आणि बुद्ध हसला....

तब्बल २८ वर्ष ह्या क्षणाचा करोडो लोक वाट पाहत होते...अखेरीस तो आज पुर्णत्वाला गेला.

आपला सचिन गेली दोन दशक ज्याने विक्रमांचे डोंगर रचले.ज्याच्या झोळीत आज पर्यंत असंख्य विक्रम आहेत तरी पण एका गोष्टीची कमतरता होती ती म्हणजे "विश्वचषक". जस एखाद्या पांढ्र्‍या शुभ्र कागदावर एक लहानसा काळा डाग असावा अन त्या डागाच अस्तित्व संपुर्ण पांढर्‍या शुभ्र कागदला झाकोळुन टाकत.तसच काहीस सचिनच्या बाबतीत झाल होत.गेली दोन दशक त्या डागाच ओझ मनावर होत...सचिनच्या अन प्रत्येक सचिनच्या चाहत्यावर.आज अखेरीस ते दडपण दुर झाल.





कालच्या सामन्यात सचिन खेळला नाही याच नक्कीच दुःख आहे पण दुसर्‍या बाजुने विचार केल्यावर वाटत एका दृष्टीने बर झाल आजपर्यंत ज्याने आपल्या खेळाने प्रत्येकाला भरभरुन दिल.अनेक कठीण प्रसंगी देशाचा तारणहार झाला.त्याला जर याचा परतावा द्यायचा असेल तर काल आपल्या टीम ईंडीया ने ज्या रितीने परतावा केला याहुन अमुल्य असा परतावा होऊच शकत नाही. गेली दोन दशक ज्या हातांना फक्त दान देणं एवढच ठाउक होत त्या हातांनी काल प्रथमच काही घेतल आहे.

मायभुमीमध्ये मिडीया, रवी शास्त्री सारखे विघ्नसंतोषी लोक व चाहत्यांच्या अपेक्षांच ओझ अशा प्रचंड दडपणात टीम इंडीया ने जो खेळ केला आहे त्याला मनापासुन सलाम करावासा वाटतो आहे.

चक  दे इंडीया......

टीम इंडीया तुमचे खुप खुप आभार....आयुष्यातील खुप अविस्मरणीय अशे क्षण दिले आहेत....कोणी काही बोलो आम्हाला तुमचा अभिमान आहे.

3 comments:

Suhas Diwakar Zele said...

खुप छान वाटताये रे काल पासून... शब्दचं नाहीत बघ. भारतीय संघाचे खुप अभिनंदन.
धोणी थँक्यू रे गड्या, दिलेला शब्द केलास पुर्ण :) :)

हेरंब said...

खरंच सगळं मिळालं.. आता आयुष्यात काहीही मागणं नाही !!

रच्याक, विघ्नसंतोषी लोकांची यादी मिडीया, रवी शास्त्री एवढ्यांवरच मर्यादित नाहीये. अजूनही चिक्कार लोक आहेत खो घालणारे !! ;)

Anuja Khaire said...

After the last six, I was amazed to see people’s inexhaustible enthusiasm to celebrate this victory! YEeeeeeeeeeeeeeeeeeeee proud to be an Indian...!

Great Post!