एक स्वप्न घेऊन ५० वर्षापूर्वी संयुक्त महाराष्ट्राचा सुवर्ण कलश आला होता....या पन्नास वर्षात महाराष्ट्राने कला, क्रीडा, साहित्य, सामाजिक अश्या प्रत्येक क्षेत्रात आपला ठसा उमटावलाय....या सोबत मनाला सल लावतील अश्या घटना शिवारायांच्या स्वराज्यात घडल्यात... आजही आमचा शेतकरी वीज, पाणी यासारख्या मूलभूत गरजांपासुन वंचित आहे. खून. दरोडे, बलात्कार यासारखे गंभीर गुन्हे राजरोस घडत आहे..... माफिया राज वाढत आहे....दिल्लीच्या तख्ताला घाम फोडणार्या महाराजांच्या स्वराज्यात आता जोडे उचलण्याची परंपरा आली आहे. . . तरीही आम्ही आशावादी आहोत...हे सार बदलेल नव्हे आपण हे बदलण्याचा प्रयत्न करू या....पुढील पन्नास वर्षात नक्कीच महाराजांना अभिप्रेत असणार स्वराज्य उभ राहाव हीच आई जगदंबेच्या चरणी प्रार्थना!!!!
वॉलपेपर अच्युत पालव यांच्या साईट वरुन साभार!!!!
Widget by Css Reflex | TutZone
4 comments:
राजे ... तुमच्या स्वप्नातला महाराष्ट्र घडवायला आम्हाला शक्ती दया...
खूप सुंदर. गेल्या पन्नास वर्षात आपण संयुक्त महाराष्ट्रात काय मिळवलं अन काय गमावलं? हे पहाण्याची वेळ आता आलेली आहे.
ठणठणपाळांचा एक इ मेल आला होता ,बऱ्याच लोकांना मी तो फॉर्वर्ड पण केलाय - बहुतेक तुला पण केला असावा. असो.
जाउ दे बरंच मोठ होंतंय, एक पोस्ट लिहितो यावर .. :)
महाराष्ट्र दिनाच्या दिवसही ’असा’ महाराष्ट्र कधी घडेल याची वाट पहाणेच केवळ आपल्या हाती आहे.
"गर्जा महाराष्ट्र माझा..." आशा आहे महाराजांचे स्वप्न लवकरच साकार होईल... सगळे मिळून ते करूच.
Great post!! I will also say,
महाराजांना अभिप्रेत असणार स्वराज्य उभ राहाव हीच आई जगदंबेच्या चरणी प्रार्थना!!!!
Post a Comment