काही समज - न झेपलेले!!

आपल्या समाजात जश्या पारंपारिक रूढी आहेत त्याप्रमाणेच काही समज पण आहेत...(खर तर गैरसमज म्हणल तरी चालेल की जे मला कधी झेपलेच नाही.).ज्यांना काहीच आधार नाही. आधार काय तो एवढाच की आपल्या वडील माणसांनी या समजांना मान्यता दिली आहे. (मोठ्यांनी मान्यता दिली म्हणल्यावर आपण काय बोलणार डोंबल??) या समजांविषयी खर तर मला खूप कुतुहुल आहे. हे अशे समज करून देण्यामागे काय कारण असु शकत. कोणाच्या सुपीक डोक्यातून हे सगळ बाहेर पडल आहे ते देव (देव काका नव्हे) जाणो.. आता अशेच काही समज पहा.

१. उचकी: कोणी तरी आठवण काढली की उचकी लागली असा एक समज. आता उचकी अन् आठवण यांचा कसा काय संबंध??? हे मला तरी समजण्या पलीकडे आहे. (अस असल तर काजोल ला सारख्याच उचक्या लागल्या पाहिजे....मला तिची नेहमी आठवण येते.) उचकी वरुन पिंजरा मध्ये लिहलेल गाण तर माहीतच असेल.
जेव्हा छाती व पोट यामधील पडदा आणी बरगड्यांमधील स्नायू यांचे आकुंचन होते,  डायफ्रामच्या आकुंचनामुळे फुफ्फुसातील हवा श्वासनलिकेतुन बाहेर टाकल्या जाते व व्होकल कॉर्ड जवळ-जवळ आल्यामुळे आवाज होतो. हीच उचकी होय. हे जर त्याच शास्त्रीय कारण असेल तर हा समज नक्की कुठुन आला???

२. शिंक: कोणी काही बोलत असेल अन् त्या दरम्यान कोणी शिंकल तर लगेच माणूस नकळत बोलून जातो बघ.."सत्य है.."
आता जर शिंक देण्यावरून जर किंवा खोट ठरणार असेल तर न्यायालयात पुराव्यांची गरज नाही. जबानी देताना जर शिंक आली किंवा नाही आली यावरून सार सिद्ध करायच. फक्त कल्पना करा शिंक या गोष्टीवर जर न्यायालये चालायला लागली तर काय धमाल येऊन जाईल.

३. तीन तिघाड काम बिघाड : अस म्हणतात महत्वाच्या कामाला जाताना तिघांनी जाउ नये नाही तर काम होत नाही. तीन तिघाड काम बिघाड....हे अगदी लहानपणा पासून मनावर बिंबवल आहे. अगदी नाइलाज असेल अन् तिघांना जावा लागत असेल तर खिशात सोबतीला एक लहानसा दगड ठेवायचा म्हणजे मग चार जण असा त्याला तोडगा. पण हा तोडगा करताना त्याला अट आहे ती म्हणजे हा दगड एकाने दोघांना समजणार नाही या पद्धतीने गुपचुप उचलायचा. ( हा समज आमच्या भागात भरपुर आहे बाकी कुठे आहे की नाही याची कल्पना नाही)
आता या मध्ये तीन लोक असल्यावरच काम का होत नाही??? चार किंवा दोन असतील तर का काम होत.यामागच लॉजिक काय माहीत नाही. (बहुतेक ज्यानी समज करून दिला त्याला ३ बायका होत्या बहुतेक.एकवेळी दोघी सांभाळु शकतो पण  तीन कश्या सांभाळणार म्हणून हा समज करून दिला असेल..)

४.डोळा लवणे/ फ़डफ़डणे:पुरुषाचा उजवा डोळा अन स्त्रीचा डावा डोळा लवणे हा आपल्याकडे शुभ किंवा शकुन मानला जातो. डोळा उजवा लवला तर चांगली घटना अन डावा लवला तर वाइट घटना घडणार हे पुरुषांसाठी व स्त्रियांसाठी याच्या अगदी विरुद्ध. हे अस का हे पण माहित नाही.

