बाबा कदम - भावपुर्ण श्रद्धांजली!!!!




बाबा कदम यांच निधन झाल. . .मराठी साहित्यविश्वातील एक तारा निखळला. . . . त्यांची लिखाण शैली अशी काही होती की अवघ्या मराठी मनाला भुरळ घातली होती. . .त्यांची कादंबरी एकदा वाचायला घेतली की ती पूर्ण होइपर्यंत चैन पडत नाही. मला आवडलेल्या त्यांच्या काही कादंबरी अन् कथा संग्रह : डार्करूम, भालू,बालंट, बिनधास्त, मानसकन्या. अजुन आहेत पण आता आठवत नाही.

अश्या या प्रसिद्ध कादंबरीकार आणि वाचकप्रिय लेखकास भावपुर्ण श्रद्धांजली!!!!!

बाबा कदम यांचे छायाचित्र मराठीमाती वरुन साभार!!!!

दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा!!!!




-------------------------------------------------------------------------------------

सर्व वाचकांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा!!!!

चला परीवर्तन घडवू या!!!!




उद्या मतदान . . .चला सगळे मिळून परीवर्तन घडवू या!!!

"अभी नाही तो कभी नाही" हे विसरू नका.


"मतदान करताना ते व्यक्ती सापेक्ष करा"


" लोकशाहीच्या पवित्र मंदिरात लायाकी नसलेल्या लोकांना पाठवू नका"


" स्वच्छ, प्रामाणिक अन् सुशिक्षित व्यक्तीलाच आपल अमुल्य मत द्या"


"व्यवस्था अन् सरकार म्हणजे आपणच आहोत. . त्यामुळे अकार्यक्षम अन् भ्रष्ट व्यवस्थेचा आपण स्वीकार करणार नाही हे दाखवून द्या"


" आजपर्यंत तुम्हाला गृहीत धरून ज्यांनी गाळीच्छ राजकारण केल आहे त्यांना लायकी दाखवून द्या"


"भ्रष्ट व्यवस्था अन् निष्क्रीय नेते यांच्याविषयी जो राग आहे तो आता तरी मतातुन बाहेर येऊ द्या"


दुसर कोणासाठी नाही तर आपल्या भविष्या साठी, आपल्या देशासाठी. . एका सक्षम राष्ट्राच्या उभारणी साठी मतदान करा


चला सगळे मिळून परीवर्तन घडवू या!!! आपल मतदानाच कर्तव्य निभाऊ या!!!

मुशरफ को एक ही मारा लेकिन सॉलिड मारा!!!

आताच यु ट्युवबर वीडीओ पाहिला . . .खाली पोस्ट करतोय!!!!!

मानल राव मौलाना मदानी यांना. . एवढ बोलायला पण गट्स पाहिजे. . .सिंपली ग्रेट. . .

आयुष्यभर मुशरफ विसरणार नाही!!!

त्याला स्वप्नात पण मौलाना मदानी दिसत असेल आता!!!!

प्रत्येक ठिकाणी पाकिस्तानला भारताकडून असाच धोबी पछाड मिळत राहणार आहे!!!!


आई!!!


------------------------------------------------------------------------------------

A Mother's Kiss  [123/365]

लग्नानंतर २१ वर्षांनंतर माझ्या पत्नीने दुसर्‍या एका स्त्री बरोबर जेवायला व नंतर सिनेमाला जाव अस सुचवल। "माझ तुमच्यावर प्रेम आहेच पण मला माहीत आहे की त्या दुसर्‍या स्त्रीचेही तुमच्यावर फार प्रेम आहे आणि थोडा जरी वेळ तुमचा सहवास तिला मिळाला तरी तिला फार आनंद होईल." पत्नीने सुचवलेली टी 'दुसरी स्त्री' म्हणजे "माझी आई"!!! १९ वर्षांपुर्वी माझे वडील गेल्यापासून ती एकटी राहत होती आणि माझा संसार, मुळे आणि काम यांच्यामुळे मी तिला क्वचितच भेटत होतो.

