढ सगळ भटकुन झाल्यावर आता चांगली भुक लागली होती.आता जरा खादाडी सुरु असतानाचे फ़ोटो पहा.
खादाडी झाल्यावर पुन्हा थोड भटकलो अन मग आम्ही परतीच्या मार्गावर निघालो...जाताना अनुजा.देवेंद्र,सुहास यांना मी बकरा मिळालो होतो त्यामुळे चांगलाच टाइमपास झाला.(आता माझा बकरा का झाला व्हता हे म्या आज्याबात सांगणार नाय.)

खाली पोहचलो तर अजुन समस्या आमची वाटच पाहत होती...माझ्या स्कुटीचं मागच चाक पंक्चर झाल होत.पवनानगर शिवाय पंक्चर काढुन मिळणार नव्हत त्यामुळे अंदाजे ५-६ कि.मी.कसरत करुन पोहचायला लागणार होत.पंक्चरच्या दुकानापर्यंचा प्रवास अगदी अविस्मरणीय असा होता.कामशेतला सर्वांसोबत चहा घेउन मग आम्ही पुन्हा पुण्याच्या दिशेला रवाना झालो.सुदैवाने तिथुन परतताना काही अडचण आली नाही.
महेंद्र काका,श्रीताइ,आका,अनुजा, देवेंद्र,सेनापती,सासमु,सपा,सुझे,भामुं यांच्याशी फ़क्त आंजावरच बझ किंवा ब्लॉगच्या माध्यमातुन भेट व्हायची...पण शनिवारी या सर्वांना भेटुन खुप छान वाटल...यांच्यासोबत अजुनही नवीन मित्र मंडळी भेटली.

या ट्रेक मध्ये बझवरील इतर कट्टेकरी हेरंब,विभि,आप,देवकाका,श्रेता,अपर्णा,तन्वी ताय,मीणल यासर्वांना खुप मिस केल.

खरतर खादाडी काय काय केली याचा उल्लेख मी वर केला नाही...पण तो केला नाही तर तुम्हाला सर्वांना खुप वाईट वाटेल त्यामुळे खाली देत आहे.

थेपले,भाकरी,बटाट्याची भाजी,चटणी,बाकरवडी,थालीपीठ,,सामोसे,अळुवडी,मोसंबी,सफ़रचंद,बेसनलाडु.

अरे सर्वात महत्वाच म्हणजे अनुजाने आणलेल टांग....आता ही टांग काय आहे...हे जर मी असच सांगितल तर त्याच महत्व नाय कळणाय त्याच महत्व कळायच असेल तर त्यासाठी पुढ्च्या ट्रेकला याव लागणार.

टीप:
१. पोस्ट खुप घाइत खरडली आहे तवा चु.भु.दे.घे.
२. ब्लॉगर बहुतेक गंडल आहे त्यामुळे फ़ोटु टाकता आले नाहीत. :(

आठवणीतले खेळ -१

रोज मी हाफ़िसातुन घरी येतो त्यावेळी आमच्या सोसायटीमधील बच्चे कंपनी खाली जमलेली असतात (अर्थात मम्मी पण सोबत असतेच) अन क्रिकेट खेळणे किंवा घोळका करुन कसल्या तरी गप्प ठोकत बसणे हेच चालु असत.मी जेव्हा त्या मुलांकडे पाहतो तेव्हा खर तर खुप वाईट वाटत....ते त्यांच बालपण हरवुन बसली आहेत याची प्रकर्षाने जाणीव होती.त्यांचे खेळ,त्यांची मस्ती सार काही कोमेजुन गेलय.....त्यांनी अकाली प्रौढत्व आलय अस वाटत....बालपण कस अवखळ,अल्लड,दंगेखोर असल पाहिजे....योग्य त्या वयात योग्य तेच कराव... (आवरा...आवरा...बाबागिरी सुरु झाली...पोस्ट भरकटते आहे)

त्यांच्याकडे पाहुन मला माझ बालपण आठवल...बालपणीच्या अश्याच काही हरवलेल्या खेळांविषयी खरडणार आहे....की ज्यांची उणीव मला नेहमीच भासते....लहानपणी प्रत्येक खेळाचा एक सिझन असायचा ...जसा मौसम बदलायचा त्याप्रमाणे खेळ पण बदलायचा.

असाच एक प्रचंड आवडीचा खेळ : विट्टी दांडु.
विट्टी-दांडु चा मौसम आला की तयारी चालु व्हायची ती म्हणजे तो तयार करण्यापासुन...आम्ही राहत असलेल्या वाड्यासमोरच लाकडाची वखार होती...तिथले औटी बाबा म्हणजे आमच हक्काच माणुस...फ़क्त त्यांना जाउन सांगायच ...आम्हाला विट्टी दांडु करायचा आहे लाकुड द्या...(म्हणजे अगदी तीर्थरुपांचीच वखार आहे असा अविर्भाव असायचा)...अर्थात हे सगळ चकटफ़ु असायचं...(विट्टी दांडुला लाकुड विकत घ्यायच म्हणजे ही त्या काळात अशक्य वाटणारी कल्पना होती)... त्यानंतर बाळु मिस्त्री होताच....त्याला एवढा त्रास देउन पण बिच्चारा आम्हाला असला भन्नाट विट्टी दांडु करुन द्यायचा की बस्स...तेव्हा तो जगातला सगळ्यात भारी माणुस वाटायचा...

वि्ट्टी दांडु मधील कोली अन रिंगण-रिंगण हे दोन प्रकार आम्ही सर्वात जास्त खेळायचो...रिंगण-रिंगण मध्ये जर एखाद्यावर राज्य तंगला की तो कधी कधी दोन दोन दिवस चालायचा....शाळेत विट्टी दांडु घेउन जायच म्हणजे सर्वात मोठ दिव्य असायच ...जर चुकुन सरांच्या नजरेस पडल तर मग काही खैर नसायची वर घरापर्यंत बातमी पोहचायची...त्यामुळे शाळेच्या मैदानाजवळ (आमची शाळा गावाबाहेर असल्यामुळे मैदानाच्या आजुबाजुला सगळ माळरानच होत) असलेल्या झुरीत आम्ही लपवायचो...मग काय दुपारच्या सुट्टीत तेवढ एकच काम.

कोली खेळताना भिडुने कोललेली विट्टी झेलताना खुपदा हाताच्या बोटांना जखम व्हायची...अन हाताची जखम घरी लपवायची म्हणजे अशक्यातली अशक्य गोष्ट...ते लक्षात आल की घरात मग काय आमच्या नावाने सत्यनारायणच व्हायचा. .  . . मग यापासुन वाचण्यासाठी  आम्ही गांधी टोपीचा वापर करायला लागलो (पांढरा शर्ट, अर्धी खाकी चड्डी अन गांधी टोपी हा आमचा गणवेष होता)....गांधी टोपीचा आजतागायत तरी कोणी असा वापर केला नसेल . :)

असा हा विट्टी दांडु फ़ीवर विट्टी -दांडु पाणी तापवायच्या बंबात गेल्याशिवाय उतरायचा नाही.....म्हणायला तो पर्यंत आमच मनोसक्त खेळुन झालेल असायचं त्यानंतर मौसम असायचा "गोट्यांचा".

विट्टी दांडु हा खेळ आता जवळपास नामशेष झाला आहे...शहरात सोडा गावाकडे पण आता कोणी हा खेळ खेळताना दिसत नाही...हा खेळ सध्या तरी इतिहास जमा झाल्यासारखाच आहे.

सौजन्याच्या आयला ......

आजच्या युगात जर तुम्ही जास्त सौजन्य दाखवुन जर तुम्ही कोणाची कीव केली तर तुमचा जीव घेतील.असाच अनुभव मी दोन दिवसांपुर्वी घेतला.

घरी टी.वी. नसल्यामुळे तो खरेदी करायचा असा निर्णय झाला.कोण म्हणायच LED घे तर कोणी म्हणायच LCD घे.प्रत्येकाचा वेगवेगळा सल्ला.....शेवटी सर्वात म्ह्त्वाचा म्हणजे खिश्याचा सल्ला घेतला अन बजेट नुसार LCDच घेउ या असा निर्णय झाला.आता LCD कोणत्या कंपनीचा, किती इंची घ्यावा यावर काथ्याकुट सुरु झाला...(किती चिकित्सक...किती अभ्यास करतोय...किती शहाणं ते लेकरु...शाब्ब्बास)....कोणत्याही कंपनी शो रुमला जाण्याऐवजी इलेक्ट्रॉनिक्स मॉलला जाऊन घेउ या म्हणजे सर्व ब्रॅंड पाहता येतील ह्या हेतुने सातारा रोडवरील "विजय सेल्सला" गेलो.

तिथे प्रवेश करताच अगदी हसतमुखाने स्वागत झाले...(नवीन बकरा आला आहे...चला कापु या...असाच काहीसा अविर्भाव सेल्समनच्या चेहर्‍यावर होता...त्याबरोबरच काउंटवरील कन्या "आता ह्याच काही खर नाही सेल्समन याला बरोबर घेणार" या विचाराने गालातल्या गालात खदाखदा (गालातल्या गालात खदाखदा कस??? जेव्हा खरेदी जाल ना तेव्हा समजेल हे) हसत होती)प्रत्येक मॉडेलला तो चांगलच म्हणुन साधारण आमचा अंदाज घेत होता..म्हणजे हे फ़क्त वेळ घालवायला आले आहेत की खरोखर टी.वी. घ्यायचा आहे याची चाचपणी चालु होती.

त्यातच त्याने ललॉईड नावाचा एक भारतीय बनावटीचा LCD दाखवला...थोडे त्याचे गुणगान गाउन हाच टी.वी. सध्या किती उत्तम आहे हे पटवत होता...(च्यायला मेरे कु येडा समझ रहा था...उस कु क्या पता मैं भी बारा पिंपळ का मुंज्या है..)मग त्याला चांगलाच घेतला...हो सर थोडी पिक्चर क्वालीटी कमी...साउंड पण बरा आहे...उसबी चालत नाही..HD इनबिल्ट नाही...अरे मग आहे काय यात??

त्यांनतर सॅमसॅंग अन एल.जी.चे मॉडेल पाहयला सुरुवात केली...थोड्यावेळापुर्वी भारतीय बनावटीच्या LCDचे गुणगान गाणारा आता हेच LCD बेश्ट आहे हे पटवत होता...त्याची इतकी वटवट (आपला सत्यवान नव्हे) चालु होती...(आयला हा झोपेत पण हेच बरळत असणार)...मी आपला मनोभावे श्रवणभक्ती करत होतो...एवढ सार पाहुन म्हणजे ऐकुन मला मनासारखा LCD  मिळत नव्हता. जीजुंना मात्र सॅमसंगचा आवडला होता..

तुमच्या कडे सोनी चे टी.वी. नाही आहेत काय??? म्या पामराने त्याला प्रश्न केला....माझ्याकडे पाहुन आहे की पण त्यांच्या किंमती फ़िक्स आहेत तिथे कमी जास्त होणार नाही (हे अगदी हलक्या आवाजात)...चालेल मला काही प्रॉब्लेम नाही तुम्ही दाखवा मला सोनी चे टी.वी....(अरे पावट्या कुठे बार्गेन करायच हे मला माहित आहे...ते तु नको शिकवु..हे मनात) अस म्हणुन आता सोनीच्या मॉडेल्सवर काथ्याकुट चालु केला...आता सेल्समन नी सोनीचे गुणगान सुरु केल...जिकडं खोबर तिकडं चांगभल...या म्हणीचा प्रत्यय तेव्हा आला....शेवटी सोनीच एक मॉडेल आवडल मग जास्त विचार न करता तेच अंतिम करुन टाकलं.

पेमेंटसाठी ५०% आता अन ५०% टक्के उद्या देतो अन टी.वी. आजच घेऊन जातो असा पर्याय मी ठेवला..हा ते मान्य नाही करणार हे माहित होत पण तरीही उगाचच आपला शहाणपणा करत होतो...इतका वेळ आमच्या मागे पुढे फ़िरणारा आमची सर्विस किती चांगली आहे...तुम्ही इथेच खरेदी करा यासाठी पटवणारा सेल्समन निर्णय अंतिम झाल्यावर गायब झाला होता....त्यानी त्याच काम साधल होतं.