५. तळहाताला खाज सुटणे: हाताच्या तळव्याला खाज सुटणे हे पैसा य़ेणार याची पुर्वसुचना आहे असा समज आहे.
अहो अस जर असेल तर अंबानी बंधुंना तर दिवस रात्र तळहात खाजवत बसायला लागेल.

आता पर्यंत आपण अवयवनिष्ट समज पाहिले आता जरा पक्षी निष्ठ पाहु या...

१.मांजर आडवे जाणे:मला वाटत हा सर्वात प्रसिद्ध असा समज आहे.या विषयी न बोलणे उत्तम.बिचार मांजर बदनाम झाल आहे या कारणा मुळं.

२.कुत्रा इवळणे:अहो बरोबर लिहलय...कुत्रा भुंकतो मान्य आहे....मग हे इवळणे काय??? खुपदा कुत्रा भुंकण्याऐवजी विचित्र आवाज काढतो त्याला इवळणे अस म्हणतात. जर कुत्रा कधी अस ओरडायला लागला तर कोणी तरी ओळखीच म्रुत्यु पावणार आहे असा समज आहे. आता यात किती तथ्य आहे हे ठावुक नाही. कधी कधी तरी केवळ योगा योग म्हणुन असे प्रसंग घडले पण असतील पण यावरुन त्याबद्दलची सत्यता सिद्ध होत नाही.

३.पाल:पाल अंगवार पडली तर तो अपशकुन मानतात. पण हीच पाल जर अक्षय त्रुतीयेला दिसली तर तो शुभ शकुन मानला जातो.काही लोकांच्या म्हणण्यानुसार अक्षय त्रुतीयेला कधीच पाल दिसत नाही. अगदी प्रयत्न करुन पण पाल दिसणार नाहीच अस म्हणतात.

४.टिटवी: टिटवी जर रात्री ओरडायला लागली तर तो अपशकुन मानला जातो.आमच्या आजी ला टिटवी ओरडायला लागली की जाम टेन्शन येत. तिचा या गोष्टीवर खुप विश्वास आहे.याच्या विषयी चर्चा करण्याच माझ कधी धाडस झाल नाही.

या सारखेच समज जो पर्यंत माणसाच्या जीवावर बेतत नाही तो पर्यंत ठीक आहे पण या अश्याच समजातुन जेव्हा नरबळी सारखे प्रकार घडतात तेव्हा मन विषण्ण होत.

हे समज आपल्या पुर्वजांपासुन चालत आले आहेत.हे बनवले गेले म्हणजे या मागे नक्कीच काहीतरी हेतु असणार आहे. हे सार कश्यासाठी.....का????

हा "का" नावाचा भुंगा नेहमीच खुप त्रास देतो....असो याच उत्तर तर काही मिळणार नाही...त्यामुळे जास्त विचार न करता आपल शांत बसाव..(आ....क.......छी.........शिंकलो पहा....सत्य है!!)

24 comments:

हेरंब said...

खरंय रे. हे सगळे प्रश्न असेच्या असे मला पडलेले आहेत कैक वर्षं.. उत्तरं कधीच मिळाली नाहीत :(

अपर्णा said...

हम्म...वेगळा टॉपिक...उत्तर मिळत नाहीत. करमणूक मात्र भरपूर होते रे योगेश.

Maithili said...

Mast aahe post...!!!
100% agreed to Aparna taai... :-)

आनंद पत्रे said...

मांजरीचं सोडून बाकी सगळे मनोरंजक आहेत (म्हणजे मला वाटतात)...
मांजर जर आडवी गेली तर इंटरनेट पण स्लो होतं हे मात्र खरं ;-)

THEPROPHET said...