मी आईला फोन केला " आई आज संध्याकाळी आपण बाहेर जेवायला आणि नंतर सिनेमाला जाउ या." मी म्हणालो.'काय झाल रे??? तुझी तब्येत तर ठीक आहे ना??' - आई.
रात्री उशिरा फोन आला किंवा अनपेक्षित आमंत्रण आले म्हणजे काही तरी अशुभ घडणार असा तिच्या मनाचा ठाम ग्रह होता.
"आपण खूप दिवसात भेटलेलो नाही.जरा छान मजेत वेळ घालवू या अस वाटल. फक्त आपण दोघेच!! तिसरे कोणी नाही." मी म्हणालो. त्या शुक्रवारी काम संपल्यावर मी तिला पीक अप करण्यासाठी तिच्या घरी गेलो तेव्हा मी जरा नर्व्हसच झालो होतो. तीही थोडी नर्व्हस असावीशी वाटली. कपडे करून दारतच ती माझी वाट बघत उभी होती. लग्नाच्या शेवटच्या वाढदिवसाला बाबांनी भेट दिलेला ड्रेस तिने घातला होता. मला बघताच तिचे डोळे आनंदाने चमकले.
'आज मी माझ्या मुलाबरोबर बाहेर जाणार आहे' अस मी माझ्या सगळ्या मैत्रिणींना फोनवर सांगितल्यावर त्यांना माझा इतका हेवा वाटला म्हणून सांगु!' आई म्हणाली.
आम्ही एका बर्‍यापैकी हॉटेलात गेलो. टेबलपाशी बसाल्यावर मी तिला मेन्यु वाचून दाखवू लागलो. बरेच आयटम वाचून झाल्या वर मी मान वर केली तर ती प्रसन्न मुद्रेने माझ्याकडे ट्क लावूंन बघत होती.
" तू लहान होतास तेव्हा मी तुला मेन्यु वाचून दाखवायची" ती म्हणाली.
जेवताना आम्ही खूप गप्पा मारल्या.विशेष असे काही नाही पण एकमेकांच्या आयुष्यात नुकतेच बारीकसारीक काय घडले ते एकमेकांना सांगितले एवढेच. पण गप्पांमध्ये एवढे रंगलो की सिनेमाची वेळ सरुन गेल्याचही लक्षात आल नाही. नंतर मी तिला सोडायला गेलो तेव्हा निरोप देताना ती म्हणाली "आता पुढच्या वेळेस मी तुला जेवायला घेऊन जाईन"
"ओ.के." मी म्हणालो
त्यानंतर आई हृदयविकाराच्या झटक्याने अचानक गेली. मी तिच्या घरी तिचे सामान आवारायला म्हणून गेलो तेव्हा हॉलमधील टेबलावर तिच्या हस्ताक्षारात माझे नाव लिहलेले एक पाकिट दिसले. त्यात आम्ही दोघे शेवटी ज्या हॉटेलात जेवायला गेलो होतो त्याची एक पावती अन् एक चिठ्ठी होती.
चिठ्ठीत लिहाले होते "आपण दोघे ज्या हॉटेलात गेलो होतो त्या हॉटेलात मी दोघांचे पैसे भरून ठेवले आहेत मला येता येईल की नाही याची खात्री नव्हती पण तू आणि कविता (माझी पत्नी) अवश्य जा. त्या दियावशी तू मला घेऊन गेलास त्याचा मला किती आनंद झाला हे मला शब्दात सांगता नाही येणार. माझ्यावर तुझा खूप जीव आहे रे!! देव तुला सुखी ठेवो!! आय लव्ह यु!!!!" माझ्या गळ्यात हुंदका दाटुन आला.
त्या क्षणी मला "आय लव्ह यु" हे आपल्या आवडत्या माणसांना शब्दांनी सांगण्याचे व त्यांच्यासाठी वेळ काढण्याचे महत्व कळाले.
जीवनात तुमच्या प्रिय व्यक्ती इतके महत्वाचे दुसरे काही असु शकत नाही। त्यांच्यासाठी वेळ काढा - - विशेषत: आई वडीलांसाठी!!!!!
-------------------------------------------------------------------------------------
आता महत्वाच : वरील लेख मला आज मेल मधून आलेला आहे। मनाला भावला. . .अन् आई वडील या विषयावर होता (की जो आपला वीक प्वाईंट आहे.) त्या मुळे पोस्ट करीत आहे. की बोर्ड बडवन्याव्यतरिक्त आमचे कोणतेही कष्ट नाही याची नोंद घ्यावी नंतर डोक्याला शॉट नको कॉपी राईटचा!!!!

