प्रिय आफ़्रिदी,
दोन दिवसांपुर्वी तु मायदेशात दाखल झाला तेव्हा तु मिडीयासमोर दिलेली मुलाखत पाहुन मला आश्चर्याचा धक्काच बसला होता.....हे अस कस शक्य आहे....तो बोलणारा नक्की तुच आहेस का??? एवढा संवेदनशील अन परीपक्व तु कसा होऊ शकतो....पण असो तुझ्या कालच्या मुलाखतीने मनावरील शंकाचे सर्व ढग दुर झाले...अन पुन्हा एकदा दाखवुन दिल की तु बदलेला नाहीच मुळी तु जसा आहे तसा आहेच...ते म्हणतात सुंभ जळाला तरी पीळ जात नाही.
सरड्याप्रमाणे रंग बदलत अवघ्या दोन दिवसात तु तुझी दोन वेगवेगळी रुप दाखवली...अर्थात तु हे जे काही केल हे स्वतःला वाचवण्यासाठीच...पण नेहमी एक लक्षात घे स्वतःचे अवगुण लपवण्यासाठी किंवा स्वतःच अपयश झाकण्यासाठी दुसर्याला बदनाम करायची काही एक गरज नसते.
तुझा पहिला आक्षेप आहे की भारतीय खेळाडु मोठ्या मनाचे नाहीत....पण एक लक्षात घे पंचाच्या निर्णयाची वाट न पाहता स्वतःहुन पॅव्हेलियनचा रस्ता पकडणार्या तेंडुलकरचा हा संघ आहे.....अस एक उदाहरण तरी आहे का तुझ्या संघात?? तुमच्या बकबकीला नेहमीच आम्ही आमच्या खेळातुन उत्तर दिल आहे. मग तो तेंडुलकर असो, गंभीर असो किंवा व्यंकटेश प्रसाद.इतिहास काढायचा झाला तर तुम्ही मैदानात केलेल्या पराक्रम सर्वश्रुत आहेच....अरे तुम्ही प्रामाणिकपणे हारला तरी आहात का??
आमचा संघ हा एकसंध आहे...त्यांची एकजुट तु विश्वचषक जिंकल्यानंतर पाहिलच असशील. आपल्या सहकर्यांना शिव्या घालण्यात धन्य मानणार्यांनी मनाच्या मोठ्यापणाच्या गप्पा करु नयेत.
आता आक्षेप दुसरा....गंभीर बद्दलचा....त्याने हा विजय २६/११ च्या शहिदांना समर्पित केला तर तुझ्या का बा पोटात कळ आली?? कसाब तुझ्या देशाचा आहे म्हणुन? आमच्या देशात होणारे दहशतवादी हल्ले,अतिरेकी कारवाया याचे कर्ते करविते कोण आहेत हे जगाने पाहिलच आहे.जेव्हा जेव्हा आम्ही मैत्रीचा हात दिला तेव्हा तेव्हा तुम्ही आमचा विश्वासघातच केला...एका बाजुला मैत्रीसाठी बोलणी करायची अन दुसर्या बाजुला आमच्या देशात अतिरेकी घुसवायचे हे अगदी साळसुदपणे चालु आहे. २६/११ च्या हल्ल्यात आम्ही काय गमावल आहे हे तुझ्या सारख्यांना संवेदना नसलेल्यांना नाही कळणार.
आता आक्षेप तिसरा...आमची मिडीया.....तुझ्या माहिती साठी सांगतो आमच्या देशात लोकशाही आहे...लोकशाही म्हणजे लोकांनी लोकांसाठी चालवलेले राज्य....तुला ही व्याख्या झेपणार नाही हे माहित आहे तरी पण प्रयत्न केला...तर..आमच्या लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणुन माध्यमांकडे पाहिल जात...सध्या काही वाईट प्रवृत्ती आल्या आहेत पण त्यामुळे सारीच प्रसार माध्यम वाईट होत नाही. जेसिका लाल की जिला आमच्या प्रसारमाध्यमांमुळे न्याय मिळाला...आमच्या देशात व्यक्तीस्वातंत्र्य आहे...अशा अनेक विधायक गोष्टी आहेत की ज्यांना आमच्या देशातील प्रसारमाध्यमांनी जगापुढ आणल आहे.आमच्या देशात प्रसारमाध्यमांचा आदरयुक्त दरारा आहे...तुमच्या माध्यमांमध्ये काय चालत हे मी काही नव्याने सांगायची गरज नाही.
आमचा देश हा कलाकार अन त्यांची कला याचा सन्मान करणारा आहे म्हणुनच तुझ्या देशातील कितीतरी कलाकार इकडे येण्यास उत्सुक असतात. नुसरत फ़तेह अली खान,राहत फ़तेह अली खान,शकील यासारख्या ्कलाकारांना प्रसिध्दी,पैसा,मान मरातब हा आम्हीच मिळवुन दिला आहे.एवढच काय तर सा रे ग म प सारख्या स्पर्धेतुन तुझ्या देशातील नवोदित गायकांना व्यासपीठ मिळवुन दिल. कारण आम्ही कलेचे सन्मान करण जाणतो एवढा आमचा मनाचा मोठेपणा आहे.
