स्थळ : कात्रज सर्पोद्यान.
मी आणि मित्र पुण्याच्या बी.आर.टी. वर बौ्द्धिक करत चाललो होतो. सर्पोद्याना समोरील चौकात गतिरोधक आल्यामुळे मित्राने दुचाकीचा वेग कमी केला. अन क्षणात पाठीमागुन येणार्या एका महान दुचाकीस्वाराने धडक दिली. काही समजायच्या आत मी रस्त्यावर अन मित्र दुचाकी सोबत घसरत पुढे जाउन पडला.आमची काही चुक नसतानाही आम्हाला न मागता चांगलाच प्रसाद मिळाला होता.
प्रसंग क्रमांक २
स्थळ : के.के. मार्केट चौक
सकाळी नेहमीप्रमाणे हाफ़िसात निघालो होतो..के.के.मार्केटच्या चौकात बिबवेवाडीकडे जाण्यासाठी लाल दिवा पेटल्याने थांबलो.हिरवा दिवा पेटताच उजवीकडे वळुन मी आपला मार्गस्थ झालो. तोच समोर एक काकु सिग्नल तोडुन माझ्यासमोर आली. धडक वाचवण्यासाठी मी ब्रेक लावले तोच पा्ठीमागुन येणार्या चा्रचाकी वाल्याने माझ्या गाडीच हलकसंच चुंबन घेतल.एवढ होऊनही काकु काहीही न घडल्याच्या अविर्भावात साळसुदपणे निघुन गेल्या.
हे मागील काही महिन्यातील मला आलेले अनुभव...तसा गाडी चालवण्याच्या बाबतीत मी म्हणजे कासव आहे.आमचा स्पीड ४०-४५ च्या पुढे कधीच जात नाही.
एकदंरीत आता तुमच्या लक्षातच आल असेल पुण्यात गाडी चालवण म्हणजे सर्वात मोठ दिव्य आहे. एकवेळ तुमच्याकडे गाडी चालवण्याचा परवाना नसला तरी चालेल पण अष्टांगअवधानी असणं अत्यंत गरजेचे आहे.कारण फ़क्त आभाळातुन सोडल तर इतर कोणत्याही दिशेने ्म्हणजे समोरुन, पाठीमागुन, उजवीकडुन, डावीकडुन अन असतील नसतील त्या फ़टीतुन कधी कोण घुसेल हे कोणीच सांगु शकत नाही.
पुण्यातील वाहनचालकांच्या काही सवयी व समज :
१. रस्त्यावरील सिग्नल म्हणजे हे केवळ रस्ता सजावटीसाठी आहे.
२. ३० सेकंदाचा सिग्नल जर पाळला तर महाप्रलय होऊ शकतो त्यामुळे पिवळा/लाल सिग्नल दिसताक्षणी शक्य तितक्या वेगाने मिळेल त्या फ़टीतुन दुचाकी ही पळवलीच पाहिजे.
३.बी.आर.टी. ट्रॅक किंवा सायकल ट्रॅक यामधुन गाडी चालवणे हा त्यांचा जन्मसिध्द हक्क आहे.
४. समोर वाहतुकीची कोंडी झालेली आहे मार्ग निघु शकत नाही अश्या वेळी आजुबाजुच्या जनतेच्या मनोरंजनासाठी आपल्या दुचाकीचा भोंगा जोरात वाजवलाच पाहिजे.
५. झेब्रा क्रॉसिंगच्या अलीकडे गाडी थांबवणे हे अतिशय कमीपणाचे अन अडाणीपणाचे लक्षण आहे त्यामुळे गाडी ही झेब्रा क्रॉसिंगच्या पुढे किंवा त्यावरच थांबवली गेली पाहिजे.
६.सिग्नलला थांबल्यानंतर एकाजागी सिग्नल सुटण्याची वाट पाहण्याऎवजी मिळेल त्या कोपर्यातुन आपली गाडी काढण्याचा प्रयत्न करायचा.
७.एका कानाला मोबाईल लावुन,मान तिरकी करुन गाडी चालवण्यात खर शौर्य आहे.
८. नो एन्ट्रीचा फ़लक दिसत असला तरी त्यातुन गाडी घातलीच पाहिजे त्यात खर थ्रिल आहे अन वर कोणी एखादा ओरडला तर त्याच्यावरच शिरजोरी करायची.
९.जर चारचाकी असेल तर मध्ये रस्त्यातच उभी करुन चितळेंच्या किंवा तत्सम दुकानात जाउन निवांतपणे खरेदी करायची भले तिकडे कितीही ट्रॅफ़िक जॅम झाला तरी चालेल.
१०.हेल्मेट हे फ़क्त फ़ट्टु किंवा भित्री लोक वापरतात.
