बेल्ह्याचं चिकन!!

माझ्या सारख्या घास फूस वाल्याच्या ब्लॉगवर चिकनची पोस्ट....यात एवढ नवल वाटण्यासारख काय आहे??? स्वतःला चिमटा वगैरे बिलकुल काढू नका. अहो मी तंगडी खात नसलो तरी खाउ नक्की घालतो. त्यामुळे आता अस नव्या नवलाई ने पाहु नका. मग सुरूवात करू का पोस्टला???

बेल्हे ...जुन्नर तालुक्याच्या पूर्व भागातील एक मुख्य बाजार पेठ. बेल्हयाच प्रसिद्ध काय विचाराल तर. . .एक म्हणजे बैल बाजार (टिंग्या चित्रपटात जो बैल बाजार दाखवला आहे तो इथलाच) अन् दुसर म्हणजे इथ मिळणार गावरान चिकन. अहो सर्वात महत्वाच सांगायच राहिलं, माझ्या सारख्या प्रसिद्ध (कु-प्र नाही) व्यक्तीमत्वाच जन्मगाव. . .:)

बेल्हयाचा बाजार हा दर सोमवारी असतो. मात्र आजूबाजूच्या परिसरातील शेतकरी रविवारीच मुक्कामी बैल विक्री साठी घेऊन येतात. त्यांच्या जेवणाची सोय म्हणून ही झोपडी वजा हॉटेल सुरू झाली. याला आमच्या परीसरात "पाल" म्हणतात. पुर्वी हे व्यावसायिक ताडपत्रीच्या मदतीने रविवार अन् सोमवार या २ दिवसांसाठी झोपड्या उभारायचे. काळा बरोबर झोपड्यांच रूप बदलल आता तिथे पत्र्याचे शेड उभी राहिलीत तरी पण त्याला अजूनही त्याला "पालं"म्हणतात.आमच्याकडे चिकन खायला जायच यासाठी प्रतिशब्द आहे "पालात जाउ या". रविवारी जेवायला पालात जाणार म्हणजे चिकनचा बेत आहे हे समजून घ्यायच.

तर ह्या चिकनच वैशिष्ट म्हणजे  हे अस्सल गावरान कोंबडीच असत अन् ते ही चुलीवर शिजवलेल. सोबत चुलीवर केलेली बाजरीची भाकरी असते.खाली दिलेल्या फोटूत पाहा...उजव्या बाजूला चूल मांडलेल्या त्यावरच तुमच्या समोर अगदी गरमा गरम भाकरी करून देतात आहेत अन् डाव्या हाताला आहे ते चिकन, सूप ई...हे पाहा सुकं चिकन:इथे तुम्हाला रस्सा वेगळा मिळतो तो अंडी टाकून.


हे आहे चिकन सूप. आमचे परम स्नेही हेम्या जोगळेकर (नावावर जाउ नका) ७-८ वाट्या सूप हाणतो.


 ही चुली वरची गरमा गरम भाकरी


घास फूस वाल्यांसाठी (माझ्या जमातीतले) इथे खास मटकी भाकरी किंवा मास वडी (हा प्रकार तुम्हाला माहीत नसेल लवकरच यावर विस्तृत स्वरुपात पोस्ट लिहील) असते.


इथे बसायला तुम्हाला टेबल खुर्ची मिळणार नाही. शेणाने सारवलेल्या जमिनीवर भारतीय बैठक मारुन बसायच.

तर मग कधी येताय आमच्या बेल्हयाच्या पालात???

टीप: हे चिकन फक्त रविवारीच असत इतर दिवशी आलात तर कोंबडीची पंख अन् हाडकं चघळायला मिळतील.

22 comments:

हेरंब said...

हा हा.. झक्कास. म्हणजे पोस्ट रे .. चिकनातलं काय कळतंय मला. बाकी तू घासफूस वाला आहेस यावर विश्वास बसणार नाही कोणाचा ही पोस्ट बघून.'पूर्वी खायचो पण आता सोडलं' कॅटेगरीतला वाटतोयस :-)

अपर्णा said...

ओ अच्छा बेल्ह्याचा का तू??? जसं काय मला तिथला कानाकोपरा माहित....:))पण टिंग्या पाहिलाय त्या जोरावर एवढं बोललं तर चालेल नं...
अरे नॉन घासफ़ुसवाल्यांचे (आणखी चांगला शब्द सुचवा नं कुणी) दुवा घेशील....मुंबईपासुन लांब आहे नाहीतर हे फ़ोटो दाखवले तर माझा नवरा तुरुतुरु पळेल त्या कोंबडीसाठी.....मस्तच आहेत को.भा...पाणी आलंय बास....निषेध....

भानस said...

