पोटोबा :घरची आठवण!!!

आज घरच्या जेवणाची खूप आठवण येत होती.... सदाशीव पेठेतील फडके हॉल जवळ आलो "पोटोबा- घरची आठवण" या पाटीने लक्ष वेधून घेतल मग काय क्षणाचाही विचार न करता बाइक समोर उभी केली. मेनु कार्ड बघुनच पोटातील कावळ्यांनी टाहो फोडला. मेनु ऐकायचे आहेत काय....ऐका..... वरणफळ,फोडणीचा भात,फोडणीची पोळी, वरण भात तूप, मसाले भात, काजू उसळ,सुधारस पोळी, खिचडी कढी एकाहून एक अशे मेनु होते. हे पाहा मेनु कार्ड.....

काय ऑर्डर करावं हा प्रश्न पडला होता सगळेच मेनु आवडीचे होते. शेवटी माप नेहमी प्रमाणे मटकी उसळीच्या पारड्यात पडल.
मटकी उसळ, भाकरी, फोडणीचा भात, दही,सोलकढी अशी ऑर्डर दिली. आता कावळयांनी कल्लोळ मांडला होता.१० मिनिटातच ऑर्डर हजर झाली.

ही पहा मटकी भाकरी....

फोडणीचा भात आणि दही....ही आपली ऑल टाइम फेवरीट...."सोलकढी"


इथल्या भाजीची चव अगदी घरच्या सारखी आहे. खूप प्रकारच्या भाज्या इथे उपलब्ध आहेत. स्पेशल मालवणी फुड पण आहे.
एकदा तरी याची चव चाखलीच पाहिजे अस हे हॉटेल आहे.

जेवण झाल्यावर हॉटेलच नाव अगदी समर्पक आहे याची खात्री पटते.

 पुण्यात कोथरूड, सहकारनगर,सदाशीव पेठ,एफ.सी.रोड यावर ६ शाखा आहेत "पोटोबा" च्या.

तर मग कधी जाताय पोटोबाला??? अन् हो तुम्हाला कंपनी हवी असेल तर मला नक्की बोलवा...मी तयारच आहे!!!!

टीप : सदर हॉटेल हे फक्त घास फूस स्पेशल आहे. 

20 comments:

भानस said...

हॉटेलचे नाव आणि मिळणारे पदार्थ... दोन्हीही छानच आहेत. चला पुढच्या वेळी येऊ तेव्हां एकदा जायला हवे. सोलकढी झिंदाबाद. आठवणीने घासफूस वाल्यांसाठी एक चांगले ठिकाण सांगितल्याबद्दल... धन्सं.

रोहन चौधरी ... said...

अरे.. तो सोलकढीचा ग्लास इकडे पाठव रे... मला सुद्धा निषेध करायला दिल्याबद्दल धन्यवाद... :D

हेरंब said...

झक्कास.. कावळ्यांनी थैमान घातलाय पोटात.. निषेध !!

नाव काय जब-या आहे.. पोटोबा काय.. घरची आठवण काय.. लय भारी. बहुतेक तू सगळ्या लय भारी नावं असलेल्या हाटेलातच जेवायला जातोस वाटतं. आधीचं ते जगातभारी कोल्हापुरी आणि आता हे .. हा हा

आनंद पत्रे said...

पुण्याला आल्यावर एकापेक्षा जास्त दिवस लागतील असा अंदाज आहे.... मस्तच..

canvas said...

पोटोबा...घरची आठवण

पुण्याला आलो कि जाउन यायला पाहिजेल तिकडे
ठिकाण सांगितल्याबद्दल... धन्सं.

मनमौजी said...

श्री ताई नक्की ये....मी आहेच सोबतीला...:)

मनमौजी said...

रोहन नेहमी नेहमी काय आम्हीच निषेध करायचा.....कधी तरी तू पण करत जा.....सोलकढी पाठवली आहे बघ...

मनमौजी said...

हेरंब अरे मी नाव पाहूनच गेलो होतो....नाव वाचल्या मला वाटलच होत काही तरी भन्नाट खादाडी होणार ते....

मनमौजी said...

आनंद चांगला २-३ दिवसाचा प्लॅन करून ये रे!!! भरपूर भटकू या!!!

मनमौजी said...

कॅनवास....ब्लॉगवर आपल स्वागत.... पुण्यात आल्यावर नक्की जाउन या....

सोनाली केळकर said...

पोटोबा मस्त आहे रे. पण रेट जरा जास्त वाटतात. भाकरी भाजी - ५०रु?

मनमौजी said...

सोनाली हादडायच म्हणल्यावर मग काय करणार??? पर्याय नाही...

tanvi said...

आता कसे शहाणे बाळ ते.... आज नो निषेध... जुनमधे येतेय मी... बरं झालयं नवे नवे ठिकाण सुचवतो आहेस ते!!!

बाकि सोलकढीने जीव घेतला रे बाबा :)

मनमौजी said...

जून मध्ये येते आहेस काय??? वक्के.....तोपर्यंत अजुन नवनवीन स्पॉट शोधून ठेवतो.....

अभिलाष मेहेन्दळे said...

वाह! सही जागा आहे रे... बेल्हे आणि पोटोबा... आता पुण्याला येणं प्रास्त आहे!

Anuja Khaire said...

Sahi !!!!

उर्मी said...

ही पोस्ट मित्र मैत्रिणींना वाचण्यासाठी पाठवली आहे,
ते जातीलच ‘पोटोबा‘कडे यात शंका नाही.

मनमौजी said...

उर्मी...प्रतिक्रियेबद्दल आभार अन् ब्लॉगवर स्वागत!!!

त्यांना कंपनी हवी असेल तर जाईन मी...:)

अपर्णा said...

काय योगायोग आजच सोलकढी केली होती ती रिचवुनच हे फ़ोटो पाहातेय (अर्थात सामिष जेवणाबरोबर) सो नो निषेध...छान आहे वर्णन...

मनमौजी said...

वा....मजा आहे की मग!!!! थोडी इकडे पण पाठव...:)