गेले २-३ आठवडे जगातभारी कोल्हापुरी, अख्खा मसूर स्पेशालिस्ट चा बोर्ड खुणावत होता पण तिथ जाण्याचा योग काही येत नव्हता. ३-४ वेळा प्लान करून पण ऐनवेळी पोपट झाला होता. ते म्हणतात ना...समय से पहले और भाग्य से अधिक कभी कुछ नही मिलता.
गुरुवारी नेहमीप्रमाणे स्वामी समर्थ मठात गेलो होतो. तिथून बाहेर पडताना जेवायचा विचार करत होतो ...तेवढ्यात क्लिक झाल जगातभारी कोल्हापुरीवर हल्ला बोल राहिलाय. मग काय क्षणाचाही विचार ना करता बाइक थेट जगातभारी कोल्हापुरीच्या दिशेने पळवली. हॉटेल मध्ये प्रवेश केला पाहील तर विशेष अशी गर्दी नव्हती...गर्दी म्हणजे आम्ही दोघे अन् अजुन दोघेजण अशे चार जण तिथे होतो. टेबलवर जाउन बसलो तर वेटर ने छोट्या वाटीत थोडी मसूर भाजी चव चाखण्यासाठी आणून दिली. मेनु कार्ड अगोदर सॅंपल आल्यामुळे आम्ही जरा कनफ्युज झालो होतो. कनफ्युजन मध्येच भाजीची चव घेतली...वाह काय चव होती!!!
चला जागा चुकली नाही याच समाधान होत.
मेनू कार्ड |
आता मेनु कार्ड आल त्यावर पाहील तर फक्त एकाच भाजी होती : "अख्खा मसूर"....बाकी काहीच नाही.
म्हणजे आता चॉइस ला काही वाव नव्हता फक्त हाफ की फूल एवढच सांगायच होत.
रिस्क नको म्हणून हाफ अख्खा मसूर, रोटी अन् सोलकढी ऑर्डर केली.
अख्खा मसूर |
सोलकढी |
१० मिनिटात ऑर्डर आली.. रोटीची साइझ पाहून धक्काच बसला....आपल्या नेहमीच्या रोटीपेक्षा दुप्पट साइझ होती.
जोरात भूक लागली होती त्यामुळे सगळ्यावर आडवा हात मारला.
सोलकढी तर अप्रतिम होती.आत्मा अगदी तृप्त झाला.
नावाप्रमाणेच खरोखर अख्खा मसूर स्पेशालिस्ट आहे.
थोडी माहिती घेतल्यावर समजल कोल्हापुरात पण असच हॉटेल आहे.
ह्या हॉटेलच वैशिष्ट हेच आहे , इथे फक्त एकाच प्रकारची भाजी मिळते. बाकी काही नाही.
एकदा तरी ह्याची चव चाखलीच पाहिजे.
काय म्हणताय तुम्हाला पण जायचय....पत्ता हवा आहे...घ्या मग
"जगातभारी कोल्हापुरी
तावरे कॉलनी, सिटीप्राइड समोर,
सातारा रोड, पुणे."
इथे अख्खा मसूर व्यतरीक्त सोलकढी नक्की ट्राय करा!!!
Widget by Css Reflex | TutZone
16 comments:
अहाहा.. नाव कोल्हापुरी आणि यकदम घासफुस ... क्या बात है.. सहीच दिसतंय. तोंडाला पाणी सुटेश !!! ..
खरंतर जोरदार निषेध करणार होतो पण माथाटीपेला स्मरून छोटासाच निषेध करतो ;-)
मी निषेध नोंदवनारच... पुण्याच्या ट्रीप मध्ये याचा नंबर कसा ही करुन लावणारच...:-)
ठांकू हेरंबा!!!
आनंद ये रे पुण्यात नक्की जाउ या!!
मनमौजी माझाही जोरदार निषेध. सोलकढी म्हणजे अगदी जीव की प्राण. बाकी नाव पण एकदम भारीच आहे की.... जगातभारी कोल्हापुरी... वा! :)
हेरंबला दुजोरा...कोल्हापुरी आणि घासफूस, सहीच विरोधाभास आहे!!!
बाकि फोटो मी दुपारच्या जेवणानंतर पहाणार होते पण एक डॊळा किलकिला केल्यावर सोलकढी दिसली....तेव्हा माझा बाबा निषेध!!! :)
घासफूसीचा विजय असो!!!
अरे नाव पण काय भारी आहे " जगातभारी कोल्हापुरी"
पुण्यालाच आहे , तेंव्हा बघू या पुढल्यावेळी:)
श्री ताई...सोलकढी माझी पण जीव की प्राण आहे....इथली सोलकढी तर जबर्या आहे...मला वाटत पुण्यात सगळ्यात भारी सोलकढी इथेच मिळते.
तन्वी...निषेध नको करुसं...आज पुन्हा एकदा जाउन येतो....तुझं नाव घेऊन एक ग्लास जास्त सोलकढी घेतो मग तर झाल..:)
महेन्द्र काका...तुम्ही या तर खर मग प्लॅन करू या
जगातभारी कोल्हापुरी...सहीच...
मी शुदध मांसाहारी असुन सुदधा शेवटपर्यंत टिकुन राहिलो पोस्टमध्ये यातच सर्व आल...
देवेन्द्र प्रतिक्रियेबद्दल आभार!!!
माझ्या एकदम कामाचे आहे हे हॉटेल, कारण मी कायम घासफुस खाणारी.
धन्यवाद सोनाली....बॉल्ग वर आपल स्वागत आहे!!
अरेच्च्या ही पोस्ट कशी काय राहिली ब्वॉ....पण असो..मी बाहेर गेलं तर फ़ार घासफ़ुसच्या फ़ंदात नसते...आपले वडा-पाव आयटम सोडले तर पण ही सोलकढी लोभसवाणी आहे...बाकी तिखट आणि मी कॉंबो कधीच सुटलंय...त्यावर लिहिलं तर दर्दभरी कहाणी होईल...म्हणून नकोच त्या आठवणी....
अपर्णा कहाणी दर्दभरी असली तरी ऐकायला आवडेल!!! वडा पाव आवडत खाद्य आपलं....:)
आयला ही पोस्ट कशी चुकली :(
मला घासफुस पण चालत आणि जेवण मस्तच दिसतय... णी शे ध
Post a Comment