गोष्ट कांदे पोहेंची!!!!

आता लवकरच आमच्या हातात लग्नाची बेडी पडणार आहे. आमच्या जे काही जिवलग मित्र आहेत त्यातील सर्वजण खड्ड्यात पडलेले आहेत अन् आता आमची पडण्याची वाट बघत आहेत. त्यामुळे मनमौजी जगण्याचे दिवस लवकरच संपनार आहेत. सध्या आमच्या मातोश्रीनी फक्त वधु संशोधन हे एकच लक्ष्य ठेवल आहे. त्यामुळे प्रत्येक वीक एंड हा फक्त कांदे पोहे यासाठी राखीव झाला आहे. आतापर्यंत ४-५ कार्यक्रम केलेत. अशेच २ अनुभव आज लिहतोय.

अनुभव क्रमांक १:
आईला खूप दिवस टांग मारुन शक्य तेवढा ही कार्यक्रम पुढे ढकलला होता पण शेवटी तिला बिचारीला यश आल अन् आमचा पहिला कांदे पोहे प्रोग्राम फिक्‍स झाला. मी माझ्या अनुभवी मित्रांकडुन थोड्या टिप्स घेतल्या. काही केल तरी ते मित्र. . . आमची हाणायला कधी तरीच संधी मिळते त्यामुळे त्यांनी त्याचा योग्य तो फायदा घेऊन नको असलेल्या सुद्धा टिप्स दिल्या.
शेवटी ती वेळ आलीच, मी,बाबा, ताई अन् जीजाजी असे आम्ही निघालो गाडीत जीजुंनी त्याचे काही अनुभव सांगितले. खर सांगु का त्या दिवशी कॅया माहीत नाही पण हृदयाचे ठोके ७२ वरुन १४४ झाले होते. हसाल तुम्ही पण खर आहे हे!!!
एकदाच आम्ही तिथे पोहचलो, सुरुवातीला सगळी ओळख परेड झाली नाते संबंध, माझ शिक्षण, नोकरी वगैरे. . अस सार काही बोलून झाल. हे सार चालू असताना मी मात्र एकदम गरीब बिचारा सार काही गुमान ऐकत होतो कधी नाही ते मी एवढा शांत बसलो होतो. काय करणार काही मार्गच नव्हता.
आता मुद्द्याच काम मुलीला बोलवा अस कोणीतरी फर्मावल आता माझ लक्ष होत ते तिच्या एंट्री कडे अन् उत्सुकता पण होती.
शेवटी एकदाच आगमन झाल. .अन् ज्या रीतीने झाल ते पाहून आमचा नकार फायनल झाला. देवा रे जी काही तयारी केली त्यावर सगळा पोचारा फिरला. कोणी काही बोलण्याअगोदरच त्या मुलीने माझ्याकडे पाहून विचारल हाच मुलगा का??? च्यायला हिला काय मी वेगळा कोणी वाट्लो की काय?? ( अजुन एकदा पोचारा. . ) मी देवाच नाव घेऊन पुढील परिस्थितीला सामोर जायच ठरवल. मला तर काही विचारायच नव्ह्तच. पण बाकी सारे जण तुम्हाला मुलीला काही विचारायाच असेल तर विचारा असा आग्रह करू लागले.

त्यांनतर आमच्यात झालेला संवाद असा. ( इथेही सुरूवात तिनेच केली.)

ती : तुम्ही काय करता?
मी : म्हणजे??? ( मी भरपुर काही करतो. . .काय सांगु मी आता???)
ती : जॉब करता की सर्विस ???
मी : (ह्या प्रश्नानंतर जागीच फ्लॅट . .) जॉब.
ती : कुठे कंपनीत का??
मी : ( आता मात्र हद्द झाली. .) हो.
ती : जॉब काय आहे ???
मी : इम्प्लीमेंटेशन ला आहे म्हणजे प्रॉडक्ट सपोर्ट ला. (यातल तिला काही झेपल नाही हे समजलच मला.)
ती : मग मंदीचा काही परीणाम??
मी : (आता मात्र डोक हालल. . काय वैताग आहे??? किती सहन करायच) आज तरी काही नाही उद्या काय होईल सांगता येत नाही.
आता मात्र अचूक काम झाल माझ्या या उत्तरा नंतर मात्र कोणता प्रश्न आली नाही. माझ लक्ष मात्र ताई कडे होत तिला माझा वैताग अगदी दिसत होता. मला तर कधी बाहेर पडतो अस झाल होत.
बाहेर आल्यानंतर मात्र कोणाची मला विचारायची हिम्मत काही झाली नाही. ताई ने मात्र माझी जाम फिरकी घेतली. यानंतर बाबांनी त्यांना नकार कळवुन टाकला. तरी पण आठवडा भर त्या लोकांचा फोन येत होता तुम्ही विचार करा आमच्या मुलीत काय कमी आहे??? का नाही म्हणताय अस खूप काही. . . शेवटी मीच वैतागून सांगितल कमी काहीच नाही पण जेवढ काही आहे ते थोड जास्तच आहे. त्यामुळे नको. तेव्हा कुठे ऐकल.