आम्ही पेमेंट करुन संध्याकाळी ४ वाजेपर्यंत टी.वी.घरपोच मिळेल अस आश्वासन घेउन (सामान्य माणसाच्या पदरात नेहमी हेच मिळतं) आनंदातच घरी पोहचलो...घड्याळाचा काटा जसा पुढे जात होता तशी उत्सुकता वाढत होती...पाच वाजले तरी न त्यांचा काही फ़ोन आला नव्हता...त्यांनी दिलेल्या नंबरवरही कोणी फ़ोन घेत नव्हत...शेवटी खुप वेळाने फ़ोन घेतला...इकडे-तिकडे अस चार पाच ठिकाणी ट्रान्सफ़र होऊन शेवटी योग्य विभागात फ़ोन पोहचला. अर्ध्या तासात टी.वी. पोहचेल अस सांगुन मी काही बोलायच्या आत पलीकडुन फ़ोन आपटला गेला.

शेवटी एकदाचा सात वाजता विजय सेल्सचा माणुस टी.वी.घेउन पोहचला...बॉक्स पाहण्याअगोदर अगदी घाईत ओपन केला...फ़िटींग वगैरे सुरु केली...तेव्हाच काहीतरी गडबड आहे याची शंका आली...म्हणुन पीस पाहिला तर तो पुर्णतः धुळीने माखला होता...बाजुची पॅकींगची टेप निघालेली होती...नीट पाहिल्यावर कळल त्यांनी शो रुमचा लुज पीस नवा पीस म्हणुन पाठवला होता...च्यायला मुर्ख समजतात की काय?? डिलीवरी घेउन आलेल्या तो पीस न घेताच त्याला तिथुन पिटाळल अन मी शो रुमला निघालो...सकाळी हसुन स्वागत करणार्‍या सेल्समन आता मात्र त्रासिक मुद्रेने.... काय झाल??? डिलीवरी मिळाली ना??? मी शक्य तितक्या सबुरीने त्याला सगळ रामायण सांगितल....ते ऐकुन त्याने त्याच्या मॅनेजरला बोलावुन आम्हाला त्याच्याकडे स्वाधीन करुन कल्टी मारली...मी आपला तेवढ्याच कळकळीने झालेला प्रकार सांगितला...तर यावर अस होण शक्य नाही आम्ही नवीनच पीस दिला आहे...इ..इ..सुरु केल...शेवटी वाद नको म्हणुन मी आपली माघार घेतली अन त्याला म्हणल मला हा पीस नको दुसरा द्या...तब्बल अर्धा तास वाट पाहिल्यावर तो परत आला....आज दुसरा पीस देण काही शक्य नाही...उद्या नक्की देतो..चला एका रात्रीने काय फ़रक पडणार आहे असा विचार करुन मी तिथुन निघालो.

आता दिवस दुसरा....दुपार पर्यंत विजय सेल्स कडुन काहीच संपर्क झाला नाही...म्हणुन मग मीच त्या मॅनेजरला फ़ोन केला...एका तासात डिलीवरी नक्की मिळेल..काळजी नका करु...पाठवतो म्हणजे पाठवतो... टिपीकल बोलबच्चन टाकला...मी आपला बर बाबा ठीक आहे...दुसर काय करणार... अडला हरी गाढवाचे पाय धरी...एका तासाचे दोन तासात झाले तरी घरी डिलीवरी पोहचली नव्हती...या दरम्यान त्याला खुपदा फ़ोन केला पण त्याने काही अटेंड केला नाही....त्यात हाफ़िसात नेमका मेजर प्रॉब्लेम आला...मग अजुनच चिड चिड होत होती....अखेरीस सहाच्या दरम्यान त्यानेच फ़ोन केला....तुमची डिलीवरी पाठवत आहे...नवीन पीस आहे...व्यवस्थित पाहुन घ्या...मी हाफ़िसात अडकलो होतो त्यामुळे ठीक आहे अस जुजबी उत्तर देउन फ़ोन बंद केला..घरी फ़ोन करुन मावसभावाला टी.वी. व्यवस्थित पाहुन घे अस बजावुन मी आपला कामाला जुंपलो....हाफ़िसातलं काम संपवुन घरी निघालो तोच भावाचा फ़ोन आला आज पण कालचा पीस परत पाठवला आहे.... हे ऐकल्यावर मात्र संयम संपला त्याला तो पीस परत कर घेउ नकोस अस सांगुन मी थेट विजय सेल्स गाठल...ह्यांच्याशी आता सौजन्य सोडुनच बोलाव लागणार होत...मनातल्या मनात सगळ्या शिव्यांची रिवीजन केली..

दुकानात घुसल्याबरोबर मॅनेजरला गाठल....अन जे सुरु झालो की बस्स....क्षणात सगळ स्टोअर माझ्या बाजुने गोळा झाल होतं (राउंड टेबल झाल होत...मध्ये फ़क्त मी अन तो मॅनेजर होतो)...मी हाफ़िसाचा सगळा वैताग त्याच्यावर काढत होतो...हे किडमड काय बोलु शकतो??....एकदम पप्पु आहे...असा त्याचा समज होता...पण जेव्हा त्याने माझा तो रुद्रावतार पाहिला तेव्हा त्याचा चेहरा पाहण्यासारखा झाला होता...सोबत आलेला मित्र मला थांबवत होता...तो काय म्हणतोय ते तर ऐकुन घे....पण मी काहीच ऐकण्याच्या मनस्थिती मध्ये नव्हतो....मी आपला सुरुच होतो...शेवटी मित्राने मला बाजुला घेतल म्हणाला अरे थोडा शांत हो...तो काय म्हणतोय ते तरी बघु....मी केलेल्या राड्याचा योग्य तो परीणाम साधला गेला होता...आता सगळे सुतासारखे सरळ झाले होते...झालेली चुक मान्य करुन उद्याचा दिवस द्या ...उद्या तुम्हाला नवीन पॅक पीस देतो..तो नाही आवडला तर रिफ़ंड देईल या अटीवर मी तिथुन निघालो....जाम डोक दुखत होत....बाहेर पडल्याबरोबर जवळच्याच अमृततुल्य मध्ये चहा मारला.

तिसर्‍या दिवशी मी आज पुन्हा राडा करायचा अन पैसे परत घ्यायचे याची पुर्ण तयारी केली होती....संध्याकाळी हाफ़िसातुन थेट स्टॊअरवर पोहचलो....आज स्वागत मात्र अगदी सौजन्याने झाल...स्टोअर मधील सगळ्यांच्या नजरा माझ्यावर खिळल्या होत्या....अरे हा तो कालचाच रे...आता आज हा काय करतोय याकडेच लक्ष होत.....मॅनेजरने मला आलेला नवीन पीस दाखवला...आज मात्र अगदी नवीन अन व्यवस्थीत पीस होता....तो पाहिल्यानंतर मग खुष झालो.

पुन्हा व्यवस्थित पॅक करुन स्वतःच डिलीवरी घेउन आलो....तिथुन निघल्यावर तो मॅनेजर मला बाहेर पर्यंत सोडवायला आला...परत काही खरेदी करायच असेल तर अगदी निश्चिंत या...मी  म्हणल "घंटा" (मनात)

यातुन एक धडा घेतला जास्त सौजन्य दाखवल तर हे गेंडा कातडी लोक तुम्हाला दाद देणार नाही....अरे ला कारे केल की आपोआप वठणीवर येतात....कदाचित त्यांना खळ्ळ-फ़ट्याक ची भाषा अवगत असल्यामुळे सौजन्याचं अपचन होत असेल.

इंडीयाज गॉट टॅलंट....

टी.वी. अन मी हे फ़ार दुर्मिळ असा योग आहे.चुकुन कधी कधी टी.वी. पाहतो.पाहिल तरी म्युजिक,डिस्कवरी,नॅशनल जिओग्राफ़ी इकडे पडीक असतो.रियल्टी शो या प्रकारच्या तर वाटेला पण जात नाही.पण नुकताच कलर्स वर "इंडीयाज गॉट टॅलंट" नावाचा कार्यक्रम पाहण्यात आला.

खरच आपला भारत गुणवत्तेची खाण आहे. भारतातल्या प्रत्येक काना कोपर्‍यात अस्सल गुणवान हिरे आहेत.खालील दोन विडीयो पाहा या अशा गुणवत्तेच्या जोरावर आपण उद्याच्या उज्ज्वल भविष्याच स्वप्न पाहिला काहीच हरकत नाही.

विनोद ठाकुर ...हा अवघा २१ वर्षाचा तरुण दोन्ही पायांनी अपंग...घरची परिस्थिती अत्यंत गरीबीची...याचे वडील चालक तर आइ गृहिणी आहे. धडधाकट तरुणाला लाजवेल असा याचा उत्साह. त्याच्या फ़क्त डोळ्यात पहा...किती स्वप्न आहेत...आपण अपंग आहोत या गोष्टीचा त्याने कुठेही सहानभुती मिळवण्यासाठी उपयोग केला नाही.त्याचा नाच बघताना तर विश्वासच बसत नाही.

खरच कोठुन आणत असेल हा एवढा उत्साह?? निराशेचा कुठेही मागमुस ना्ही......स्वतःच्या अस्तिवाची ही लढाइ तेवढ्याच धैर्याने चालु आहे.





आता हा खालचा दुसरा विडीयो पहा.ही सर्व मुलं एका वस्तीवरील आहे.यांनी भंगारातुन सगळी संगीत वाद्य बनवली आहेत.यातील बहुतेक मुल ही शाळेत जातच नाही अन कोणीही संगीताच शिक्षण घेतलेल नाही.









 मला खर तर रियल्टी शो या प्रकाराचा खुप तिटकारा आहे पण हे पाहिल्यावर वाटत की या कार्यक्रमाद्वारे या अशा लोकांना आपली गुणवत्ता सिद्ध करण्यासाठी मंच मिळाला.

भारतात अशे कि्ती तरी लोक असतील की ज्यांच्याकडे अशीच गुणवत्ता असेल पण केवळ योग्य मार्ग न मिळाल्यामुळे कुठे तरी भरकटले असतील किंवा जगापुढे कधी येउ शकत नाही.

खर तर ही आपल्या सरकारची जबाबदारी आहे...अश्या गुणवान लोकांना शोधुन त्यांना उत्तम सुविधा व संधी  देणं गरजेच आहे.पण अस काही विधायक काम केल तर ते सरकार कसल???

खा...खा..खादुवासी!!

 माथा टीप: सदर लिखाण हे केवळ काल्पनिक आहे. यातील व्यक्तींचा जिवंत,मृत,तृप्त,  अ-तृप्त अश्या कोणत्याही व्यक्तीमत्वांशी दुरान्वये संबंध नाही. तस असल्यास तो केवळ योगा योग समजावा.


संपुर्ण जगाला एका नवीन जमातीच्या शोधाने अचंबीत केल आहे.या जमातीमधील मानव सदृश्य व्यक्तींच वैशिष्ट म्हणजे यांची "पचन शक्ती".या जमाती मधील व्यक्तींच्या पचन शक्तीने संपुर्ण जगातील शास्त्रज्ञ अचंबीत झाले आहेत.ही जमात  दृश्य व अदृश्य,घन,द्रव,वायु,नैसर्गिक,कृत्रिम कोणत्याही प्रकारच्या वस्तु खाउ शकतात.यांना खाण्यासाठी कोणत्याही प्रकारच पथ्य नाही. त्याहुन महत्वाच म्हणजे त्या अतिशय उत्तमरित्या पचवु शकतात.या जमातीला बद्ध्कोष्टता,अपचन इ. रोग की जे पचनाशी संबधीत आहे याचा कोणताही प्रकारचा त्रास होत नाही.