अरे तुम्ही तुमच्या कलाकरांना जे देउ शकला नाही आमच्या देशाने दिले आहे. आमच्या देशाने तुम्हाला काय नाही दिले...सार काही आमच्या देशाने दिले आहे अगदी तुमच्या अस्तित्वा पासुन ....
आमच्यासाठी आमची मातृभुमी कोणत्याही जात,पात अन धर्म याहुन मोठी आहे.आमच्या ह्र्दयामंध्ये फ़क्त प्रेम आहे ते ही कोणत्या धर्माच्या रेषेशिवाय. इथे प्रत्येक जण हिंदु,मुस्लीम, शीख, ख्रिश्चन असण्याअगोदर भारतीय आहे. म्हणुनच की काय २६/११ चा हल्ला असो किंवा क्रिकेटचा विश्वविजय प्रत्येक क्षणी इथे प्रत्येक जण फ़क्त भारतीयच आहे अन भारतीयच राहणार.
तु म्हणतो त्या प्रमाणे जर भारतीय चुकुन कधी संकुचित झाले तर जगाच्या नकाशावरुन एक देश कमी होइल हे लक्षात घे.
जयहिंद
-एक सामान्य भारतीय.

Widget by Css Reflex | TutZone
39 comments:
मस्त योगेश.. चोख उत्तर...
अप्रतिम... एकदम मनातले.....
जबर्या योगेशा!!
आज सारवासारवही केलीय साहेबांनी! :D
अगदी खर आहे जर आफ्रिदीला मराठी नसेल समजत तर आम्ही त्याला ट्रासलेट करून देतो. हा नेहमीच रडीचा खेळ खेळतो रड्या कुठला
सापाची जात रे शेवटी, अजून काय अपेक्षित होत...मला खुप आदर वाटलं होता त्याच्याबद्दल जेव्हा त्याचा पहिला इंटरव्हू बघितला, पण काल जे बघितलं, त्यानंतर %$$#%$^%&^*&^*&*&
जबऱ्या पोस्ट :)
मस्तच ! सणसणीत !! अगदी सचिनच्या कडक स्ट्रेट ड्राईव्ह सारखा !!
शेपटी कधी सरळ नाही होणार यांची.
यवगेशा एकदम चाबूक पोस्ट....!!!
After losing Semi-Final you left with Dignity and now you are back with PIGnity...
यवगेशा मनातले लिहीलेस रे अगदी....
त्याची आधिची मुलाखत पाहून त्याच्याबद्दल क्षणभर आदर वाट्ला होता पण मुक्ताफळं उधळली लगेच त्याने....
चोख उत्तर...
मस्त रे!! यवगेश
त्या ‘प्रिय’ शब्दा जागी वेगळा शब्द असायला हवा होता. :-)
चोख!
जब्बरदस्त पोस्ट योगेश.. एकदम कड्डक !!!!
>> आज सारवासारवही केलीय साहेबांनी! :D
योग्याची पोस्ट वाचून घाबरून जाऊन केली असेल त्याने सारवासारव ;)
कडक,चाबुक..दणदणीत पोस्ट...योगेश..जबरी रे....
योग्या, भावा, तोडलंस.... पार तुकडं तुकडं केलस ............:)
अप्पा...धन्यवाद रे.
इंद्रधनु....ब्लॉगवर स्वागत अन प्रतिक्रियेबद्दल आभार
्विभि...धन्यवाद...अरे आधी बोलायच अन नंतर घुमजाव करायच...काय उपयोगाच .
स्नेहल...खरच रड्या आहे तो...
सुहास...डोक्यात गेला रे तो...कधीच नाही सुधारणार.
दीप्या धन्यवाद भावा :)
योगेशभाऊ! अ फ ला तू न! ! !
योगेश छानच झाली आहे पोस्ट...एकदम A1!!!!
शेवटचे ३ परिच्छेद तर अप्रतीम आहेत! :)
श्रिया ताई...धन्यवाद...
विनायक काका....खुप खुप हाभार्स
अपर्णा...धन्यवाद..
माउ ताई...ठांकु.. :)
हेरंब...हे...हे...हे..वाचली असेल कदाचित :)
@ अनघा ताई,निवेदिता....प्रतिक्रियेबद्दल आभार
दीपक..खरच रे..पण जाउ दे त्यांच्यात अन आपल्यात काही तरी फ़रक आहे.
राजै...धन्यवाद..
तन्वी ताय...त्याची पहिली मुलाखत ऐकुन बर वाटल होत..पण हे जेव्हा ऐकल तेव्हा जाम डोक्यात गेला.
सिद्ध्या...लय भारी...एकच नंबर..
देवेंद्र...धन्यु रे :)
सपा...डोक्यात गेलाय तो...पाहिल तरी चीड येते...हे साले हम नही सुधरेंगे कॅटेगरी आहेत.
सगळ्यांच्या मनातलं व्यक्त केलं आहेस! सही!
great answer! Great Post!
अनुजा...धन्यवाद :)
Surekh! Chokh pratiuttar diles mitra.
Post a Comment