या लेखामागील भावना समजून घ्या फक्त. . .उगाचच जास्त काम ना करता थोडा स्वतः ला वेळ द्या!!!

व्हेज पुलाव आठवणीतला!!!!

माझ खाण्यावर अगदी मनापासून प्रेम आहे.तसा मी शुद्ध शाकाहारी पण हाडाचा खादाडी आहे. व्हेज मध्ये निरनिराळे प्रकार नेहमीच ट्राय करत असतो. त्यामुळे पुण्यात आल्यानंतर पुण्याच मेसच जेवण काही आमच्या पचनी पडायच नाही. शेवटी मी अन् आमचे परममित्र जोगळेकर ( की जो अट्टल मांसाहारी. . .फक्त नावात "कर" आहे) आम्ही रुमवरच जेवण तयार करायाच अस ठरवल. त्यानंतर मात्र मग रोज नाना प्रकार करून खाउ लागलो. नवीन नोकरी असल्यामुळे रोज यायला उशीर. . .त्यानंतर आमचा स्वयंपाक म्हणजे फक्त भाजी, कोशिंबीर करायचो पोळ्या मात्र बाहेरून आणायचो.
एक दिवस व्हेज पुलाव करायचा असा बेत झाला. . .जोगळ्याने फोन करून नेहमीप्रमाणे सारी साधन सामग्री आणायला सांगितली. सुरुवातीला आम्ही कर्वे नगराला रूम राहत होतो त्यामुळे ताज्या भाज्या लगेच मिळून जायच्या. त्या दिवशी जोगळ्या येई पर्यंत सारी तयारी करून ठेवली. तो आल्यावरच पुलाव करू म्हणजे मग गरमा गरम हाणता येईल हा हेतू. . . ( खर कारण म्हणजे एकदा पुलाव झाला असता तर त्याची वाट बघत कोण बसल असत???? त्या अगोदरच सगळा सुपडा साफ झाला असता. . म्हणून वाट पाहायची) . . .त्या दिवशी नेमक त्याला यायला ११.०० वाजले.. . आम्ही तो पर्यंत कच्च्या भाज्यांवर आडवा हात आणला त्यामुळे भूक बर्‍यापैकी कंट्रोल मध्ये होती.
रात्री ११.०० नंतर मग आमचा पुलाव गॅसवर चढला. . . त्यानंतर मात्र मग पोटातील कावळ्यांनी चांगलीच बोंब मारायला सुरूवात केली. . . . कधी पुलाव शिजतोय यावरच सारख लक्ष होत.. . .५ मिनिट सुद्धा युगासारखे वाटत होते. . .तोच आमच्या गॅसने अर्धवट पुलाव झाल्या नंतर जीव सोडला. . . .वेळ रात्रीचे ११.४५-१२.०० ची पुलाव अर्धवट . . .जोराची भूक लागली होती. . .आता करायच काय??? पुलाव शिजवायचा कसा?? मोठा यक्ष प्रश्न. शेजारच्या काकू पण झोपल्या होत्या. . . भुके मुळे डोक पण चालेनास झाल होत. तोच आमच्या दोघांची नजर पेपरच्या रद्दीवर गेली. . .दोघांनाही न सांगताच मार्ग सापड्ला होता. . .गरज होती ती फक्त ३ दगडांची. . . आमची रूम साधीच होती त्यामुळे फरशी खराब झाली तरी साफ करता येऊ शकत होती. . . बाहेरून बाजूच्या पडलेल्या कंपाउंड वॉल चे दगड घेऊन आलो.मस्त पैकी ३ दगडांची चूल केली अन् सरपण म्हणून पेपरची रद्दी होतीच. . . .सारी रद्दी जाळून कसा बसा पुलाव आम्ही शिजवला. . . पण आता नवीनच प्रश्न आला होता. . रद्दीमुळे सगळी कडे प्रचंड धूर झाला होता. . त्यामुळे मागील बाजूची खिडकी उघडली. . त्याच्या वासाने वरच्या मजल्यावर राहणारे मालक जागे झाले. . .आता मात्र आमची वाट लागली होती. . काकांना समजल तर चंबु गबालं आवरून निघाव लागल असत. . शेवटी डोक चालवल सर्व लाइट बंद करून बाहेर निवांत गप्पा मारत बसलो. . .अंदाजाप्रमाने काका खाली आलेच. . त्यांना कस तरी कट्वल. . .नशीब ते लवक्र गेले. . त्यांना वाट्ल की मागील बाजुकडील कोणीतरी कचरा पेट्वतय त्यामुळे ते निघून गेले अन् हे पटवून द्यायला आमच्यासारखे अत्यंत विश्वासू भाडेकरू होतेच. . . . जाताना लाइट बंद करून झोपा हे सांगायला ते विसरले नाही. .आता आम्ही लाइट पण चालू ठेवू शकत नव्हतो. . .लाइट चालू राहिली तर काका परत खाली यायला बसले. . .आता जेवायच कस??? नशीबाने १ मेणबत्ती सापडली. . .मग काय. . .मेणबत्तीच्या प्रकाशात रद्दीवर शिजवलेल्या पुलावावर आडवा हात मारत होतो. . ते झाल्या नंतर जळालेल्या रद्दीची योग्य ती वाट लावली.. . पण खराब झालेली फरशी साफ करताना मात्र वाट लागली होती.
तर अस हे आमच कॅन्ड्ल लाइट डिनर झाल होत!!!! अशी डेट पुन्हा होणे नाही. . . बाकी पुलाव एकदम झॅक झाला होता बगा!!!!