असा हा आमचा पहिला अनुभव होता.
अनुभव क्रमांक २:
हा अनुभव आपल्या पुण्यनगरीतच आला आहे. . दुपारी बाबांचा फोन आला अन् पदमावतीचा एक पत्ता दिला या ठिकाणी तुला गुरुवारी संध्याकाळी मुलगी पाहयला जायचाय असा हुकुम. तुला जमेल का??, वेळ आहे का??, हे काही नाही डायरेक्ट आदेशच . . . आता मी काय बोलणार बापुडा??? गुरुवारी दुपारी जॉब वरुन एक्स क्यूज घ्यायची अन् मग जायच असा प्लॅन झाला. सोबत कोण येणार. . हा एक मोठा प्रश्न होता पण नॉन व्हेज खाउ घालण्याच्या अटीवर सच्या (आमचे गी.डी.) तयार झाला.
गुरुवारी ठरल्या वेळे नुसार आम्ही पोहचलो. मुलीच्या घरी टिपीकल पुणेरी पद्धतीने स्वागत झाल. त्यानंतर चहा- पाणी झाला. जुजबी माहिती दिल्यानंतर मुलीच्या वडीलांनी जो गप्पांचा फड जमवला की बस्स!!! नक्की आलोय कशाला हाच प्रश्न पडला. त्यांची पिढी अन् आजची पिढी, आजचे तरुण किती भरकट्लेले आहेत, ते किती कर्तृत्ववान आहेत, महागाई, राजकारण, पुण्यातील रस्ते अन् त्यावरील उपाय, कलमाडी, पवार यांच्या कार्याची समीक्षा, हे काय कमी होत म्हणून सच्या च्या गावाकडे पण घसरले तिकडे असणारे त्यांचे नातेवाईक सार काही झाल पण त्यांची गाडी काही मूळ मुद्द्याकडे येईना. शेवटी मीच वैतागून विचारल मुलगी नाही आहे काय??? ( काय करणार दुसरा काही मार्गच नव्हता. . .अस विचारण प्रशस्त वाटत नाही पण नाइलाज होता) यावर त्यांनी दिलेल उत्तर अस " त्याच काय आहे तुमची आणी मुलीची नाड एक आहे त्यामुळे सदर विवाह होऊ शकत नाही. म्हणून आमचा नकार आहे."
तोपर्यंत नाड म्हणजे काय हेच आम्हाला माहीत नव्हत . . .मला हे काही झेपल नाही म्हणून मी सच्या कडे पाहील तर त्याचे पण अवस्था माझ्याहून वेगळी नव्हती. ( नाड आम्हाला एकच माहिती की जो बैल गाडीला वापरतात पण त्याचा . काय संबंध???) शेवटी . . तर्क केला कदाचित हे पत्रिकेतील काही तरी असु शकत.

मला हे समजलच नाही जर नकारच होता तर मला कशाला बोलवल. हीच गोष्ट ते मला फोनवर पण सांगु शकत होते. मी त्यांना विचारल अस का तर म्हणे काही नाही तुम्ही आलात जरा गप्पा पण झाल्या तस पुण्यात आल्यापासून गावाकडच जास्त कोणी भेटत नाही. तुम्ही आल्यामुळे बर वाटल .
यावर मी मात्र काहीच बोलू शकलो नाही. यावर त्यांचा निरोप घेतला अन् आम्ही निघालो. या गप्पा मात्र मला चांगल्याच महागात पडल्या. . . १/२ डे तर गेलाच वर सच्याने या संधीचा योग्य तो उपयोग करून घेतला तो तुम्हाला आता लक्षात आलाच असेल.
यानंतर मी मात्र कांदे पोहे प्रोग्रामचा धसका घेतला आहे. अजुन किती अनुभव घ्यावे लागणार आहेत ते देवालाच माहीत. यावर बाबांची प्रतिक्रिया होती गेले २-३ वर्ष कंपनी अन् कॉंप्यूटर शिवाय थोड दुसरीकडे लक्ष दिल असत तर हे दिवस आले नसते. आता काय बोलणार . . . बोला????