ही जमात प्रामुख्याने आशिया खंडातील "भारत" देशी सापडते.या जमातीमधील व्यक्तींना ओळखण्याची सर्वात सोपी खुण म्हणजे यांच्या चेहर्‍यावरील साळसुदपणाचा भाव.ह्या जमातीमधील लोक भारत देशातील काना कोपर्‍यात आढळतात.उदारनिर्वाहासाठी यांचा मुख्य व्यवसाय म्हणजे "समाजसेवा".समाजसेवेच्या माध्यमातुन ते इतर समुदायातील लोकांच प्रतिनिधीत्व करुन स्वतःच व कुटुंबाच पोट भरतात."एका मेका सहाय्य करु अवघे धरु सुपंथ" या उक्ती प्रमाणे या समुदायातील लोक एकमेकांना सतत सहकार्य करत आयुष्य कंठीत असतात.महाभारतात ज्याप्रमाणे अर्जुनाला लक्ष्य भेद करताना फ़क्त पोपटाचा डोळा दिसत होता अगदी त्याप्रमाणेच यांना हे जिथे जातील तिथे फ़क्त त्यांच "खाणे"एवढच एक लक्ष्य असतं.जगातील शास्त्रज्ञानी या जमातीला "खादुवासी" असे नामकरण केले आहे.या जमातीमधील तीन प्रतिनिधींचा जगभरातील शास्त्रज्ञानी प्रातिनिधीक संशोधनपर अभ्यास केला त्याचा तपशील खालील प्रमाणे.

सर्वप्रथम अभ्यास केलेला प्रतिनिधी सध्या खेळाच्या माध्यमातुन समाजाची सेवा करतो.अत्यंत साध राहणीमान,चेहर्‍यावर तोच गरीबपणाचा साळसुद भाव.अन इतका गरीब की दाढी करावयास सुद्धा सध्याच्या महागाइच्या काळात याला परवडत नाही.याच्या उर्ध्व ढेकराच्या गंधाचा (सहसा खाउन झाल्यानंतर ही जमात कधीच उर्ध्व किंवा अर्ध्व ढेकर देत नाही कधी तरी चुकुन सापडले जातात) नमुना तपासला असता त्यामध्ये खेळाची मैदाने,खेळासाठी लागणारी साधने,सुविधा अश्या खुप सार्‍या गोष्टी आढळल्या.अजुन दीर्घ तपास केला असता बी.आर.टी. नावाचा एक संपुर्ण प्रकल्प, रस्ते, उड्डाण पुल अस खुप काही आढळल.पण सदर प्रतिनिधी ने हे सर्व थोतांड असुन आपण अस काही खाल्लच नाही असा दावा केला आहे.

यानंतरचा प्रतिनिधी हा "विहार" या अत्यंत गरीब प्रदेशातुन आलेला होता.अतिशय गोंडस अन मिश्कील अस हे व्यक्तीमत्व.नावाजलेल्या संस्थांमधुन हे व्यवस्थापनाचे धडे देतात.यांच्या उर्ध्व ढेकरातुन गुरांच्या चार्‍याचा अगदी घमघमाट होता की शास्त्रज्ञाना त्याचा अभ्यास करण सुद्धा अवघड झाल.चार्‍यासारखी गोष्ट पचवण्यासाठी हे नक्की काय करतात हे मात्र एक गुढच राहिल आहे.यांच्या अभ्यासाठी गेलेले शास्त्रज्ञ हे सध्या "म्हशी व त्यांचे कुटुंबनियोजन" यावरील संशोधनात व्यग्र असल्याने हा तपशील नेहमीप्रमाणे अपुर्ण राहिला.

सर्वात शेवटी आलेल्या व्यक्तीमत्वाचा अभ्यास करताना शास्त्रज्ञांच्या कौशल्याचा कस लागला.गरीब शेतकरी कुटुंबातील सर्वांचा "जाणता राजा" असलेला, गोर गरीब जनतेचा कैवारी, भाग्यविधाता....अस खुप काही.अत्यंत शांत,मृदु,मितभाषी....न बोलताच आपला पराक्रम गाजवणारा.यांच्या मनात काय चालु आहे कोणीच अगदी स्वतः ते पण सांगु शकत नाही.यांचा अभ्यास जेव्हा चालु केला तेव्हा शास्त्रज्ञांपुढे अभ्यास कसा करावा हा यक्ष प्रश्न होता. कारण हे खातात कधी हे समजतच नाही,कोणत्याही प्रकारचा अर्ध्व किंवा उर्ध्व ढेकरही देत नाही.फ़क्त हे खात आहेत हे जाणवत...त्याचा आभास होतो. यांनी खाल्लय हे साक्षात ब्रम्हदेव जरी आला तरी त्याला सिद्ध करण अशक्य आहे.या समाजसेवेचं अनुग्रह त्यांनी त्यांच्या सर्व क्षेत्रातील शिष्यांना दिला आहे. शिक्षण,बांधकाम,आरोग्य,उद्योग,शेती,खेळ (सर्व प्रकारचे मैदानी व बैठे) या सगळ्या क्षेत्रात यांचे अनुयायी यांच्या मार्गदर्शनाखाली काम करत आहेत.सगळीकडेच यांच्या खाण्याचा अदृश्य असा अस्तित्वाचा ठसा आहे.

सरतेशेवटी यांच्या अभ्यासासाठी शास्त्रज्ञानी नवीन प्रगत अशा तंत्राच्या साहय्याने नवीन यंत्र तयार केल की ज्या द्वारे यांनी काय काय खाल्लय हे पाहता येउ शकत होत.हे यंत्र जेव्हा या "साहेबां"ना लावल तेव्हा क्षणातच संगणकावरील सर्व गुप्तनीय माहिती गायब झाली व संगणकाच्या पडद्यावर काळोखाच्या पार्श्वभुमीवर "Permanat Error" चा संदेश झळकला.

यानंतर सर्व शास्त्रज्ञ बेशुध्द व "साहेब" व्यक्तीमत्व गालातल्या गालत स्मित हास्य करत होत!!!

येळकोट..येळकोट...जय मल्हार!!!

कुलाचार,कुलधर्म,कुलदैवत या सर्व प्रकारांशी लग्नापुर्वी दुर दुर पर्यंत संबंध नव्हता.गुरुवारी "स्वामी समर्थ मठ" सोडला तर बाकी इतर कोणत्याच ठिकाणी मी काही फ़िरकत नाही.आइ बाबा जातात म्हणुन प्रत्येक नवरात्रात निमगिरी ला आमच्या कुलदेवीला जायचो.ते पण मला तो परीसर खुप आवडतो म्हणुन अन सर्वात महत्वाच म्हणजे घरचे सर्व जण एकत्र असतात त्यामुळे मस्त मजा येते.तुळजापुर, जेजुरी इथे लहानपणी कधी तरी गेल्याच आठवतय.

लग्नानंतर कुलधर्माप्रमाणे जेजुरी इथ जाण क्रमप्राप्त होत.आपण फ़क्त जेजुरी ला न जाता कडेपठारला पण जाउ या असा प्लॅन झाला.ठरल्याप्रमाणे पहाटे घरुन जेजुरीच्या दिशेने प्रयाण केल.सकाळी लवकरच आम्ही कर्‍हा नदीवर पोहचलो.स्वागताला पार्किंगची पावती घेउन उभा होता.
 मी : हे पार्किंग देवस्थानच की सरकारच?
 तो:  हे खाजगी पार्किंग आहे.
 मी: अरे पण हे तर नदी पात्र खाजगी कस?
 तो:(च्यायला लय शहाण दिसतय...मनात) ओ तुम्हाला जायच असेल तर पावती फ़ाडावी लागेल नाही तर जाता येणार नाही.
एकंदरीत सर्वांचा राग रंग पाहुन गुपचुप पावती फ़ाडली.प्रश्न पैश्यांचा नव्हता पण याला फ़ुकट पैसे का द्यायचे हा होता.असो गरजवंताला अक्कल नसते.

नदी पात्रात अन परीसरात घाणीच साम्राज्य होत.प्रचंड प्रदुषण होत.अश्या पाण्यात आंघोळ करावी लागणार होती.बिलकुल चिडचिड न करता त्यातल्या त्यात बर्‍यापैकी स्वच्छ असणारी जागा शोधुन आंघोळ उरकुन घेतली.त्यानंतर लगेच गोंधळी तयारच होता ठरलेली पुजा, नैवेद्य इ. सोपस्कार उरकुन घेतले.आता वेळ आली दक्षिणा द्यायची.मी आपले रु.१०१ काढुन ठेवले (मला तर ते ही जास्त वाटत होते) पण रु.५०१ च्या कमी घ्यायला काही तयार होइना.त्याच गिर्‍हाइक वाढत होत त्यामुळ त्याला घाइ होती. "अहो भाउ लग्न एकदाच होत. ५०० नी तुम्हाला काय फ़रक पडणार आहे.खंडोबाच्या नावानं द्या की"..अस म्हणत त्यान मोर्चा बायकोकडे वळवला "अवो वहिनी तुम्ही सांगा की ऐकतील तुमच"....च्यामारी लय वांड दिसतय..(मनातल्या मनात)...चल घे बाबा ५०१ तर ५०१...अस म्हणुन ५०० ची नोट त्याच्या हातावर टेकवली...(घे लग्न करायची खुप हौस होती ना..अस उगीच कोणी तरी म्हणल्याचा मला भास झाला)

आता आम्ही कडेपठारच्या दिशेने निघालो.पायथ्याशी पोहचल्यावर कडेपठार पाहुनच खुप दमछाक होणार याचा अंदाज आला होता.आम्ही सर्व जण मस्त मजा करत हळु हळु गड चढायला सुरुवात केली उन्हाळा असल्यामुळे सकाळच्या कोवळ्या उन्हात पण त्याची तीव्रता भासत होती.नवीन लग्नाची जोडी म्हणुन आजु बाजुची जनता आमच्याकडे नवलाइने पाहत होती.मजल दरमजल करत आम्ही अखेर गडावर पोहचलो.गडाचा परीसर,मंद थंडगार वारा याने सगळा थकवा आपोआप गळुन गेला.थोडा वेळ आराम करुन मग आम्ही पुजेसाठी मंदीरात निघालो.मंदीर खुप सुंदर आहे.दीपमाळ, जुनं दगडी बांधकाम तर निव्वळ अप्रतिम आहे.

आम्ही जोडीने आत मध्ये प्रवेश करताच एखाद्या शिकार्‍याला सावज सापडल्यानंतर जसा आनंद होतो तसा काहीसा भाव मला तिथल्या पुजार्‍यांच्या चेहर्‍यावर वाटला.इथे पण आपल्याला कापणार आहेत याची मला नकळत जाणीव झाली.नवपरीणीत जोडप्यांसाठी असणारी पुजा अगदी सराइतपणे त्याने उरकुन घेतली.पुजा काय केली हे मात्र काही समजल नाही.तो काही तरी मंत्र पुटपुटत होता...काय ते त्यालाच त्याच माहित.(मी मंदीराच अंतर्गत बांधकाम न्याहळ्याणतच गुंग होतो अधे मधे तो काही तरी मंत्र बोलायला लावायचा तेवढे फ़क्त म्हणायचो) अखेरीस पुजेचे सोपस्कार पार पडले नेहमीप्रमाणे दक्षिणा देण्याची वेळ आली.मी पैसे देण्याअगोदरच त्याने रु.१००० ची मागणी केली. मी ऐकुनच हादरलो ...याने १००० रुपये देण्याइतपत अशी पुजा केली तरी काय? नेहमीप्रमाणेच मी आपला वाद विवादाला सुरुवात केली.शेवटी कसा बसा तो ५००वर तयार झाला.(च्यायला ४ वर्ष इंजिनिअरिंग करण्या पेक्षा पुजारी झालो असतो तर बर झाल असत.)