कोन्ट्रसेपटिव पिल्स :असाही साइड इफेक्ट!!!

काही दिवसांपुर्वी बहुतेक महेंद्रजींच्या ब्लॉगवर कोन्ट्रसेपटिव पिल्स वरील एक पोस्ट वाचनात आली होती. या जाहिरातिंचा सध्या कोणत्याही चॅनेलवर जो काही भडीमार चालू आहे त्याचा लहान मुलांवर कसा परीणाम होऊ शकतो हे आज सांगतो. माझ्या एक कलीग आहेत. . त्यांची इ.४ थी इंग्रजी माध्यमात शिकणारी कन्या . . .मागील आठवड्यात संध्याकाळी आली अन् म्हणाली "मम्मा आय थिंक आय शुड स्टार्ट टेकिंग आय पिल्स. आय डोण्ट थिंक आय वान्ट टू गेट प्रेग्नंट टिल आय ग्रो अप"
हो . . .अगदी ह्याच शब्दात ती बोलली. . . अरे कोणी तरी तिला सांगा इतक्या लवकर आई बाबांची रात्रीची झोप उडवू नकोस ग बाई!!!!!
आत याला काय म्हणाव???? कालाय तस्मै नमः!!!! दुसर काय!!!!

गोष्ट कांदे पोहेंची!!!!

आता लवकरच आमच्या हातात लग्नाची बेडी पडणार आहे. आमच्या जे काही जिवलग मित्र आहेत त्यातील सर्वजण खड्ड्यात पडलेले आहेत अन् आता आमची पडण्याची वाट बघत आहेत. त्यामुळे मनमौजी जगण्याचे दिवस लवकरच संपनार आहेत. सध्या आमच्या मातोश्रीनी फक्त वधु संशोधन हे एकच लक्ष्य ठेवल आहे. त्यामुळे प्रत्येक वीक एंड हा फक्त कांदे पोहे यासाठी राखीव झाला आहे. आतापर्यंत ४-५ कार्यक्रम केलेत. अशेच २ अनुभव आज लिहतोय.