काहीतरी बेसिक फंडा असणार..आणि तो लॉजिकल असणार..मग तिथून अपभ्रंशाला सुरूवात झाली असेल. मग एकाचे दोन, दोनाचे तीन...आणि सध्या हे असं इल्लॉजिकल झालंय सगळं...
चालायचंच...कळेल कधीतरी...आपल्या पुढच्या पिढ्या काहीतरी वेगळे समज बाळगतील..संगणक हॅन्ग झाल्यावर, मोबाईल वाजल्यावर अमुक होतं वगैरे..;)
अजून एक मला ठाऊक असलेला, सकाळि भारद्वाज दिसला की दिवस मस्त जातो...
सातारला आमच्या घराशेजारी भरपूर भारद्वाज आहेत...माझे दिवस मस्त जातात सातार्‍यात!..;)

Yogesh said...

हेरंब ...अशे खूप प्रश्न आहेत रे...ज्यांची उत्तर कधी मिळणारच नाहीत.

Yogesh said...

अपर्णा...अगदी बरोबर....करमणूक मात्र खूप होते.

Yogesh said...

मैथिली...धन्यु!!!

Yogesh said...

आनंद...अनुभवाचे बोल आहेत वाटत.

Yogesh said...

विभी मला पण तेच म्हणायाच आहे यामागे नक्कीच काही तरी लॉजिक असणार पण आपण मात्र त्यापासून वंचित आहोत...तू म्हणतोय ते भविष्यात शक्य आहे.

अभिलाष मेहेन्दळे said...

चांगला विषय निवडलास! पुरावा नाहीये पण माझ्यामते जुन्या काळी करमणूकीची इतर साधनं नसल्याने वेळ घालवण्यासाठी हे सगळे "फ़ंडे" बनवले गेले असतील. कालांतराने त्यात अंधश्रद्धा मिसळली गेली असेल आणि परिणाम आपण सगळॆ जाणतोच.

भानस said...

आहेत खरे हे सारे अजब ठोकताळे. शिवाय ते इतके अंगवळणी पडलेत की अनेकदा आपणही ( ह्यात खरे तर काही तथ्य नाही हे माहित असूनही ) बोलून जातोच. :)

Yogesh said...

अभिलाष....कदाचित असु शकेन...प्रतिक्रियेबद्दल आभार!

Yogesh said...

श्री ताइ खुप दिवसांनी प्रतिक्रिया आली...मस्त वाटल..:)

Anonymous said...

एकदम जबरया रे...
श्री ताई बरोबर आहे ग आपण हे मानत नसलो तरी रस्त्यावरुन कुत्रा आडवा गेला तर काही नाही पण मांजर आडवी गेली कि मनात विचार येतोच...

श्रिया (मोनिका रेगे) said...

मस्तच लिहिले आहेस रे...विषय छान आहे.

Yogesh said...

देवेन...धन्यवाद!!

Yogesh said...

श्रेता....धन्यु...:) :)

Anuja Khaire said...

हा "का" नावाचा भुंगा नेहमीच खुप त्रास देतो.....
बरोब्बर! या वेगळ्या विषयावर छान लिहील आहे!

Anonymous said...

मस्त लिहील आहे. वेगळा विषय आहे. हटके विषय असे सहज लिहिले तर त्यातील मर्म पण सहज कळते.

Yogesh said...

अनुजा ताइ ब्लॉगवर तुमच स्वागत....प्रतिक्रियेबद्दल आभार!!

सौरभ said...

अजुन काही समज आहेत.
काच फुटणे शुभशकुन, सहाण किंवा कास्याची वाटी तडकणे अशुभ, उंबरठ्यावर शिंकणे अशुभ, डाव्या पायाने प्रवेश करणे वा बाहेर पडणे... अनेक आहेत, आणि सगळ्याच समाजात आहेत. :D

Smitin Brid said...

होय. हे सगळे प्रश्न समोर आहेतच. कमाल म्हणजे अनेक 'गुरुं'जवळ त्यांची स्पष्टीकरणे पण असतात....

विशेषतः मांजर जेव्हा आपल्या रस्त्यातून आडवी जाते तेव्हा आपण हे विसरतो कि मांजर सुद्धा कुठे तरी जात आहे....आपण पण तिच्या रस्त्यात येतोय ते.....

Free Spirit said...

मला हेच सगळे प्रश्न पडले होते. बर वाटलं वाचून की असेच तुलापण पडेल होते :-)
मस्त! फारच आवडलं.