आता कडेपठार वरुनच जेजुरी गडावर जायच होत.अंतर खुप होत.जेजुरी गडावर जाइपर्यंत खुप दमछाक होणार होती.त्यात भाची कडेवर होती त्यामुळे हळु हळु चालाव लागत होत.शेवटी एकदाच जेजुरी गडावर पोहचलो.लग्न सराइ असल्यामुळे दर्शनासाठी प्रचंड गर्दी होती.रांगेत उभ राहिलो तर दर्शनासाठी ३ ते ४तास लागणार होते.त्यामुळे दर्शन पासाची काही सोय आहे का हे पाहयला गेलो.अवघ्या प्रत्येकी ५० रुपयात फ़क्त तीन मिनीटात दर्शन अस ट्रस्टच्या वतीने लावलेल्या बुथवर एकजण बोंब ठोकत होता.पटकन दर्शन होइल या अपेक्षेने मी आम्हा सर्वांचे पास काढले अन मंदीरात आत मध्ये गेलो तिथे पाहिल तर   
पास असणार्‍यांसाठी वेगळी अशी रांग नव्हती.दर्शन रांग अन पास असणारे यांची सामाइकच रांग होती.तिथे असणार्‍या पुजार्‍याला या संदर्भात विचारल तर तो म्हणाला पास हा देवस्थान ट्रस्टचा आहे त्याच्याशी आमचा काही एक संबंध नाही तुम्हाला तक्रार करायची असेल तर ट्रस्टच्या कार्यालयात जा.शेवटी तब्बल अर्धा तास वाट पाहिल्यानंतर प्रचंड रेटा रेटीतुन आमचा नंबर आला.नवपरिणीत जोड्यांसाठी तिथे असणार्‍या पुजार्‍याने आम्हा दोघांना बाजुला घेउन कसली तरी पुजा केली, नाव घ्यायला लावली अन १०००रुपये दक्षिणा घेतली.तिथे वाद घालण्याची काही संधीच नव्हती कारण येणार्‍या प्रत्येक नव्या जोडप्याकडुन ते अश्याच रितीने पैसे घेत होते.ती पुजा आटोपुन निघतोय तोच अजुन एका पुजार्‍याने पकडले अभिषेक करावा लागतो म्हणुन त्याने ५००रुपये (इथे पण त्याने अभिषेकाचे रेट सांगितले होते...५०० हा सर्वात कमी रेट.) घेतले.ह्या लोकांची पद्धत अशी काही आहे की ते नवख्या लोकांना बचावाची काही संधीच देत नाही.

आतील दर्शन पुर्ण करुन बाहेर जात होतो तर तिथेच अजुन एक पुजारी भेटला, अहो बाशिंग उतरवल्याशिवाय जाता कुठे इकडे या असा जोरदार आवाज दिला.सुरुवातीला काय बोलतोय काही समजलच नाही.हा नक्की काय म्हणतोय हे पाहण्यासाठी त्याच्या जवळ गेलो.
पुजारी:लग्नात काय बांधल होत? मुंडावळी की बाशिंग
मी: बाशिंग
पुजारी: मग तुम्हाला बाशिंग उतरावयला लागेल.
मी: ते गृहप्रवेश झाल्यावरच उतरवलय
पुजारी: नाही तस नाही उतरवत ते इथच उतराव लागत.
मी: नाही उतरवल तर.
पुजारी: सांगितल ना कुलाचाराप्रमाणे ते इथे उतरावच लागत.

कुलाचार म्हणाल्यावर काय बोलणार??? उतरवल इथ बाशिंग (म्हणजे काही तरी पुजा केली...न समजणारे मंत्र म्हणाला) ....पुन्हा ५०० ला चंदन....मनातल्या मनात खुप चरफ़डत होतो पण करणार काय??? हे सार संपवुन झाल बाहेर आलो ...आता तरी सुटलो अस वाटत होत तोच तळी भरायची बाकी आहे..ती भरुन घेउ या...तीर्थरुपांनी आदेश दिला.त्यामुळे तळी भरायल गेलो.तिथे पण सगळीकडे भेटले तशेच तळी भरणारे तयारच होते. तळी भरली...(यांचे आत्ताच दोनाचे चार हात झालेत लवकरच सहा हात होऊ दे...असा आगाउपणा त्याने केला.)तळी,शिदा देणे अस मिळुन याने पण पाचशे घेतले.

अवघ्या काही मिनीटात मी ३५०० हजाराला कापलो गेलो होतो.खर तर या सगळ्या गोष्टींचा संताप येत होता.देवाच्या नावाखाली ढळढळीत लुट चालु होती पण यांना अडवणार कोणीच नव्हत.हाच आमचा खरा धर्म आहे का??एवढे पैसे घेउन पण गडावर सगळा आनंदी आनंद होता.चहु बाजुला प्रदुषण,सुविधांचा अभाव, भिकार्‍यांचा सुळसुळाट.सगळा भोंगळ कारभार आहे.दुर्दैवाने याकडे सर्वांनीच दुर्लक्ष केलेल आहे.


या सगळ्यात मला देव कुठ भेटलाच नाही.मंदीरात गेल्यानंतर मनाला जे समाधान लाभत ते मात्र इथ आल्यावर मी हरवुन बसलो होतो.अस्वस्थ मनानेच जेजुरी सोडल तेव्हा दुरवर डोंगरावर गडापासुन दुर  माणसापुढे हतबल झालेला खंडोबा आपल्या परीवारासह आराम करत असल्याचा भास झाला.

सोन्याने मढवलेला किंवा पैश्यांचा बाजार मांडलेला देव मला खुप दीन दुबळा वाटतो.शिर्डी किंवा तिरुपती यापेक्षा गडावर असलेल्या छोट्याश्या मंदीरात असणारा  देवच मला भावतो.तिथल्या वातावरणातच मला जास्त समाधान लाभत.

काही समज - न झेपलेले!!

आपल्या समाजात जश्या पारंपारिक रूढी आहेत त्याप्रमाणेच काही समज पण आहेत...(खर तर गैरसमज म्हणल तरी चालेल की जे मला कधी झेपलेच नाही.).ज्यांना काहीच आधार नाही. आधार काय तो एवढाच की आपल्या वडील माणसांनी या समजांना मान्यता दिली आहे. (मोठ्यांनी मान्यता दिली म्हणल्यावर आपण काय बोलणार डोंबल??) या समजांविषयी खर तर मला खूप कुतुहुल आहे. हे अशे समज करून देण्यामागे काय कारण असु शकत. कोणाच्या सुपीक डोक्यातून हे सगळ बाहेर पडल आहे ते देव (देव काका नव्हे) जाणो.. आता अशेच काही समज पहा.

१. उचकी: कोणी तरी आठवण काढली की उचकी लागली असा एक समज. आता उचकी अन् आठवण यांचा कसा काय संबंध??? हे मला तरी समजण्या पलीकडे आहे. (अस असल तर काजोल ला सारख्याच उचक्या लागल्या पाहिजे....मला तिची नेहमी आठवण येते.) उचकी वरुन पिंजरा मध्ये लिहलेल गाण तर माहीतच असेल.
जेव्हा छाती व पोट यामधील पडदा आणी बरगड्यांमधील स्नायू यांचे आकुंचन होते,  डायफ्रामच्या आकुंचनामुळे फुफ्फुसातील हवा श्वासनलिकेतुन बाहेर टाकल्या जाते व व्होकल कॉर्ड जवळ-जवळ आल्यामुळे आवाज होतो. हीच उचकी होय. हे जर त्याच शास्त्रीय कारण असेल तर हा समज नक्की कुठुन आला???

२. शिंक: कोणी काही बोलत असेल अन् त्या दरम्यान कोणी शिंकल तर लगेच माणूस नकळत बोलून जातो बघ.."सत्य है.."
आता जर शिंक देण्यावरून जर किंवा खोट ठरणार असेल तर न्यायालयात पुराव्यांची गरज नाही. जबानी देताना जर शिंक आली किंवा नाही आली यावरून सार सिद्ध करायच. फक्त कल्पना करा शिंक या गोष्टीवर जर न्यायालये चालायला लागली तर काय धमाल येऊन जाईल.

३. तीन तिघाड काम बिघाड : अस म्हणतात महत्वाच्या कामाला जाताना तिघांनी जाउ नये नाही तर काम होत नाही. तीन तिघाड काम बिघाड....हे अगदी लहानपणा पासून मनावर बिंबवल आहे. अगदी नाइलाज असेल अन् तिघांना जावा लागत असेल तर खिशात सोबतीला एक लहानसा दगड ठेवायचा म्हणजे मग चार जण असा त्याला तोडगा. पण हा तोडगा करताना त्याला अट आहे ती म्हणजे हा दगड एकाने दोघांना समजणार नाही या पद्धतीने गुपचुप उचलायचा. ( हा समज आमच्या भागात भरपुर आहे बाकी कुठे आहे की नाही याची कल्पना नाही)
आता या मध्ये तीन लोक असल्यावरच काम का होत नाही??? चार किंवा दोन असतील तर का काम होत.यामागच लॉजिक काय माहीत नाही. (बहुतेक ज्यानी समज करून दिला त्याला ३ बायका होत्या बहुतेक.एकवेळी दोघी सांभाळु शकतो पण  तीन कश्या सांभाळणार म्हणून हा समज करून दिला असेल..)

४.डोळा लवणे/ फ़डफ़डणे:पुरुषाचा उजवा डोळा अन स्त्रीचा डावा डोळा लवणे हा आपल्याकडे शुभ किंवा शकुन मानला जातो. डोळा उजवा लवला तर चांगली घटना अन डावा लवला तर वाइट घटना घडणार हे पुरुषांसाठी व स्त्रियांसाठी याच्या अगदी विरुद्ध. हे अस का हे पण माहित नाही.

५. तळहाताला खाज सुटणे: हाताच्या तळव्याला खाज सुटणे हे पैसा य़ेणार याची पुर्वसुचना आहे असा समज आहे.
अहो अस जर असेल तर अंबानी बंधुंना तर दिवस रात्र तळहात खाजवत बसायला लागेल.

आता पर्यंत आपण अवयवनिष्ट समज पाहिले आता जरा पक्षी निष्ठ पाहु या...

१.मांजर आडवे जाणे:मला वाटत हा सर्वात प्रसिद्ध असा समज आहे.या विषयी न बोलणे उत्तम.बिचार मांजर बदनाम झाल आहे या कारणा मुळं.

२.कुत्रा इवळणे:अहो बरोबर लिहलय...कुत्रा भुंकतो मान्य आहे....मग हे इवळणे काय??? खुपदा कुत्रा भुंकण्याऐवजी विचित्र आवाज काढतो त्याला इवळणे अस म्हणतात. जर कुत्रा कधी अस ओरडायला लागला तर कोणी तरी ओळखीच म्रुत्यु पावणार आहे असा समज आहे. आता यात किती तथ्य आहे हे ठावुक नाही. कधी कधी तरी केवळ योगा योग म्हणुन असे प्रसंग घडले पण असतील पण यावरुन त्याबद्दलची सत्यता सिद्ध होत नाही.

३.पाल:पाल अंगवार पडली तर तो अपशकुन मानतात. पण हीच पाल जर अक्षय त्रुतीयेला दिसली तर तो शुभ शकुन मानला जातो.काही लोकांच्या म्हणण्यानुसार अक्षय त्रुतीयेला कधीच पाल दिसत नाही. अगदी प्रयत्न करुन पण पाल दिसणार नाहीच अस म्हणतात.

४.टिटवी: टिटवी जर रात्री ओरडायला लागली तर तो अपशकुन मानला जातो.आमच्या आजी ला टिटवी ओरडायला लागली की जाम टेन्शन येत. तिचा या गोष्टीवर खुप विश्वास आहे.याच्या विषयी चर्चा करण्याच माझ कधी धाडस झाल नाही.

या सारखेच समज जो पर्यंत माणसाच्या जीवावर बेतत नाही तो पर्यंत ठीक आहे पण या अश्याच समजातुन जेव्हा नरबळी सारखे प्रकार घडतात तेव्हा मन विषण्ण होत.

हे समज आपल्या पुर्वजांपासुन चालत आले आहेत.हे बनवले गेले म्हणजे या मागे नक्कीच काहीतरी हेतु असणार आहे. हे सार कश्यासाठी.....का????

