एक दिवस व्हेज पुलाव करायचा असा बेत झाला. . .जोगळ्याने फोन करून नेहमीप्रमाणे सारी साधन सामग्री आणायला सांगितली. सुरुवातीला आम्ही कर्वे नगराला रूम राहत होतो त्यामुळे ताज्या भाज्या लगेच मिळून जायच्या. त्या दिवशी जोगळ्या येई पर्यंत सारी तयारी करून ठेवली. तो आल्यावरच पुलाव करू म्हणजे मग गरमा गरम हाणता येईल हा हेतू. . . ( खर कारण म्हणजे एकदा पुलाव झाला असता तर त्याची वाट बघत कोण बसल असत???? त्या अगोदरच सगळा सुपडा साफ झाला असता. . म्हणून वाट पाहायची) . . .त्या दिवशी नेमक त्याला यायला ११.०० वाजले.. . आम्ही तो पर्यंत कच्च्या भाज्यांवर आडवा हात आणला त्यामुळे भूक बर्यापैकी कंट्रोल मध्ये होती.
रात्री ११.०० नंतर मग आमचा पुलाव गॅसवर चढला. . . त्यानंतर मात्र मग पोटातील कावळ्यांनी चांगलीच बोंब मारायला सुरूवात केली. . . . कधी पुलाव शिजतोय यावरच सारख लक्ष होत.. . .५ मिनिट सुद्धा युगासारखे वाटत होते. . .तोच आमच्या गॅसने अर्धवट पुलाव झाल्या नंतर जीव सोडला. . . .वेळ रात्रीचे ११.४५-१२.०० ची पुलाव अर्धवट . . .जोराची भूक लागली होती. . .आता करायच काय??? पुलाव शिजवायचा कसा?? मोठा यक्ष प्रश्न. शेजारच्या काकू पण झोपल्या होत्या. . . भुके मुळे डोक पण चालेनास झाल होत. तोच आमच्या दोघांची नजर पेपरच्या रद्दीवर गेली. . .दोघांनाही न सांगताच मार्ग सापड्ला होता. . .गरज होती ती फक्त ३ दगडांची. . . आमची रूम साधीच होती त्यामुळे फरशी खराब झाली तरी साफ करता येऊ शकत होती. . . बाहेरून बाजूच्या पडलेल्या कंपाउंड वॉल चे दगड घेऊन आलो.मस्त पैकी ३ दगडांची चूल केली अन् सरपण म्हणून पेपरची रद्दी होतीच. . . .सारी रद्दी जाळून कसा बसा पुलाव आम्ही शिजवला. . . पण आता नवीनच प्रश्न आला होता. . रद्दीमुळे सगळी कडे प्रचंड धूर झाला होता. . त्यामुळे मागील बाजूची खिडकी उघडली. . त्याच्या वासाने वरच्या मजल्यावर राहणारे मालक जागे झाले. . .आता मात्र आमची वाट लागली होती. . काकांना समजल तर चंबु गबालं आवरून निघाव लागल असत. . शेवटी डोक चालवल सर्व लाइट बंद करून बाहेर निवांत गप्पा मारत बसलो. . .अंदाजाप्रमाने काका खाली आलेच. . त्यांना कस तरी कट्वल. . .नशीब ते लवक्र गेले. . त्यांना वाट्ल की मागील बाजुकडील कोणीतरी कचरा पेट्वतय त्यामुळे ते निघून गेले अन् हे पटवून द्यायला आमच्यासारखे अत्यंत विश्वासू भाडेकरू होतेच. . . . जाताना लाइट बंद करून झोपा हे सांगायला ते विसरले नाही. .आता आम्ही लाइट पण चालू ठेवू शकत नव्हतो. . .लाइट चालू राहिली तर काका परत खाली यायला बसले. . .आता जेवायच कस??? नशीबाने १ मेणबत्ती सापडली. . .मग काय. . .मेणबत्तीच्या प्रकाशात रद्दीवर शिजवलेल्या पुलावावर आडवा हात मारत होतो. . ते झाल्या नंतर जळालेल्या रद्दीची योग्य ती वाट लावली.. . पण खराब झालेली फरशी साफ करताना मात्र वाट लागली होती.
तर अस हे आमच कॅन्ड्ल लाइट डिनर झाल होत!!!! अशी डेट पुन्हा होणे नाही. . . बाकी पुलाव एकदम झॅक झाला होता बगा!!!!
Widget by Css Reflex | TutZone
6 comments:
वा... कसले उद्योगधंदे करता रे... पुलाव बनवायला ही असे एक-एक भन्नाट प्रकार. सही आहे.. तसा माझा पिंड सुद्धा खाण्याचा बरं कां.. पण मी पक्का मांसाहारी. तुझ्या त्या जोगळ्यासारखा. :D हा.. हा.. आपला सुद्धा एक खास फूडब्लॉग आहे... आठवणीतला... :)
रद्दी पेपरवर शिजवलेला पुलाव. अफलातुन आय़डिया आहे. मी कॉलेज मधे असतांना एक सिंधी मित्र होता. त्याच्या घरचे सगळे लोकं गावाला गेले होते, तेंव्हा आम्ही ठरवलं की आज बिर्याणी करायची. त्या मित्राला सगळी प्रोसिजर माहिती होती. चिकन आणलं.. त्याने बिर्याणी बनवली. हे सगळं करतांना तो सिंधी भाई एक कपडा हात पुसायला वापरत होता. नंतर त्याच कपड्याने भांडी पुसली. बिर्याणी झाल्यावर त्याच कपड्याने टेबल पुसला. त्यावर ताटं ठेवली.. ती पण पुसली (!) आणि ..... बसं की आता.. पुढचं समजुन घ्या.. इतके स्वच्छ पणे शिजवल्यावर आम्ही मस्त ताव मारला. आणि नंतर पुढे आयुष्यभर त्या मित्राला स्वच्छतेवरुन छळलं..
@ रोहन . . .धन्यवाद. . .पोटासाठी सार काही रे!!!!. . तुझा फूड ब्लॉग ... मस्त आहे. .
@ महेंद्रजी. . बिर्यानी अगदी भन्नाट झाली असणार. . .बरोबर आहे ना???
आयला मस्तंच...
पुलावाचं ऍडव्हेंचर
हाहाहा.. आयला काय जब्बरदस्त रे.. झक्कासच.
ते मालकांचं वाचताना मला सतत बनवाबनवी वाले सुधीर जोशी आणि अशोक, लक्ष्या आणि सचिन दिसत होते ;)
Post a Comment