तुझ्या ब्लॉगवर चिकनची पोस्ट म्हटल्यांवर मी जरा चकितच झाले... सगळे दिसतेय तरी सणसणीत... मला भाकरीत इंटरेस्ट... पटकन पानात घेऊन लसणीच्या वाटलेल्या चटणीबरोबर खावीशी वाटली...." पाल " माहित होते पण पालात जाऊयाची गोम कळली. नवरा खूश झाला रे फोटू पाहून...:)

Yogesh said...

हेरंब ...अरे बाबा माझ्या गळ्यात लहानपणापासून तुळशीची माळ आहे....कधीच खाल्ल नाही रे!!!

Yogesh said...

अपर्णा....मुंबई आलीस का एक दिवस प्लॅन करून येऊन जा....आमच्या कडे भटकायला पण खूप सारे स्पॉट आहेत!! नॉन घास फूस वाल्यांसाठी नाव हेरंबच सुचवेन!!

Yogesh said...

श्री ताई...भाकरी अन् लसनाची चटणी....एकदम फेवरिट डिश!!!

हेरंब said...

अरे घासफूसवाल्यांसाठी मी मागेच नाव सुचवलंय. तन्वीच्या घासफूस वाल्या पोस्ट वर. 'शुशा'.. :-)

नसेल आवडलं तर दुसरं शोधू.. हाय काय नाय काय..

आनंद पत्रे said...

लय भारी आनं लय मोठा निषेध... एव्हड्या सगळ्यात ती भाकरी खरोखरीच सुंदर दिसत आहे बरंका... तोंडाला पाणी सुटेश... बेल्ह्याचा बेत करुन कळवितो तुला आता, तू तयार रहा

आर्यन केळकर said...

आज संध्याकाळी मी आणि नवरा ’पुरेपुर कोल्हापुर’ मध्ये जाणार होतो. पण सहज नेटवर मेन्यु शोधला त्यांचा. एकही पदार्थ नाही आपल्यासारख्यांना खायला. त्यामुळे डिनर व्हेन्यु चेंज.
सोनाली केळकर

आर्यन केळकर said...

अरे पोस्टबद्दल सांगायचच राहिलं, फोटोतली भाकरीमस्त दिसत्ये. आजीकडे खल्ली आहे चुलीवरची भाकरी, मस्त लागते.
सोनाली केळकर

Yogesh said...

आनंद चालेल रे...मी कधी पण तयार आहे!!!

Yogesh said...

पुरेपूर कोल्हापुरला आपल्यासाठी काहीच नाही.... पुण्यात.नवीन सुरू झाल होत तेव्हा मी गेलो पण पोपट झाला होता!!! आता दुसरा कोणता तरी स्पॉट शोधा!!

tanvi said...

हे बघ निषेध..... :(

पोस्टसाठी नाही ही पोस्ट टाकण्यासाठी.... बाकि भाकरी मलाही हवी, लसणाच्या चटणीसोबत....

Yogesh said...

धन्यवाद तन्वी!!! अरे फक्त पोस्ट टाकली आहे.....शेवटी आपण एका जमातीले आहोत!!!

अभिलाष मेहेन्दळे said...

"Ignorance is bliss" या वाक्यप्रचाराला स्मरुन कडकडून निषेध! तिथे जाणं सध्यातरी शक्य नाही आणि एकदातरी तिथे जेवल्याशिवाय पिंडाला कावळा शिवणे नाही. असले अत्याचार त्वरित थांबवण्यात यावे :))

Yogesh said...

आभिलाष...प्रतिक्रियेबद्दल आभार अन् ब्लॉगवर आपल स्वागत!!!

yogik said...

belhyala mitranbarobar jaaycho!pan kadhi mutton chya watela nay gelo.
mi pan ghaas-phus wala!
bhau majhe lahanpani ektr yaayache tewha pahile palaala jayache! majhya aathwani jaagya jhalya!

सौरभ said...

सुभानअल्लाह... तबियत खुष कर दी...

सौरभ said...

सुभानअल्लाह... तबियत खुष कर दी...

Kanchan Karai (Mogaraafulalaa) said...

सगळ्या भावना कंठाशी दाटून आल्या ना! एका घासफूसवाल्याने नॉन घासफूसवाल्यांना अशा प्रकारे मांसाहाराच्या मोहात पाडण्याची पहिलीच वेळ असेल. जबरी पोस्ट आहे. सगळं फोटोतून काढून काढून खावंसं वाटतंय.

Pankaj - भटकंती Unlimited said...

कधी जायचं मंग पालात?
च्यायला तो जोगळेकर एकदमच कंडम निघाला रे... फक्त ७-७ वाट्याच?

सिद्धार्थ said...

रच्याक... फोटो जबरी आहेत, तोंडाला पाणी सुटलं नां भाऊ.