हा "का" नावाचा भुंगा नेहमीच खुप त्रास देतो....असो याच उत्तर तर काही मिळणार नाही...त्यामुळे जास्त विचार न करता आपल शांत बसाव..(आ....क.......छी.........शिंकलो पहा....सत्य है!!)

व्यक्ती आणि वल्ली...

आपल्या सभोवताली अशे खूप सारे नमुने (म्हणजे अशी लोक की त्यांच्या बोलण्याच्या लकबी किंवा काही तरी विचित्र वागायच) असतात की जे नकळत आपल्याला (म्हणजे आमच्या सारख्याना जे अश्या नमुन्यांच्या शोधात असतात) हसण्यासाठी भरपूर वातावरण निर्मिती करून देतात. अश्याच एका वल्ली विषयी आज लिहतोय. ते दुसरं कोणी नसून आमचे एक प्राध्यापक आहेत. (त्यांच्या विषयी पूर्ण आदर ठेवून लिहतोय).... पण कोणताही गैरसमज नको. फक्त विनोदी अंगाने पहा.

आमचे हे सर जेव्हा इंग्लिश बोलायचे तेव्हा आमचा अगदी मानसिक छळ असायचा.यांनी तृतीय वर्षात Fluid Mechanics तर शेवटच्या वर्षात Prestress Concrete Design शिकवला होता.

आम्ही तृतीय वर्षाला गेल्यानंतर पहिल्याच तासाला त्यांनी त्यांच्या विषयी सांगताना एक वाक्य वापरल अन् आम्ही फक्त बाकावर डोक आपटायच राहिलो होतो. ते म्हणाले होते...

I have two daughters both are girls.

या नंतर आमचा खूप स्नेह (स्नेह कसा असेल याचा अंदाज तुम्हाला आलाच असेल) वाढत गेला व आम्हाला अशेच भरपूर किस्से मिळत गेले. थोड्या दिवसात आम्हाला समजल की जर आपल सबमीशन अगदी विनासायास करायच असेल तर सरांसोबत फक्त इंग्रजीतून बोलायच. आपण इंग्रजीत बोलायला लागलो की आपोआप फाईल वर सही व्हायची.

या सरांमुळे आमच Probablity खूप चांगल झाल होत. यांना प्रत्येक दोन वाक्यांमध्ये You See  म्हणायची सवय होती. वाक्याची सुरूवात अन् अंत दोन्ही पण You See ने व्हायचा. मग काय संपुर्ण तासात आम्ही फक्त तेच मोजायचो.... किती वेळा म्हणतात ते.

यांच अजुन एक प्रसिद्ध वाक्य.....

Please close the Doors of Window.

शेवटच्या वर्षाला आम्हाला Prestress Concrete  विषय शिकवला होता...त्यात हे स्ट्रेस, स्ट्रेन, स्ट्रेट टेंडन अशे सगळे शब्द.

हे सर स्ट्रेस ला ट्रेस ....स्ट्रेन ला ट्रेन....स्ट्रेट ला ट्रेट...म्हणायचे...पहिल्या तासाला आम्हाला हे समजे पर्यंत आमच्या शिट्ट्या वाजल्या होत्या.

आम्हाला एकदा हे सर साईट विजीटला घेऊन गेले तिथे यांना आम्हाला बीम अन् कॉलम जॉइंट एक्सप्लेन करायच होत...यांनी कस सांगाव....

You See, This Bar Comes from there (उजवीकडे हात करून).... This Bars Comes from there (डावीकडे हात करून)  and You See all they are meet together here.

एकदा तास चालू असताना मी मस्ती करताना चुकुन पकडला गेलो तर यांनी मला अस सुनावल...

If you want to seat then seat, If you dont want seat then dont seat.

आता तुम्हाला अंदाज आलाच असेल यांचा तास म्हणजे आम्हाला किती मोठी पर्वणी होती. असो अशे खूप सारे किस्से आहेत यातले निवडक तेवढे सांगितले आहेत.

गूढ मृत्यू...

आज सकाळी स्टार न्युज वर संजय गांधीच्या मृत्यू वरचा "वो १२ मिनीट" हा रिपोर्ट पाहिला. आज पर्यंत त्यांच्या मृत्यू बद्दल खूप सार्‍या कथा आहेत पण सत्य मात्र काय आहे याबाबत कोणा कडेच ठोस असा पुरावा नाही. प्रत्येक जन आप आपल्या सोयी नुसार सांगत असतो. एकदा हाफिसात असाच या विषयावर काथ्या कूट चालू होता तेव्हा एका मित्राच्या म्हणण्या नुसार हा अपघात इंदिरा गांधीनी स्वतः घडवून आणला होता. त्याला याबाबत विस्तृत स्पष्टीकरण मागीतल तेव्हा मात्र त्याचा पोपट झाला.(च्यामारी उचलली जीभ लावली टाळ्याला)त्याच्या म्हणण्यानुसार संजय गांधी हे डोईजड झाले होते म्हणून त्यांची हत्या करण्यात आली. मला मात्र तो निव्वळ फालतुपणा वाटला. कोणतीच आई अस वागू शकत नाही.

असाच एक लेख महाजालावर वाचण्यात आला....तो इथे वाचू शकता

याच प्रमाणे अशे खूप सारे गूढ मृत्यू आहेत की ज्यांची आज पर्यंत उकल झालीच नाही. असाच एक प्रसिद्ध गूढ मृत्यू असणारी व्यक्ती म्हणजे नेताजी सुभाषचंद्र बोस. नेताजींच्या मृत्यू बद्दल कथा सांगाव्या तेवढ्या कमीच आहेत. सरकारने पण नेहमीप्रमाणे समित्या स्थापन करून याची उकल करण्याचा प्रयत्न केला.

स्वातंत्र्यानंतर, भारत सरकारने ह्या घटनेची चौकशी करण्यासाठी, १९५६ (शाह नवाझ समिती)  मध्ये एका आयोगाची नियुक्ती केली. त्या वेळा हाच निष्कर्ष निघाला की नेताजी त्या विमान अपघातातच मृत झाले होते. परंतु ज्या तैवानच्या भूमिवर हा अपघात झाल्याची खबर होती, त्या तैवान देशाच्या सरकारशी तर ह्या  आयोगांनी संपर्कच साधला नव्हता.

१९९९ साली मनोज कुमार मुखर्जी ह्यांच्या नेतृत्वाखाली तिसरा आयोग नेमला गेला. २००५ साली तैवान सरकारने मुखर्जी आयोगाला असे कळवले की १९४५ साली तैवानच्या भूमिवर कोणतेही विमान अपघातग्रस्त झालेच नव्हते. २००५ मध्ये मुखर्जी आयोगाने भारत सरकारला आपला अहवाल सादर केला. आयोगाने आपल्या अहवालात असे म्हटले की नेताजींचा मृत्यू त्या विमान अपघातात घडल्याचा कोणताही पुरावा उपलब्ध नाही. परंतु भारत सरकारने मुखर्जी आयोगाचा हा अहवाल नामंजूर केला.

ऑगस्ट १८, १९४५ च्या दिवशी नेताजी कसे व कुठे बेपत्ता झाले तसेच त्यांचे पुढे नक्की काय झाले, हे भारताच्या इतिहासातील सर्वात मोठे अनुत्तरीत रहस्य बनले आहे.

लाल बहादूर शास्त्री यांच्या ताश्कंद येथील मृत्यू हे सुद्धा असच एक एक गूढ आहे. त्यांचा नैसर्गिक मृत्यू होता की हत्या याबाबत ही वेगवेगळे मत प्रवाह आहेत पण सत्य काही माहीत नाही.

तशी गूढ म्रुत्युंची परंपरा ही अगदी इतिहासापासून आहे. अश्वत्थामा (हा अजुन जिवंत आहे अन् त्याला पाहण्यात आलाय अस काही लोकांचा दावा आहे) असो किंवा संत तुकाराम महाराज असो किंवा शिवाजी महाराज प्रत्येक मृत्यू मागे एक गूढ अन् त्यामागे प्रत्येकाची स्वतःची अशी एक कथा पण सत्य काय ते आजतागायत कधीच समजू शकल नाही किंवा यावर समाधानकारक संशोधन पण दिसत नाही...(हे माझ वैयक्तिक मत आहे)

आता नजीकच्या काळात पण असेच गूढ मृत्यू झाले जसे की डायना, मायकेल जॅक्सन, परवीन बॉबी, दिव्या भारती त्याविषयी पण फक्त  नवीन कथाच आल्या पण सत्य नाही.

अस म्हणतात की सत्य कधी लपून राहत नाही मग इतक्या वर्षा नंतरही हे सगळे मृत्यू गूढ बनून का आहेत?? यातील सत्य कधी बाहेर येईल की नाही कोणीच सांगु शकत नाही.

गर्जा महाराष्ट्र माझा...








एक स्वप्न घेऊन ५० वर्षापूर्वी संयुक्त महाराष्ट्राचा सुवर्ण कलश आला होता....या पन्नास वर्षात महाराष्ट्राने कला, क्रीडा, साहित्य, सामाजिक अश्या प्रत्येक क्षेत्रात आपला ठसा उमटावलाय....या सोबत मनाला सल लावतील अश्या घटना शिवारायांच्या स्वराज्यात घडल्यात... आजही आमचा शेतकरी वीज, पाणी यासारख्या मूलभूत गरजांपासुन वंचित आहे. खून. दरोडे, बलात्कार यासारखे गंभीर गुन्हे राजरोस घडत आहे..... माफिया राज वाढत आहे....दिल्लीच्या तख्ताला घाम फोडणार्‍या महाराजांच्या स्वराज्यात आता जोडे उचलण्याची परंपरा आली आहे. . . तरीही आम्ही आशावादी आहोत...हे सार बदलेल नव्हे आपण हे बदलण्याचा प्रयत्न करू या....पुढील पन्नास वर्षात नक्कीच महाराजांना अभिप्रेत असणार स्वराज्य उभ राहाव हीच आई जगदंबेच्या चरणी प्रार्थना!!!!

वॉलपेपर अच्युत पालव यांच्या साईट वरुन साभार!!!!

पोटोबा :घरची आठवण!!!

आज घरच्या जेवणाची खूप आठवण येत होती.... सदाशीव पेठेतील फडके हॉल जवळ आलो "पोटोबा- घरची आठवण" या पाटीने लक्ष वेधून घेतल मग काय क्षणाचाही विचार न करता बाइक समोर उभी केली. मेनु कार्ड बघुनच पोटातील कावळ्यांनी टाहो फोडला. मेनु ऐकायचे आहेत काय....ऐका..... वरणफळ,फोडणीचा भात,फोडणीची पोळी, वरण भात तूप, मसाले भात, काजू उसळ,सुधारस पोळी, खिचडी कढी एकाहून एक अशे मेनु होते. हे पाहा मेनु कार्ड.....





काय ऑर्डर करावं हा प्रश्न पडला होता सगळेच मेनु आवडीचे होते. शेवटी माप नेहमी प्रमाणे मटकी उसळीच्या पारड्यात पडल.
मटकी उसळ, भाकरी, फोडणीचा भात, दही,सोलकढी अशी ऑर्डर दिली. आता कावळयांनी कल्लोळ मांडला होता.१० मिनिटातच ऑर्डर हजर झाली.

ही पहा मटकी भाकरी....





फोडणीचा भात आणि दही....



ही आपली ऑल टाइम फेवरीट...."सोलकढी"


इथल्या भाजीची चव अगदी घरच्या सारखी आहे. खूप प्रकारच्या भाज्या इथे उपलब्ध आहेत. स्पेशल मालवणी फुड पण आहे.
एकदा तरी याची चव चाखलीच पाहिजे अस हे हॉटेल आहे.

जेवण झाल्यावर हॉटेलच नाव अगदी समर्पक आहे याची खात्री पटते.

 पुण्यात कोथरूड, सहकारनगर,सदाशीव पेठ,एफ.सी.रोड यावर ६ शाखा आहेत "पोटोबा" च्या.

