बाबा कदम यांच निधन झाल. . .मराठी साहित्यविश्वातील एक तारा निखळला. . . . त्यांची लिखाण शैली अशी काही होती की अवघ्या मराठी मनाला भुरळ घातली होती. . .त्यांची कादंबरी एकदा वाचायला घेतली की ती पूर्ण होइपर्यंत चैन पडत नाही. मला आवडलेल्या त्यांच्या काही कादंबरी अन् कथा संग्रह : डार्करूम, भालू,बालंट, बिनधास्त, मानसकन्या. अजुन आहेत पण आता आठवत नाही.
अश्या या प्रसिद्ध कादंबरीकार आणि वाचकप्रिय लेखकास भावपुर्ण श्रद्धांजली!!!!!
बाबा कदम यांचे छायाचित्र मराठीमाती वरुन साभार!!!!
Widget by Css Reflex | TutZone
8 comments:
एक काळ असा होता कि बाबा कदम आणि सुहास शिरवळकर यांच्या कादंबरयासाठी नंबर लावायला लागायचा लायब्ररीत....माझी बाबा कदम यांची सर्वात आवडती कादंबरी होती शाळा सुटली पाटी फुटली....सध्या अश्या नाही वाचायला मिळत.... अश्या वाचकप्रिय साहित्यकारास श्रद्धांजली!
मी खूपच कमी वाचलेय बाबा कदम यांचे लिखाण. भालू व बालंट फक्त आठवत आहेत चटकन. यांच्या रहस्यकथा फार गाजत असत. बदला व अजिंक्य आठवतात. भालूही त्यातलीच एक.
माझीही भावपूर्ण श्रध्दांजली.
@Hemant हेमंत, अगदी बरोबर आहे. . .मी सुद्धा खूप वेळा वेटींग मध्ये राहून पुस्तकं घेतली आहेत. . .प्रतिक्रियेबद्दल आभार!!!!
भानस, रहस्य कथा तर एकदम अफलातून आहेत. .त्यांनी अध्यात्मिक सुद्धा लिखान केल आहे. . .त्यांची लिखाण शैली अप्रतिम होती. . . शक्य झाल तर नक्की वाचा!!!
थोड्यादिवसांपुर्वी ( फार तर १५ दिवसापुर्वी) सौ.ने त्यांना कामाच्या संदर्भात फोन केला होता, तेंव्हा तर तर तब्येत वगैरे अगदी छान होती.
कोल्हापुरच्या तांबड्या रश्श्याची आणि पांढऱ्या रश्शाची ओळख यांच्याच कादंबरितुन झाली. पुस्तक सुरु केलं की संपे पर्यंत खाली ठेवलं नाही कधीच..
मनःपुर्वक श्रध्दांजली..
महेंद्रजी, दोन दिवसांपूर्वी अचानक त्यांना अस्वस्थ वाटू लागल्याने रुग्णालयात दाखल झाले होते. . . रात्र रात्र जागून पुस्तक वाचली आहेत. . .खूप वेळा ओरडा पण खाल्ला आहे. . .त्यांची पुस्तक वाचताना जी मजा आहे ती काही औरच अन् ते ही अगदी न थांबता!!!!
आपल्या व माझ्या आवडीनिवडी सारख्याच आहेत.
श्रद्धांजली.
फोटोची लिंक तुटलीये. तेवढं बघा फक्त! :)
Post a Comment