15 comments:

साधक said...

ग्रेट. गप्प मारायला बोलावलं कमाल आहे माणसाची. किप ईट अप.

Mahendra Kulkarni said...

नशिबवान आहात . मस्त कांदे पोहे हाणायचे , आमच्या नशिबात नव्हतं हे... :)

--- "यावर बाबांची प्रतिक्रिया होती गेले २-३ वर्ष कंपनी अन् कॉंप्यूटर शिवाय थोड दुसरीकडे लक्ष दिल असत तर हे दिवस आले नसते. "

आणि हो, तुमचे बाबा बरोबर बोलले... :)
हे बाकी खरंय.... आमच्या घरी मात्र एकदा कळल्यावर पक्कंच करुन टाकलं लग्न.. असो. फार जुनी गोष्ट आहे ती.

Yogesh said...

@ साधक - प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद!!!!

Yogesh said...

@ महेन्द्रजी . . .सध्या तरी तेच करतोय. . जाउन फक्त हाणून यायच.

रोहन... said...

आयुष्य हे चुलीवरल्या कढईतले कांदेपोहे... ;)

दूसरा अनुभव आवडला... मस्त लिहिले आहेस ... :D हो बाबा बोलतात तसे अजून सुद्धा दुसरीकडे लक्ष्य दे की जरा... घर बसल्या मिळतील तूला कांदेपोहे .. :D

भानस said...

हाहाहा....चालू दे. निदान कांदेपोह्यांची चव बरी असूदे म्हणजे बरे. शुभेच्छा!:)

Yogesh said...

@ रोहन आता सुरूवात केली . . .बघू काय होतय ते!!!

@ भानस अहो खूप वेग वेगळ्या प्रकारचे पोहे खायला मिळतात. . .अन्न हे पूर्ण ब्रम्ह. . .नाही म्हणायच नाही. . .अन् रेटुन हानायच.

Suhas Diwakar Zele said...

छान वाटल तुझा अनुभव वाचून. आजपर्यंत मुलींच्या कांदे पोहे कार्यक्रमाचे अनुभव ऐकले होते, माझ्याच वर्ग मैत्रिणी कडून पण मुलांची पण अशी पंचायत होत असेल असा माहितीत नव्हता. आता तर मला सावध रहायला हवा :-)

अपर्णा said...

गेले २-३ वर्ष कंपनी अन् कॉंप्यूटर शिवाय थोड दुसरीकडे लक्ष दिल असत तर हे दिवस आले नसते. mazi aaai mala pan hech mhanli hoti...kalaji karun nakos....kuthe tari gathi marun thewlya astat..mag nantar aayushbhar sodwat basa kai....:)
Goodl luck....

Yogesh said...

@ सुहास . . .तयारी चालू करा. . .किंवा तुम्हीच शोध मोहीम चालू करा!!!

Yogesh said...

@ अपर्णा. . . अगदी खर आहे. . . . तो पर्यंत लगे रहो!!!!

Ajay Sonawane said...

तुझा हा लेख माझ्या हातुन वाचायचा कसा राहिला माहित नाही. पण एकंदरीतच मस्त जमलाय. स्पेशली तुझा दुसरा अनुभव. एकदम झक्कास !
बाबांचं ए॑का आतातरी, कॉम्प्युटर सोडून अजुनही इकडे तिकडे पहात जा :-)

-अजय

हेरंब said...

हा हा हा .. भारी !!! दुसरा अनुभव आणि तुझ्या बाबांचा सल्ला दोन्ही अनमोल !! :P

सागर said...

"यावर बाबांची प्रतिक्रिया होती गेले २-३ वर्ष कंपनी अन् कॉंप्यूटर शिवाय थोड दुसरीकडे लक्ष दिल असत तर हे दिवस आले नसते. "

आम्ही ही वेळ आणणार नाही !!!!

kairen said...

असे अनुभव येतात हे खरे आहे .
काळ बदलत चालला , दुसरे काय ???????
सगळ्यांच्याच अपेक्षा वाढल्या आहेत . त्याचा हा परिणाम .
तू लिहिण्याची तसदी घेतली त्याबद्दल आभार .

मी 22kiran@gmail.com