आमचे हे सर जेव्हा इंग्लिश बोलायचे तेव्हा आमचा अगदी मानसिक छळ असायचा.यांनी तृतीय वर्षात Fluid Mechanics तर शेवटच्या वर्षात Prestress Concrete Design शिकवला होता.
आम्ही तृतीय वर्षाला गेल्यानंतर पहिल्याच तासाला त्यांनी त्यांच्या विषयी सांगताना एक वाक्य वापरल अन् आम्ही फक्त बाकावर डोक आपटायच राहिलो होतो. ते म्हणाले होते...
I have two daughters both are girls.
या नंतर आमचा खूप स्नेह (स्नेह कसा असेल याचा अंदाज तुम्हाला आलाच असेल) वाढत गेला व आम्हाला अशेच भरपूर किस्से मिळत गेले. थोड्या दिवसात आम्हाला समजल की जर आपल सबमीशन अगदी विनासायास करायच असेल तर सरांसोबत फक्त इंग्रजीतून बोलायच. आपण इंग्रजीत बोलायला लागलो की आपोआप फाईल वर सही व्हायची.
या सरांमुळे आमच Probablity खूप चांगल झाल होत. यांना प्रत्येक दोन वाक्यांमध्ये You See म्हणायची सवय होती. वाक्याची सुरूवात अन् अंत दोन्ही पण You See ने व्हायचा. मग काय संपुर्ण तासात आम्ही फक्त तेच मोजायचो.... किती वेळा म्हणतात ते.
यांच अजुन एक प्रसिद्ध वाक्य.....
Please close the Doors of Window.
शेवटच्या वर्षाला आम्हाला Prestress Concrete विषय शिकवला होता...त्यात हे स्ट्रेस, स्ट्रेन, स्ट्रेट टेंडन अशे सगळे शब्द.
हे सर स्ट्रेस ला ट्रेस ....स्ट्रेन ला ट्रेन....स्ट्रेट ला ट्रेट...म्हणायचे...पहिल्या तासाला आम्हाला हे समजे पर्यंत आमच्या शिट्ट्या वाजल्या होत्या.
आम्हाला एकदा हे सर साईट विजीटला घेऊन गेले तिथे यांना आम्हाला बीम अन् कॉलम जॉइंट एक्सप्लेन करायच होत...यांनी कस सांगाव....
You See, This Bar Comes from there (उजवीकडे हात करून).... This Bars Comes from there (डावीकडे हात करून) and You See all they are meet together here.
एकदा तास चालू असताना मी मस्ती करताना चुकुन पकडला गेलो तर यांनी मला अस सुनावल...
If you want to seat then seat, If you dont want seat then dont seat.
आता तुम्हाला अंदाज आलाच असेल यांचा तास म्हणजे आम्हाला किती मोठी पर्वणी होती. असो अशे खूप सारे किस्से आहेत यातले निवडक तेवढे सांगितले आहेत.
Widget by Css Reflex | TutZone
18 comments:
I have two daughters both are girls.
हा हा ... जबरी
हे हे..
I have two daughters both are girls.
त्यांची केवढी मोठी चुकून मिस्टेक झाली..
आम्हालाही App Mechला असेच सर होते, राऊंड सर्कल, ट्र्यॅंग्युलर ट्रॅंगल असं बिनधास्त म्हणायचे. पण शिकवायचे चांगल.
त्यांचं बोधवाक्य होतं, स्टीक टू द बेसिक.. ते थिक टू द बेसिक म्हणायचे.
He..he... Bharii...!!! :D
i have two sons both are boys .....
LOL
Pan he vakya kuthetari SMS madhe vachlya sarkhe vatat aahe...YOU SEE..!!!
मस्त पोस्ट योमुं..
आमचे सर आठवले...
Characteristics ला कॅस्टिस्टिक..असं काहीसं म्हणायचे...
आमच्या कडे रात्रभर नाईट करणारे कामगार पाहीजे...
तुमचा पोस्ट एक नंबर आहे.
आनंद... :)...प्र.ब. आभार.
मीनल...राउन्ड सर्कल...हे..हे..हे
मैथिली...आभार अन् ब्लॉग वर स्वागत...
विश्वास...ब्लॉग वर स्वागत...प्रतिक्रियेबद्दल आभार!!!
विभि ठांकू रे!!!
नागेश...ब्लॉग वर स्वागत....प्रतिक्रियेबद्दल आभार!!!
असंच अजून एक ऐकलंय..
open the doors of the windows and bring the environment come in.. LOL
योगेश.. मस्तच रे एकदम :)
हेरंब...:) :) :)
ठांकू रे!!!
"I have two daughters both are girls",
"If you want to seat then seat, If you dont want seat then dont seat."
भारीच रे...
देवेंद्रा धन्यु रे!!!
Are aamche pan ek sir hote tyani aamhala ek jabari dhamaki dili hoti ki 'Don't trouble me ur marks are ON my hands !!!!' :)
Tyanchi aatahvan aali bagh... sahi aahe re post!!!
तन्वी ...आभार!!
Post a Comment