पुण्यात गाडी चालवताना यांच्यापासुन सावधान:
१. पी.एम.टी. : गाडी चालवताना पी.एम.टी. जेव्हा कधी पुढे किंवा मागे येते तेव्हा मला नेहमी ती एका अजस्त्र अजगरासारखी वाटते की जो भुकेला आहे अन कधीही तुमची शिकार करु शकतो. शक्यतो गाडी चालवताना पी.एम.टी.च्या जवळपास पण भटकु नका कधी तुमची शिकार होइल हे सांगता येणार नाही. पी.एम.टी. अगदी सन्मानाने जाउन द्यायच अन मग आपण निघायच.
२. पुणेरी काकु (यात मुली सुध्दा आल्या बरं का) : यांना इंडीकेटर, हॉर्न या प्रकारांची अॅलर्जी असते. त्यामुळे या जर आजुबाजुला असतील तर कधी टर्न करतील हे साक्षात ब्रम्हदेवपण सांगु शकत नाही. यांनी चुकुन कधी इंडीकेटर दिला तरी जरा जपुनच कारण डावीकडचा इंडीकेटर देउन उजवीकडे वळण्याचा पराक्रम फ़क्त पुण्यातच होतो.
३.रिक्षावाले: पुणेकर रिक्षावाले काका हे पुण्यातील रस्तांचे अनिभिषक्त सम्राट म्हणा किंवा वतनदार म्हणल तरी चालेल.स्वतः चुक करतील अन वर तुम्हालाच सुनावतील.हे पण रस्त्यात प्रवाशी घेण्यासाठी किंवा प्रवाशी उतरवण्यासाठी केव्हाही थांबु शकतात. सिग्नल पाळण्याच कोणतही बंधन यांच्यावर नसतं.रस्ता कोणताही असो त्याचे मालक हे हेच असतात.
४.पुणेरी खड्डे: पुणे तिथे काय उणे या उक्तीनुसार पुण्यातील रस्त्यांवर खड्ड्यांची कमतरता नाही. पुण्यात असा एकही रस्ता नाही की ज्यावर खड्डा नाही.पुण्यात एकसारखा सलग रस्ता तुम्हाला सापडुच शकत नाही, सतरा पक्षांची खिचडी करुन ज्याप्रमाणे सरकार उभारणी साठी आघाडी केली जाते त्याप्रमाणेच पुण्यात पण अशेच रस्ते आढळतील. कॉंक्रीट, डांबरी, पेवांग ब्लॉक अश्या सर्व प्रकारचे रस्ते एकाच वेळी तुम्हाला आढळतील.त्यामुळे शक्यतो खड्ड्यांमधुन जो काही थोडा फ़ार रस्ता असतो त्यावरुन गप गुमान आपली गाडी चालवायची.
५.पुणेकर पादचारी: चौकातुन गाडी चालवताना यांच्यापासुन जरा जपुनच राहयच.एखाद्या बगीच्यामध्ये आपण ज्याप्रमाणे फ़ेरफ़टका मारतो अगदी त्याप्रमाणेच रहदारीच्या रस्त्यावर हे मुकतपणॆ बागडत असतात.चुकुनही यांच्या मार्गात येउ नका (ते तुम्हाला आडवे आले तरी) नाही तर अस्सल पुणेरी फ़टके मिळतील.अन अश्यावेळी तुमच्यावर तोंडसुख घ्यायला हौशे,गवशे,नवशे अशे सगळे सामील होतील.
थोडक्यात काय तर पुण्यात गाडी चालवायची असेल तर तुम्हीच तुमच्या जीवनाचे रक्षक हे लक्षात ठेवा नाही तर कधी तुम्हाला मुक्ती मिळेल हे कोणी सांगु शकत नाही.
Widget by Css Reflex | TutZone
23 comments:
तुझी ही पोस्ट वाचली आणि गौरीने पुण्यात आल्यावर रस्त्यावर गाडी चालत असताना केलेली प्रचंड चिडचिड आठवली.... भयंकर प्रदुषण, केकाटणारे अनंत हॉर्न , अरेरावी आणि हुंड्यात रस्ता मिळाल्यासारखे वाहनं चालवणारे महाभाग आणि महान स्त्रीया ....
मुद्दा न मुद्दा पटला तुझा....
गाडी घेऊन येतो तसा मी कधीतरी पुण्यात आणि लाखोल्या वाहतो अक्षरश: तशी मुंबई-ठाण्यात काही वेगळी परिस्थिती आहे असे नाही... :)
MH-१२ वाल्यांना MH-०४ पाहिला की अंगात जोर चढत असेल बहुदा... :D
पुण्याबद्दल बरंच काही लिहिलंय!
असो
पण प्रत्येक पुणेकर असाच वागतो असे नाही.त्याला अपवाद आहेतच.आणि पुण्यात फक्त पुणेकरच राहत नाहीत.बाहेर गावाची मंडळी पण आहेतच.याला शिस्त लावायचा प्रयत्न पुणे ट्राफिक पोलिसांचा चालू आहे.फेसबुक वर सध्या त्याची लोकांच्या मदतीने माहिती घेणे आणि कारवाई करणे चालू आहे.लोकांचा प्रतिसाद पण उत्स्फूर्त आहे.या पद्धतीने लोकांनी सहकाय केले तर नक्कीच शिस्त लागेल यात शंका नाही !!!!!