अनुभव क्रमांक १:
आईला खूप दिवस टांग मारुन शक्य तेवढा ही कार्यक्रम पुढे ढकलला होता पण शेवटी तिला बिचारीला यश आल अन् आमचा पहिला कांदे पोहे प्रोग्राम फिक्‍स झाला. मी माझ्या अनुभवी मित्रांकडुन थोड्या टिप्स घेतल्या. काही केल तरी ते मित्र. . . आमची हाणायला कधी तरीच संधी मिळते त्यामुळे त्यांनी त्याचा योग्य तो फायदा घेऊन नको असलेल्या सुद्धा टिप्स दिल्या.
शेवटी ती वेळ आलीच, मी,बाबा, ताई अन् जीजाजी असे आम्ही निघालो गाडीत जीजुंनी त्याचे काही अनुभव सांगितले. खर सांगु का त्या दिवशी कॅया माहीत नाही पण हृदयाचे ठोके ७२ वरुन १४४ झाले होते. हसाल तुम्ही पण खर आहे हे!!!
एकदाच आम्ही तिथे पोहचलो, सुरुवातीला सगळी ओळख परेड झाली नाते संबंध, माझ शिक्षण, नोकरी वगैरे. . अस सार काही बोलून झाल. हे सार चालू असताना मी मात्र एकदम गरीब बिचारा सार काही गुमान ऐकत होतो कधी नाही ते मी एवढा शांत बसलो होतो. काय करणार काही मार्गच नव्हता.
आता मुद्द्याच काम मुलीला बोलवा अस कोणीतरी फर्मावल आता माझ लक्ष होत ते तिच्या एंट्री कडे अन् उत्सुकता पण होती.
शेवटी एकदाच आगमन झाल. .अन् ज्या रीतीने झाल ते पाहून आमचा नकार फायनल झाला. देवा रे जी काही तयारी केली त्यावर सगळा पोचारा फिरला. कोणी काही बोलण्याअगोदरच त्या मुलीने माझ्याकडे पाहून विचारल हाच मुलगा का??? च्यायला हिला काय मी वेगळा कोणी वाट्लो की काय?? ( अजुन एकदा पोचारा. . ) मी देवाच नाव घेऊन पुढील परिस्थितीला सामोर जायच ठरवल. मला तर काही विचारायच नव्ह्तच. पण बाकी सारे जण तुम्हाला मुलीला काही विचारायाच असेल तर विचारा असा आग्रह करू लागले.

त्यांनतर आमच्यात झालेला संवाद असा. ( इथेही सुरूवात तिनेच केली.)

ती : तुम्ही काय करता?
मी : म्हणजे??? ( मी भरपुर काही करतो. . .काय सांगु मी आता???)
ती : जॉब करता की सर्विस ???
मी : (ह्या प्रश्नानंतर जागीच फ्लॅट . .) जॉब.
ती : कुठे कंपनीत का??
मी : ( आता मात्र हद्द झाली. .) हो.
ती : जॉब काय आहे ???
मी : इम्प्लीमेंटेशन ला आहे म्हणजे प्रॉडक्ट सपोर्ट ला. (यातल तिला काही झेपल नाही हे समजलच मला.)
ती : मग मंदीचा काही परीणाम??
मी : (आता मात्र डोक हालल. . काय वैताग आहे??? किती सहन करायच) आज तरी काही नाही उद्या काय होईल सांगता येत नाही.
आता मात्र अचूक काम झाल माझ्या या उत्तरा नंतर मात्र कोणता प्रश्न आली नाही. माझ लक्ष मात्र ताई कडे होत तिला माझा वैताग अगदी दिसत होता. मला तर कधी बाहेर पडतो अस झाल होत.
बाहेर आल्यानंतर मात्र कोणाची मला विचारायची हिम्मत काही झाली नाही. ताई ने मात्र माझी जाम फिरकी घेतली. यानंतर बाबांनी त्यांना नकार कळवुन टाकला. तरी पण आठवडा भर त्या लोकांचा फोन येत होता तुम्ही विचार करा आमच्या मुलीत काय कमी आहे??? का नाही म्हणताय अस खूप काही. . . शेवटी मीच वैतागून सांगितल कमी काहीच नाही पण जेवढ काही आहे ते थोड जास्तच आहे. त्यामुळे नको. तेव्हा कुठे ऐकल.

