शिव पराक्रम गीत!!!!

अफजल खान जेव्हा स्वराज्यावर चाल करून आला होता त्यावर आधारीत हे स्फुरण गीत आहे. हे कोणी लिहलय हे माहीत नाही.हे माझ्याकडे संग्रहित आहे.दुंदुभी निनादल्या , दशदीशा कडाडल्या
केशरी गुहेसमीप उन्मत्त हत्ती चालला ||

वाकुनि आदिलशहास कुर्निसात देऊनी
प्रलय काल तो प्रचंड खान निघे तिथुनी
हादरली धरणीव्योम, शेष ही शहारला
केशरी गुहेसमीप उन्मत्त हत्ती चालला. . . ||१||

खान चालला पुढे अफाट सैन्य मागुनी
उंट, हत्ती, पालख्या ही रांग लांब लांबती
टोळधाड निघे ही स्वतंत्रता गिळावया
केशरी गुहेसमीप उन्मत्त हत्ती चालला . . .||२||

तुळजापूरची भवानी माय महान मंगला
राउळात अफजलखान दैत्यासह पोहचला
मूर्ती भंगली मनात चित्रगुप्त हासला
केशरी गुहेसमीप उन्मत्त हत्ती चालला. . . ||३||

श्रवनी तप्त तेल से शिवास वृत्त पोहचले
रक्त तापले करार खडग सिद्ध जाहले
कालियास मर्दण्यास कृष्ण सिद्ध जाहला
केशरी गुहेसमीप उन्मत्त हत्ती चालला. . . ||४||

सावधान हो शिवा वैर्याची रात्र ही
काळ येत असे समीप साध वेळ तूच ही
देऊनी बळी आजास तो शक्ती भवानीला
केशरी गुहेसमीप उन्मत्त हत्ती मारला. . .मारला. . .मारला ||५||

4 comments:

हेरंब said...

अतिशय सुंदर गीत आहे हे. कवी मलाही माहित नाही पण राष्ट्रीय स्वयंसेवक संघ किंवा संस्कार भारतीच्या कार्यक्रमांमध्ये हे गीत नेहमी असतं. आम्ही ट्रेकला जाताना हे नेहमी म्हणायचो :)

davbindu said...

खरच छान गीत आहे, वाचता वाचताच स्फ़ुरण चढते...

Yogesh said...

@ हेरंब. . .आम्ही पण भटकायला जातो तेव्हा ह्या गाण्याशिवाय भटकंती पूर्ण झाल्यासारखी वाटत नाही!!!

@ देवेंद्र . . ..धन्यवाद!!!!

साळसूद पाचोळा said...

मनमोजी जी,

अतिशय स्फुर्तिदायक गीत आहे, हे मी ३ वर्षापुर्वी कुठेतरी वाचले होते,तेव्हांपासुनच प्रचम्ड आवडले मला. निवडनुक प्रचारादरम्यान यातिल शेवटच्या कडव्याचा आम्ही उपयोग केला होत.