तर मग कधी जाताय पोटोबाला??? अन् हो तुम्हाला कंपनी हवी असेल तर मला नक्की बोलवा...मी तयारच आहे!!!!

टीप : सदर हॉटेल हे फक्त घास फूस स्पेशल आहे. 

सचिन: वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!!!!

आमच्यासाठी क्रिकेटचा देव असणार्‍या आमच्या सर्वांच्या सचिनला वाढदिवसाच्या शुभेच्छा!!!! विक्रमांचे असेच डोंगर रचत रहा!!!















बेल्ह्याचं चिकन!!

माझ्या सारख्या घास फूस वाल्याच्या ब्लॉगवर चिकनची पोस्ट....यात एवढ नवल वाटण्यासारख काय आहे??? स्वतःला चिमटा वगैरे बिलकुल काढू नका. अहो मी तंगडी खात नसलो तरी खाउ नक्की घालतो. त्यामुळे आता अस नव्या नवलाई ने पाहु नका. मग सुरूवात करू का पोस्टला???

बेल्हे ...जुन्नर तालुक्याच्या पूर्व भागातील एक मुख्य बाजार पेठ. बेल्हयाच प्रसिद्ध काय विचाराल तर. . .एक म्हणजे बैल बाजार (टिंग्या चित्रपटात जो बैल बाजार दाखवला आहे तो इथलाच) अन् दुसर म्हणजे इथ मिळणार गावरान चिकन. अहो सर्वात महत्वाच सांगायच राहिलं, माझ्या सारख्या प्रसिद्ध (कु-प्र नाही) व्यक्तीमत्वाच जन्मगाव. . .:)

बेल्हयाचा बाजार हा दर सोमवारी असतो. मात्र आजूबाजूच्या परिसरातील शेतकरी रविवारीच मुक्कामी बैल विक्री साठी घेऊन येतात. त्यांच्या जेवणाची सोय म्हणून ही झोपडी वजा हॉटेल सुरू झाली. याला आमच्या परीसरात "पाल" म्हणतात. पुर्वी हे व्यावसायिक ताडपत्रीच्या मदतीने रविवार अन् सोमवार या २ दिवसांसाठी झोपड्या उभारायचे. काळा बरोबर झोपड्यांच रूप बदलल आता तिथे पत्र्याचे शेड उभी राहिलीत तरी पण त्याला अजूनही त्याला "पालं"म्हणतात.आमच्याकडे चिकन खायला जायच यासाठी प्रतिशब्द आहे "पालात जाउ या". रविवारी जेवायला पालात जाणार म्हणजे चिकनचा बेत आहे हे समजून घ्यायच.

तर ह्या चिकनच वैशिष्ट म्हणजे  हे अस्सल गावरान कोंबडीच असत अन् ते ही चुलीवर शिजवलेल. सोबत चुलीवर केलेली बाजरीची भाकरी असते.खाली दिलेल्या फोटूत पाहा...उजव्या बाजूला चूल मांडलेल्या त्यावरच तुमच्या समोर अगदी गरमा गरम भाकरी करून देतात आहेत अन् डाव्या हाताला आहे ते चिकन, सूप ई...



हे पाहा सुकं चिकन:



इथे तुम्हाला रस्सा वेगळा मिळतो तो अंडी टाकून.


हे आहे चिकन सूप. आमचे परम स्नेही हेम्या जोगळेकर (नावावर जाउ नका) ७-८ वाट्या सूप हाणतो.


 ही चुली वरची गरमा गरम भाकरी


घास फूस वाल्यांसाठी (माझ्या जमातीतले) इथे खास मटकी भाकरी किंवा मास वडी (हा प्रकार तुम्हाला माहीत नसेल लवकरच यावर विस्तृत स्वरुपात पोस्ट लिहील) असते.


इथे बसायला तुम्हाला टेबल खुर्ची मिळणार नाही. शेणाने सारवलेल्या जमिनीवर भारतीय बैठक मारुन बसायच.

तर मग कधी येताय आमच्या बेल्हयाच्या पालात???

टीप: हे चिकन फक्त रविवारीच असत इतर दिवशी आलात तर कोंबडीची पंख अन् हाडकं चघळायला मिळतील.

जगातभारी कोल्हापुरी!!!

माथा टीप (हक्क सुरक्षित वटवट सत्यावान ) : पोस्ट नाव वाचून पांढरा रस्सा, तांबडा रस्सा, तंगडी या अपक्षेने वाचायला जाल तर पोपट होईल. ही पोस्ट घास फूस स्पेशल आहे. याची नोंद घ्यावी.

गेले २-३ आठवडे जगातभारी कोल्हापुरी, अख्खा मसूर स्पेशालिस्ट चा बोर्ड खुणावत होता पण तिथ जाण्याचा योग काही येत नव्हता. ३-४ वेळा प्लान करून पण ऐनवेळी पोपट झाला होता. ते म्हणतात ना...समय से पहले और भाग्य से अधिक कभी कुछ नही मिलता.


गुरुवारी नेहमीप्रमाणे स्वामी समर्थ मठात गेलो होतो. तिथून बाहेर पडताना जेवायचा विचार करत होतो ...तेवढ्यात क्‍लिक झाल जगातभारी कोल्हापुरीवर हल्ला बोल राहिलाय. मग काय क्षणाचाही विचार ना करता बाइक थेट जगातभारी कोल्हापुरीच्या दिशेने पळवली. हॉटेल मध्ये प्रवेश केला पाहील तर विशेष अशी गर्दी नव्हती...गर्दी म्हणजे आम्ही दोघे अन् अजुन दोघेजण अशे चार जण तिथे होतो. टेबलवर जाउन बसलो तर वेटर ने छोट्या वाटीत थोडी मसूर भाजी चव चाखण्यासाठी आणून दिली. मेनु कार्ड अगोदर सॅंपल आल्यामुळे आम्ही जरा कनफ्युज झालो होतो. कनफ्युजन मध्येच भाजीची चव घेतली...वाह काय चव होती!!!
चला जागा चुकली नाही याच समाधान होत.
मेनू कार्ड


आता मेनु कार्ड आल त्यावर पाहील तर फक्त एकाच भाजी होती : "अख्खा मसूर"....बाकी काहीच नाही.

म्हणजे आता चॉइस ला काही वाव नव्हता फक्त हाफ की फूल एवढच सांगायच होत.

रिस्क नको म्हणून हाफ अख्खा मसूर, रोटी अन् सोलकढी ऑर्डर केली.
अख्खा मसूर
सोलकढी



१० मिनिटात ऑर्डर आली.. रोटीची साइझ पाहून धक्काच बसला....आपल्या नेहमीच्या रोटीपेक्षा दुप्पट साइझ होती.



जोरात भूक लागली होती त्यामुळे सगळ्यावर आडवा हात मारला.

सोलकढी तर अप्रतिम होती.आत्मा अगदी तृप्त झाला.

नावाप्रमाणेच खरोखर अख्खा मसूर स्पेशालिस्ट आहे.

थोडी माहिती घेतल्यावर समजल कोल्हापुरात पण असच हॉटेल आहे.

ह्या हॉटेलच वैशिष्ट हेच आहे , इथे फक्त एकाच प्रकारची भाजी मिळते. बाकी काही नाही.

एकदा तरी ह्याची चव चाखलीच पाहिजे.

काय म्हणताय तुम्हाला पण जायचय....पत्ता हवा आहे...घ्या मग

"जगातभारी कोल्हापुरी
तावरे कॉलनी, सिटीप्राइड समोर,
सातारा रोड, पुणे."

इथे अख्खा मसूर व्यतरीक्त सोलकढी नक्की ट्राय करा!!!

भगतसिंग, राजगुरू व सुखदेव स्मृतीदिन

भगतसिंग :
वयाच्या २३ व्या वर्षी (ज्या वयात आम्हाला काहीच अक्कल नव्हती) हिंदुस्थानच्या स्वातंत्र्यासाठी हसत हसत फासावर फासावर लटकलेला एक महान क्रांतीकारक!!!! त्यांच हे बलिदान हे फक्त त्यांच्या उत्कट देश प्रेमाच एक प्रतीक आहे.

कुसुमाग्रजांच्या शब्दात सांगायच झाल तर. . .


'जरी न गातील भाट डफावर तुझे यशोगान, सफल जाहले तुझेच हे रे, तुझेच बलिदान' 


शिवराम हरी राजगुरू: 





 पराकोटीच देशप्रेम, त्याग, निष्ठा याच मूर्तीमंत उदाहरण!!!
















 सुखदेव :




















भगतसिंग, राजगुरू व सुखदेव यांचा आज स्मृतीदिन. . . त्यांच्या पवित्र स्मृतीस विनम्र अभिवादन!!!!

 

माझ्या हिंदुस्थानात भामट्या राजकीय नेत्यांचे वाढदिवस लक्षात राहतात त्यांना नोटांचे हार घातले जातात पण ज्यांनी या देशासाठी सर्वस्व दिल त्यांच्या नशिबी मात्र आजही उपेक्षाच आहे या गोष्टीच नक्कीच खूप वाईट वाटतय!!!!

इन्किलाब जिन्दाबाद!!! जयहिंद!!!
 

गुढी पाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा!!!






या शुभ मुहूर्तावर सारी दुःख विसरून, प्रेमाची गुढी उभारूया!!
हे नववर्ष आपणा सर्वांस सुख समृद्धी, यशाचे व भरभराटीचे जावो हीच स्वामी चरणी प्रार्थना!!!
सर्व वाचकांस हिंदू नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!!!!

शुभेच्छा पत्र मायाजालावरून साभार.

विंदा: भावापूर्ण श्रद्धांजली

विंदा गेले. . .मराठी साहित्य विश्वातील अजुन एक तारा निखळला. कवी, लेखक, समीक्षक अस अष्टपैलू हे व्यक्तीमत्व. आपल्या काव्य प्रतिभेने त्यांनी संपुर्ण मराठी साहित्य विश्व समृद्ध केलय.


"अष्टदर्शने" या काव्यसंग्रहासाठी त्यांना २००३ साली "ज्ञानपीठ पुरस्कार" देऊन गौरवण्यात आल होत. त्यावेळी "पुरस्कार म्हणजे माझ्या एकट्याचा सन्मान नाही, तर मराठी भाषा, कविता आणि काव्य पंरपरेचा हा सन्मान आहे. आज मी फक्त त्याचे केंद्र झालो आहे", अशा शब्दांत विंदांनी भावना व्यक्त केल्या.


विंदाना भावापूर्ण श्रद्धांजली. ईश्वर त्यांच्या आत्म्यास शांती देवो!!!
 
विंदांचे छायाचित्र विकीपेडीया वरुन साभार!!!

"उनाडक्या"!!!!!

तुम्हाला कं ची बाधा झाली आहे का??? किंवा रोज तेच साचेबद्ध जीवन जगून वैताग आलाय. . . अन् तुम्हाला आयुष्यात काही तरी बदल किंवा थ्रिल हव आहे का??? ( अगदी मुझे चेंज चाहिये स्टाइल!!! :)) तर यावर अगदी रामबाण उपाय सांगतो. . . तो म्हणजे एक संपुर्ण दिवस किंवा जसा वेळ मिळेल त्याप्रमाणे "उनाडक्या" करा.

उनाडक्या म्हणजे काही प्लॅन करायचा नाही. . . काही ठरवायच नाही त्या क्षणी मनाला जी गोष्ट करावीशी वाटते ती करायची म्हणजे थोडक्यात सांगतो "आली लहर केला कहर". यात बघा खादाडी, बाइकवर फिरण , चित्रपट पाहण , आवडत्या व्यक्तींना सरप्राइज देण, मनसोक्त खरेदी, विंडो शॉपिंग ई. येत. आपल्या मनाला वाटेल अन् ज्या गोष्टीतून आनंद मिळेल अशी कोणती पण गोष्ट करायची पण ती ही अगदी अचानक.