असा हा आमचा पहिला अनुभव होता.
अनुभव क्रमांक २:
हा अनुभव आपल्या पुण्यनगरीतच आला आहे. . दुपारी बाबांचा फोन आला अन् पदमावतीचा एक पत्ता दिला या ठिकाणी तुला गुरुवारी संध्याकाळी मुलगी पाहयला जायचाय असा हुकुम. तुला जमेल का??, वेळ आहे का??, हे काही नाही डायरेक्ट आदेशच . . . आता मी काय बोलणार बापुडा??? गुरुवारी दुपारी जॉब वरुन एक्स क्यूज घ्यायची अन् मग जायच असा प्लॅन झाला. सोबत कोण येणार. . हा एक मोठा प्रश्न होता पण नॉन व्हेज खाउ घालण्याच्या अटीवर सच्या (आमचे गी.डी.) तयार झाला.
गुरुवारी ठरल्या वेळे नुसार आम्ही पोहचलो. मुलीच्या घरी टिपीकल पुणेरी पद्धतीने स्वागत झाल. त्यानंतर चहा- पाणी झाला. जुजबी माहिती दिल्यानंतर मुलीच्या वडीलांनी जो गप्पांचा फड जमवला की बस्स!!! नक्की आलोय कशाला हाच प्रश्न पडला. त्यांची पिढी अन् आजची पिढी, आजचे तरुण किती भरकट्लेले आहेत, ते किती कर्तृत्ववान आहेत, महागाई, राजकारण, पुण्यातील रस्ते अन् त्यावरील उपाय, कलमाडी, पवार यांच्या कार्याची समीक्षा, हे काय कमी होत म्हणून सच्या च्या गावाकडे पण घसरले तिकडे असणारे त्यांचे नातेवाईक सार काही झाल पण त्यांची गाडी काही मूळ मुद्द्याकडे येईना. शेवटी मीच वैतागून विचारल मुलगी नाही आहे काय??? ( काय करणार दुसरा काही मार्गच नव्हता. . .अस विचारण प्रशस्त वाटत नाही पण नाइलाज होता) यावर त्यांनी दिलेल उत्तर अस " त्याच काय आहे तुमची आणी मुलीची नाड एक आहे त्यामुळे सदर विवाह होऊ शकत नाही. म्हणून आमचा नकार आहे."
तोपर्यंत नाड म्हणजे काय हेच आम्हाला माहीत नव्हत . . .मला हे काही झेपल नाही म्हणून मी सच्या कडे पाहील तर त्याचे पण अवस्था माझ्याहून वेगळी नव्हती. ( नाड आम्हाला एकच माहिती की जो बैल गाडीला वापरतात पण त्याचा . काय संबंध???) शेवटी . . तर्क केला कदाचित हे पत्रिकेतील काही तरी असु शकत.

मला हे समजलच नाही जर नकारच होता तर मला कशाला बोलवल. हीच गोष्ट ते मला फोनवर पण सांगु शकत होते. मी त्यांना विचारल अस का तर म्हणे काही नाही तुम्ही आलात जरा गप्पा पण झाल्या तस पुण्यात आल्यापासून गावाकडच जास्त कोणी भेटत नाही. तुम्ही आल्यामुळे बर वाटल .
यावर मी मात्र काहीच बोलू शकलो नाही. यावर त्यांचा निरोप घेतला अन् आम्ही निघालो. या गप्पा मात्र मला चांगल्याच महागात पडल्या. . . १/२ डे तर गेलाच वर सच्याने या संधीचा योग्य तो उपयोग करून घेतला तो तुम्हाला आता लक्षात आलाच असेल.
यानंतर मी मात्र कांदे पोहे प्रोग्रामचा धसका घेतला आहे. अजुन किती अनुभव घ्यावे लागणार आहेत ते देवालाच माहीत. यावर बाबांची प्रतिक्रिया होती गेले २-३ वर्ष कंपनी अन् कॉंप्यूटर शिवाय थोड दुसरीकडे लक्ष दिल असत तर हे दिवस आले नसते. आता काय बोलणार . . . बोला????

थुंके: सावधान - रु. १००० दंड

पुण्यात सार्वजनिक ठिकाणी थुंकल्यास रु. १००० दंड भरावा लागणार (पुर्वी हा रु.२५ होता फक्त!!!) . . . . असा निर्णय नुकताच पालिका आयुक्तांनी त्यांच्या विशेष अधिकाराचा वापर करुन घेतला. चला निर्णय तर झाला पण त्याच्या अंमलबजावणीच काय??? ह्या निर्णयाची तरी काटेकोर अंमलबजावणी होईल का?? की परत नेहमीप्रमाणे ये रे माझ्या मागल्या. . . . .
अन् चिरी मिरी घेऊन सेटींग करणार्‍या सगळ्यांना एक नवीन कुरण मिळाल चरायला!!!

जाउ द्या यावर किती पण बोलल तरी कमीच आहे. प्रत्येक भारतीय जो पर्यंत सामाजिक शिस्त अन् भान बाळगत नाही तो पर्यंत हे असच चालू राहणार!!!!