थुंके: सावधान - रु. १००० दंड

पुण्यात सार्वजनिक ठिकाणी थुंकल्यास रु. १००० दंड भरावा लागणार (पुर्वी हा रु.२५ होता फक्त!!!) . . . . असा निर्णय नुकताच पालिका आयुक्तांनी त्यांच्या विशेष अधिकाराचा वापर करुन घेतला. चला निर्णय तर झाला पण त्याच्या अंमलबजावणीच काय??? ह्या निर्णयाची तरी काटेकोर अंमलबजावणी होईल का?? की परत नेहमीप्रमाणे ये रे माझ्या मागल्या. . . . .
अन् चिरी मिरी घेऊन सेटींग करणार्‍या सगळ्यांना एक नवीन कुरण मिळाल चरायला!!!

जाउ द्या यावर किती पण बोलल तरी कमीच आहे. प्रत्येक भारतीय जो पर्यंत सामाजिक शिस्त अन् भान बाळगत नाही तो पर्यंत हे असच चालू राहणार!!!!

2 comments:

भुंगा said...

अंमलबजावणी झाली तरच उपयोग होईल..!

मनमौजी said...

@ भुंगा प्रतिक्रियेबद्दल आभार. . . आपल्याकडे अंमलबजावणी सोडल तर बाकी सार काही होत.