मला "कं" ची बाधा ही फार पटकन होते. त्यामुळे माझ्या उनाडक्या ह्या सतत चालूच असतात. अन् हे आता पासून नाही करत अगदी शाळेत असल्यापासून करतोय. मला अस वाटत रोज रोज ते एक सारख जगात राहिला तर आयुष्यातील थ्रिल निघून जात. जर आयुष्यातील थ्रिल अनुभवायच तर मग किमान एक दिवस तरी जरा वेगळ जगून बघा मग जाणवेल आयुष्य खूप सुंदर आहे.

आता माझ्या थोड्या उनाडक्या सांगतो. माझ शालेय शिक्षण सगळ ग्रामीण भागात झाल. माझ्या सोबटचे मित्र मंडळ होते ते बहुतेक सगळे बागाईतदार शेतकरी. त्यामुळे सुट्टी असेल त्या दिवशी आमच घोड चौखूर उधळायच. दिवसभर कोणाच्या तरी शेतावर आम्ही पडीक असायचो. त्या दिवशी अगदी मनसोक्त हुंदडायच. जेवणाला सुट्टी देऊन फक्त रान मेवा चरायचा. काय खायच ते सीझनवर अवलंबुन असायच बोर, चिंचा, कैर्‍या, चिकू, शिताफळ, जांभळ, उस याचा फडशा पडायचा. द्राक्ष सीझन मध्ये तर आम्ही बागेत बसूनच द्राक्ष खायचो. कधी तरी मग कोणाही मित्राच्या शेतावर गेल की त्यांच्या घरीच जेवण व्हायची. मेनु म्हणजे चुली वरची भाकरी अन् काळ्या मसाल्यातील कोणतीही भाजी (आमच्या बोली भाषेत "कालवन" अन् ग्रामीण भाषेत "कोड्यास"). तुम्हाला सांगतो या मेनुची सर कशालाच नाही. संध्याकाळी तिथेच गुळाचा चहा व्हायचा. तुम्हाला सांगतो तुम्ही जर चहाचे चाहते असाल तर आयुष्यात एकदा तरी गुळाचा चहा प्या तो ही चुलीवरचा. (आहा हा. . आता आठवूनच इच्छा झाली आहे.)खाण्याबरोबरच आम्ही शेतीची पण काम करायचो (अर्थातच जीवाला झेपतील अशीच) त्यात मला शेतीला पाणी द्यायला खूप आवडायच.

जसा मोठा झालो तसा हे सार माग पडल. इंजिनिअरिंगला गेल्यानंतर मग गावी जाण कमी झाल गेलो तरी सुट्टीमध्ये ते पण ४-५ दिवसच. हॉस्टेलला आल्यानंतर सुद्धा उनाडक्या करत राहिलो पण फक्त स्वरूप बदलल.

हॉस्टेलला असताना आम्ही "निशाचर" या गटात गणलो जायचो. आमचा दिवस हा रात्री ८ नंतर सुरू व्हायचा. तेव्हा भूत ह्या प्रकाराविषयी खूप क्रेझ होती.खुपदा या विषयावर गप्पांचे फड जमायचे. एकदा रात्री अशीच चर्चा रंगली होती तेव्हा किरण ह्या आमच्या मावळ्या कडून समाजल की हॉस्टेलच्या पाठीमागे दूरवर असणार्‍या खडी मशीनच्या परीसरात भुताचा वावर आहे. बस हे समजल अन् त्या क्षणाला आम्ही १० जण कपांउड वॉलवरुन उड्या मारुन भूत पाहिला गेलो होतो. वेळ होती मध्यरात्री २.००ची. रात्रभर भटकलो भूत तर काही मिळाल नाही पण भटक्‍या कुत्र्यांनी मात्र चांगल पळवल होत.

रोज कॉलेज, कट्टा याचा एकदा जाम "कं" आला होता .हॉस्टेलला पण जावस वाटत नव्हत. म्हणून मी अन् राहुल्या सिक्स सिटरला बसलो अन् बारामातीला गेलो. पिक्चर ला जायचा पण मुड नव्हता काय कराव ह्या विचारात एस.टी. स्टॅंड ला जाउन बसलो. थोडा वेळ तिथे टी.पी. केला. त्यानंतर मी सहज राहुल्याला म्हणालो मला आता झोपावसं वाटतय. . .साहेबांनी क्षणाचाही विलंब ना करता मला एस.टी. स्टॅंड वरील बाकडा दाखवला म्हणाला " जा झोप." तुला कोण ओळखणार आहे. विचार पटला. . . एस.टी. स्टॅंडवरच मी चक्क १तास निवांत ताणून दिली होती. मी झोपलो म्हणून राहुल्याने पण समोरच्या बाकावर ताणून दिली होती. त्यानंतर भिगवन चौकात जाउन मिसळ चापली. इकडे तिकडे बागडलो अन् परत हॉस्टेलला आलो.

पुण्यात आल्यावर नोकरी लागली. . .स्व कमाइवर उनाडपणा करण्यात मजा काही औरच आहे. . .आता ह्या उनाडक्या थोडक्यात सांगतो.

१. मे महिन्यात भर दुपारच्या उन्हात बाइकवर बर्मुडा अन् टी शर्टवर हेम्याच्या घरी तासगावला हापूस आंबे खाण्यासाठी.
२. एका रविवारी सकाळी लवकर (अर्थात आंघोळ न करता) सोलापूर हाय वेला मिसळ खायला.
३. मध्यरात्री एक वाजता मी, हेम्या आणि सच्या आम्ही दीड डझन आंबे चापले होते
४. मुसळधार पावसात लोहगड आणि निलकंठेश्वरचा ट्रेक तो पण बर्मुडा अन् टी शर्टवर
५. क्रेडीट कार्ड वर एकावेळी ३०,००० ची खरेदी. . .(ज्याचे व्याजासहित ४५,००० भरलेत. :( )
६. संध्याकाळी हाफिसातून कल्टी मारुन हडपसर वरुन दुर्गाला कॉफी मारायला.
७. हाफिसातून हाफ डे घेऊन बालगंधर्व च्या कट्ट्यावर टी.पी किंवा पिक्चरला.
८. कधी तरी फक्त भेळ, पाणी पुरी, वडा पाव, एस.पी.डी.पी यावर दिवस काढायचा.
९. लक्ष्मी रोडला संध्याकाळी फक्त भटकायच ते पण कोणतीही खरदीए न करता.
१०. सार्वजनिक पेपर वाचनालय़ असत तिथे जाउन सगळे पेपर वाचून काढायचे.

अस खूप सार. . . जे आपल्या मनाला आवडेल ते. . .ते अगदी क्षणार्धात. . .कोणताही विचार ना करता. . .( फक्त क्रेडीट कार्ड वापरताना विचार करा!!!)

ज्या दिवशी तुम्ही अस वेगळ काही तरी कराल त्यानंतर पाहा आपोआप तुमचा मूड अगदी मस्त होऊन जाईल.

एक गोष्ट लक्षात ठेवा
"आहात तरुण, घ्या "उनाडक्या" करून
उद्या गेलात मरून तर टाकतील पुरून"


काय म्हणताय मग. . .तर चला जास्त विचार न करता तुम्ही पण सुरू करा "उनाडक्या"!!!!!

शिव पराक्रम गीत!!!!

अफजल खान जेव्हा स्वराज्यावर चाल करून आला होता त्यावर आधारीत हे स्फुरण गीत आहे. हे कोणी लिहलय हे माहीत नाही.हे माझ्याकडे संग्रहित आहे.







दुंदुभी निनादल्या , दशदीशा कडाडल्या
केशरी गुहेसमीप उन्मत्त हत्ती चालला ||

वाकुनि आदिलशहास कुर्निसात देऊनी
प्रलय काल तो प्रचंड खान निघे तिथुनी
हादरली धरणीव्योम, शेष ही शहारला
केशरी गुहेसमीप उन्मत्त हत्ती चालला. . . ||१||

खान चालला पुढे अफाट सैन्य मागुनी
उंट, हत्ती, पालख्या ही रांग लांब लांबती
टोळधाड निघे ही स्वतंत्रता गिळावया
केशरी गुहेसमीप उन्मत्त हत्ती चालला . . .||२||

तुळजापूरची भवानी माय महान मंगला
राउळात अफजलखान दैत्यासह पोहचला
मूर्ती भंगली मनात चित्रगुप्त हासला
केशरी गुहेसमीप उन्मत्त हत्ती चालला. . . ||३||

श्रवनी तप्त तेल से शिवास वृत्त पोहचले
रक्त तापले करार खडग सिद्ध जाहले
कालियास मर्दण्यास कृष्ण सिद्ध जाहला
केशरी गुहेसमीप उन्मत्त हत्ती चालला. . . ||४||

सावधान हो शिवा वैर्याची रात्र ही
काळ येत असे समीप साध वेळ तूच ही
देऊनी बळी आजास तो शक्ती भवानीला
केशरी गुहेसमीप उन्मत्त हत्ती मारला. . .मारला. . .मारला ||५||

प्रोजेक्ट बटरफ्लाय!!!

Siproeta epaphus, Butterfly World (Florida)Image via Wikipedia



जर तुम्ही कॅडवर काम करत असाल अन् तुम्हाला तुमचे फाईल क्लायंट सोबत शेअर करायचे असेल ते ही ऑटो कॅड या सॉफ्टवेअर शिवाय ??? तर याच उत्तर आहे "प्रोजेक्ट बटरफ्लाय."

प्रोजेक्ट बटरफ्लाय ही ऑटोडेस्कच नवीन टूल आहे. की ज्यामुळे आपण आपल्या वेब ब्राउअजर मधून कॅड फाईल पाहु किंवा एडीट करू शकता. हा टूल डाउनलोड करण्यासाठी तुम्हाला ऑटोडेस्क लॅब वर अकाउंट असणे आवश्यक आहे किंवा तुम्ही ऑटोडेस्कचे सबस्क्रीपशन युजर असाल तर त्या अकाउंट वरुन सुद्धा हा टूल डाउनलोड करू शकता.

प्रोजेक्ट बटरफ्लाय हा वेब टूल वापरण्यासाठी खालील ब्राउअजर असणे आवश्यक आहे.
१. फायर फॉक्स ३.० किंवा त्यापुढील
२. गुगल क्रोम
३. आय.इ. ७
४. सफारी ३.० किंवा त्यापुढील

ह्या टूल विषयी अधिक माहितीसाठी इथे टिचकी मारा.

हा टूल वारण्यासाठी इथे टिचकी मारा.

Reblog this post [with Zemanta]

अफ़लातून हिंदी!!

आपण हिंदी बोलताना खुपदा मराठी शब्द वापरतो अन् मग एकच धमाल येते. . . .यावर एक मेल आली होती त्यावरूनच ही पोस्ट. काही वाक्य मेल मधील आहेत अन् काही मी तयार केलीत.

१. वो उंच जिने से धापकन पड्या अन् काडकन हात का हाड मोड्या.

२. पहले नदी में पोह्या बाद में समंदर मे शिरा फिर पोह्या.

३. ये टी. वी. आपको कितने मे गिरी.

४. हम लिंब घेंगे तो घेंगे नही घेंगे तो नही घेंगे

५. खा खा लाजू नका याच हिंदी : "खाओ, खाओ, शरम तो है नही"

६. "ईतना मोठा खड्डा खणके रखा है यहा से कैसे वळेंगे"

७. एक माणूस दुकानदाराला तांदुळ न घेण्याच कारण सांगताना. . ."तुम्हारे तांदुळ में बहोत खडा है"

८. हमारे टी. वी. में मुंग्या मुंग्या दिखते है.

९. गहू जरा बारीक दळो पिछली बार बहोत जाडा दळ्या था.

१०. मांडी घाल के नीचे बैठो.

११. रांगेत उभ असताना. .. " थोडा थोडा आगे सरको "

होळी : एक आठवण!!!




होळी म्हणलं की मला माळेगाव हॉस्टेल आठवते. हॉस्टेल लाइफ मधील त्या ४ वर्षातील प्रत्येक होळी आम्ही अगदी अविस्मरणीय अशी साजरी केली. त्या दिवसातील मजा काही औरच होती. तेव्हा आम्ही होळी, धुलीवंदन अश्या दोन्ही दिवशी रंग खेळायचो.