एक पुणेकर!!
घरोघरी मातीच्या चुली आहेत. :(
हाहा.. सगलेनियाम मस्त कव्हर केलेस की तू तर :)
तन्वी...माझी तर रोजच चिडचिड होते...जॉबपेक्षा रोजच्या प्रवासाचा जास्त वैताग येतो.
रोहन...मला तरी वाटत पुण्याहुन भयानक परीस्थिती कुठे असुच शकत नाही..प्रचंड बेशिस्त आहे.
स्वप्ना प्रतिक्रियेबद्दल आभार....तुम्हाला उदाहरणादाखल सांगतो...सातारा रोडवरील आदिनाथ सोसायटी जवळील पदपाथावर पाणीपुरी,भेळ याच्या गाड्या लागलेल्या असतात...अतिशय बेमुर्वत पणे गाड्या लावुन ्सर्वजण तिथे निवांत हादडत असतात...या हातगाड्यांमुळे होणारी कोंडी पोलीसांना माहित नाही का???
स्वारगेट चौक घ्या, कर्वे रोड घ्या...लक्ष्मी रोडवर आडवे तिडवे पार्किंग करणारे किंवा रस्त्यात चार चाक्या उभ्या करुन शॉपिंग करणारे तुम्ही पाहिलेच असतील.
मुख्य म्हणजे पोलीसांचा धाकच कोणाला राहिलेला नाही.
अन मी हे प्रत्येक पुणेकाराविषयी लिहलेल नाही....काही अपवाद आहेत पण अशे खुप कमी आहेत.(त्या अपवादातला मी एक ;) )
अनघा ताइ...पुण्यातल्या चुली जरा वेगळ्याच आहेत बर का!!
:) :)
सत्यवाना हाभार्स रे....:):)
आयला लैई भारी पोस्ट आणि नियम मला खूपच आवडले. पुण्याचा असाच अनुभव घेतलाय :)
मस्त लिहलयस रे
पुणेकरांची आणखी एक सवय म्हणजे कोणी वाहतुकीचे नियम पळत असेल (आपले आपल्यापुरते, आणखी कोणाला उपदेश न करता शांतपणे - असे पुणेकर अपवादात्मक ते सोडा!) तर त्याच्याकडे 'कुठून अंदमानातून आला/आली आहे अशा नजरेने पाहणे
बाकी यादी मस्त जमलीय हे मी वेगळे सांगायला नकोच!
छान झाली आहे पोस्ट..
घरोघरी मातीच्या चुली
सगळीकडे वाईट अवस्था आहे ..
:-D
lolzz...punyachi trafic parsthiti punekaranach avagat ahe,Tyat baherche parangat hoyas he post far upyogi tharel...
Awsumly writeup,nice comparos...
Amhi [MH12] 12che agachach nai
सुहास....ठांकु रे...अरे अशे अजुन भरपुर अनुभव आहेत. :) :)
सविता ताइ...अगदी बरोबर...पुणेकरांना नियम पाळणारे अतिशहाणे वाटतात....प्रतिक्रियेबद्दल आभार अन ब्लॉगवर स्वागत.
बंड्या भो..प्रतिक्रियेबद्दल आभार अन स्वागत...पण ह्या बेदारकपणामुळे कुणाचा जीव जाउ शकतो याच कोणालाच भान नाही.
सौरभ.. :) :) ठांकु रे...
rishij...आपल ब्लॉगवर स्वागत...प्रतिक्रियेबद्दल आभार.
योगेश तुमची लिखाणाची शैली खूप छान आहे, ह्या post मधून जे तुम्हीं सांगितले आहे ते,मी अनुभवले आहे त्यातले काही.जेव्हां भारतात गेले होते ह्या वेळी पुण्यात काही दिवस होते आणि तेव्हां,पुण्यात फिरणे झाले,धमाल आली पुणे आवडले आपल्याला....थोडा हा traffic चा गोंधळ सोडला तर मस्त आहे.... पण एक आहे ह्या इतक्या दुचाकी गाड्यांच्या गर्दीत आपली गाडी वाचवत पुढे जाणे म्हणजे तुम्हां लोकांना मानले पाहिजे! कौतुक आहे!
Its a very nice article.It reminds me how difficult to drive in pune.If someone can drive in pune smoothly,he/she should automatically get world driving license !!
I really liked the way you describe the whole traffic situation and self-declared rules by 'puneri' drivers.
I have published your article on my website www.majhapaper.com.The site work is still going on and its in beta phase.
Do keep up good work.
पुणे रॉक्स रे...
प्रत्येक बाबतीत... :P
झकास लिहिलं आहेस!! :)
Post a Comment