होळीच्या अगोदर आठवडाभर आमची तयारी चालू व्हायची. होळीच्या वेळी आमचे गट पडायचे त्यात प्रामुख्याने हॉस्टेल ग्रूप ( म्हणजे आमचा), तावरे कॉम्प्लेक्स, पिंक हाउस, L८, L१ अशे सारे असायचे सर्वांना मध्ये एक स्पर्धा असायची. कोणत्या ग्रुपला कस रंगवायच याच सार नियोजन व्हायच. अगदी युद्धाला जशी तयारी चालू असते अगदी तसच. बारामातीला जाउन वेगवेगळ्या रंगांची खरेदी व्हायची.

त्या दिवशी सकाळच्या आंघोळीला सट्टी देऊन पहिली मिटिंग व्हायची ती शिवा भाउ च्या टपरीवर. तिथे वडा पाव अन् चहाच्या सोबतीने सगळ्या ग्रुपला नियोजनाप्रमाणे सूचना दिल्या जायच्या. मग सगळे मावळे मोहीमेवर निघायचे.

एखाद सावज पुढे आल की शिकारी जसा तुटुन पडतो अगदी त्याप्रमाणेच आम्ही प्रत्येकावर तुटुन पदायचो.त्यात कोणाकडून विरोध झाला की अजुन धमाल यायची. काही जण रंगाची अॅलर्जी आहे, आजारी आहे अशी कारण सांगुन फक्त कपाळाला गंध लावल्यासारखा रंग लावा असा आग्रह करायचा. आम्ही पण त्याच्यावर उपकार करून त्याला फक्त गंध लावल्यासारखा रंग लावायचो पण गळे भेट घेताना नकळत डोक्यात रंगाची पूड सोडून द्यायचो. आम्ही निघताना त्याच्या चेहरा चला बुवा सुटलो असाच आविर्भाव असायचा. आमचा प्रताप मात्र त्याला सकाळीच आंघोळीला गेल्यावरच समजायचा.

अहो एकदा तर लहु म्हणून एक मित्र आहे आमचा, होळीच्या दिवशी भल्या पहाटेच तो गायब झाला तो थेट रात्रीच आला. तो पर्यंत आमच्याकडील रंग संपले होते. आता करायच काय??? त्याला रंगावायच तर होतच पण गेट बंद झाल्यामुळे आम्ही बाहेर जाउ शकत नव्हतो. खूप विचार करूनही काही मार्ग सापडत नव्हता. शेवटी मार्ग सापडला म्हणतात ना " इच्छा असेल तर मार्ग दिसेल." माझा रूम पार्टनर रोज सकाळी कच्च अंड खायचा. आम्ही ती अंडी घेऊन त्याच्या डोक्यावर एक अन् एक बर्मुडामध्ये फोडल. अन् अशाप्रकारे अंड्याने आमची मोहीम फत्ते केली होती.

आम्ही सकाळी जे बाहेर पडायचो ते थेट संध्याकाळीच परतायचो. प्रत्येक होळीला आमचा एक रिवाज होता रंग खेळुन झाला की संध्याकाळी शर्ट फाडण्याचा कार्यक्रम व्हायचा. म्हणजे संध्याकाळी परत येताना कॅम्पस मध्ये प्रवेश झाला की रंगाने भरलेले एकमेकांचे शर्ट फाडून ते आजूबाजूच्या झाडांवर लटकावयचे. दुसर्या दिवशी जर पाहील तर सगळ्या झाडांवर रंगी बेरंगी शर्ट लटकलेले असायचे.

आज पण जेव्हा ते आठवतो तेव्हा खूप बोअर वाटत. ते दिवस परत येणार नाही हे माहीत आहे पण आता तशी होळी खेळायच ठरवल तरी खेळता येत नाही. आताची होळी ही प्रोजेकटच्या रंगात खेळली जाते. खूप सार काम, सबमिशनच्या डेड लाईन्स, मिटींग्स, इश्युज यामध्येच इंजिनिअरींग नंतरच्या होळी खेळली आहे.

असो शेवटी काय. . ." सरले ते दिवस राहिल्या त्या फक्त आठवणी"

मराठी दिनाच्या शुभेच्छा!!!!




लाभले अम्हांस भाग्य बोलतो मराठी,
जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी,
धर्म,पंथ,जात एक जाणतो मराठी,
एवढ्या जगात माय मानतो मराठी.

जागतिक मराठी दिनाच्या सर्व वाचकांस हार्दिक शुभेच्छा!!!!

सचिनची कामगिरी : मॅनेजरच्या नजरेतून!!!


कॉर्पोरेट जगात सचिनच्या कालच्या कामगिरीच मुल्यांकन कस होईल अन् ते ही मॅनेजरच्या नजरेतून. . .याची एक मला मेल आली होती तीच खाली देत आहे. मजेशीर वास्तव आहे!!!!


The appraisals are at door steps……be ready for the comments like below from your beloved managers…..

200 Runs/ 147Balls/ 25X4 / 3X6





Agree you have done GREAT BUT BUT BUT BUT


25 x 4s = 100
3 x 6s = 18


IT implies that you have done 118 Runs in 28 Balls.

And 12 x 2s = 24
58 x 1s = 58


IT means you have done all 200 Runs in only 98 balls

So you have wasted 147-98 = 49 balls

Considering only 1 run scored on each of these balls you could have earned 49 valuable RUNS FOR OUR TEAM

MANAGER’S COMMENT: So you only met the expectations and NOT EXCEEDING (though anyone of our team could not do it) and your Grade is MEDIUM

Trainings for him: Learn from how to STEAL singles. ( you better know what I mean stealing single )

काय म्हणताय अगदी बरोबर आहे की नाही????

सचिन तुस्सी ग्रेट हो!!!!




खूप दिवसाची सल होती आज अखेर ती पूर्ण झाली. सचिन तुला मानाचा मुज़रा!!!!

च्यायला हाफ़िसात असल्यामुळ आज तुझी खेळी पाहु शकलो नाही पण आता हायलाइट नक्की बघतो!!!

सईद अन्वरच रेकॉर्ड अखेरीस आज मोडलस नाही रे. . . तोडून, फोडून, मोडून काढल. . . नादभरी, नाद खुळा अन् गणपती पुळा. . . .चाबुक. . . .शब्द नाही आहेत आज वर्णन करायला.

फक्त एकच म्हनीन. . . .

झाले बहू . . . होतील बहू. . . पर या सम हाच!!!

प्रेमातला मी!!!

लग्न जमलं अन् त्या नंतर माझ आयुष्यच बदलून गेल आहे. मनमौजी पणे भटकणारा मी टोळभैरव आता जरा जबाबदारीने वागायला लागलो आहे . .( म्हणजे खूप असा नाही पण थोडा थोडा). . .सगळ्यात मोठा बदल म्हणजे माझा दिनक्रम बदलला आहे.

इथून मागे दिवसाची सुरूवात घड्याळाच्या गजराने व्हायची ( बिचारा कोकलून कोकलून जीव द्यायचा अन् त्यानंतर आमची स्वारी जागी व्हायची) आता मात्र दिवसाची सुरूवात मात्र गुड मौर्निंग च्या मेसेजने होते. सकाळी नाश्ता केला का?? केला नाही तर थोडस रागावण असत पण ते ही प्रेमाने. मग दुपारी पुन्हा एखादा मेसेज किंवा फोन. जेवण झाल का?? काय करतोय?? काम खूप आहे का?? अस खूप काही. . .( सार लिहियालाच हव का??? समजून घ्या की) अस थेट रात्री झोपेपर्यंत चालू असत.

तुम्हाला सांगतो सुरुवातीला हे सार जरा जडच गेल. . अहो हे पहिलच प्रेम आहे ना?? इथून मागे आयुष्यात कॅड, रेवीट, सिवील ३डी अशे सगळे सॉफ्टवेअर अन् त्यांचे प्रॉब्लेम होते. त्यामुळे ह्या नवीन बदलामुळे थोड अजीर्ण झाल पण आता ठीक आहे. पुर्वी मी माझ्या धुंदीत जगायचो.वाटेल तेव्हा जेवण, वाटेल तेव्हा भटकणे. मनाला जे वाटेल तेच करायचो.

तुम्हाला सांगतो हाफिसात असताना जर मला फोनवर कोणी काय करतो आहे अस विचारल तर मी त्याला अगदी पुणेरी उत्तर द्यायचो पण आता उत्तर असत " काही नाही तुझ्या फोनची वाट पाहत होतो" , " तुझाच विचार करत होतो ई. उत्तर देतो". :) ( द्यावी लागतात अशी उत्तर. . .आता शिकलो आहे मी पण!!!)

तसा मी शुद्ध शाकाहारी पण माझ्या मोबाईलचा इनबॉक्स मात्र शुद्ध मांसाहारी. त्यामुळे सुरुवातीला आमची मेसेज पाठवायची बोंब होती. पण ह्यावेळी पण नेहमी प्रमाणे आपला गुगल बाबा मदतीला आला. चांगले मेसेज शोधून दिले गुगल बाबाने. आता इनबॉक्स बराचसा शाकाहारी झाला आहे.

ह्या २-३ महिन्याच्या अनुभवातून मी एक गोष्ट अगदी खात्री ने सांगतो. . . बायको ने विचारलेल्या प्रश्नांना उत्तर देणे याहून अवघड काही असूच शकत नाही. जो कोणी अगदी बायकोला आवडेल अशी म्हणजे तिच्या दृष्टीने योग्य अशी उत्तर देईल तो जगातील कोणतीही पझल सोडवू शकतो.

आता आमच्या मधील काही प्रश्नोत्तर सांगतो.

१. सध्या घराच काम चालू आहे त्यामुळे खर्च भरपुर चालू आहे. त्यावरील प्रश्न

ती: आपल्या घराच काम चालू आहे खूप खर्च झाला असेल ना???
मी: हो झाला. . .करावा तर लागणार नाही तर घर कस होईल.

आता तुम्ही मला सांगा इथे मी काय चुकीच उत्तर दिल?? तिच्या नुसार ह्या प्रश्नाच उत्तर म्हणजे किती पैसे खर्च झाला हे मी सांगाव. आता मी गरीब बिचारा हेच लक्षात ठेवल...खर्च खूप झाला असेल ना?? असा प्रश्न आला की सरळ रक्कम सांगुन द्यायची. अन् त्याप्रमाणे काही दिवसा नंतर असा प्रश्न आल्यावर मी प्रामाणिक पणे रक्कम सांगुन टाकली तर म्हणे मी तुला हिशोब थोडी विचारला आहे, तू असा का वागतोस, इ.इ.

आता काय बोलाव कपाळ??

२. ती: (बोटातील एंगेजमेंट रिंग दाखवत) कशी दिसते आहे???
मी: छान आहे.

आता याहून वेगळ काय बोलू शकतो मी?? या नंतर तिच्या दृष्टीने मला कौतुक करता येत नाही. मी व्यवस्थित प्रतिक्रिया देऊ शकत नाही किंवा मला रिअॅक्ट करायला जमत नाही. यापासून धडा घेतला अन् पुढच्या वेळी अगदी चांगल भर भरून कौतुक केल पण ते जरा जास्तच झाल. यावर माझ काय झाल असेल ते आता तुमच्या लक्षात आलच असेल.

३. ती जर म्हणाली ह्या इथे आईस क्रीम छान मिळत हं आपण येऊ या एकदा . . .तर आपण समजून घ्यायच आता आईस क्रीम खायचा मूड आहे. म्हणजे हे फक्त मी उदाहरणादाखल दिल अशे खूप सारे प्रसंग असतात आता तिथ समय सूचकता दाखवून रिअॅक्ट कस व्हायच ते ही अगदी बायकोच्या मनासारख. . .इथेच तुमच खर कौशल्य आहे.

थोडक्यात काय तर सध्या माझा अभिमन्यू झाला आहे!!!

( पण खर सांगु यात पण मजा आहे. . . फक्त ती मजा आपण घ्यायला शिकल पाहिजे.)