लग्नानंतर कुलधर्माप्रमाणे जेजुरी इथ जाण क्रमप्राप्त होत.आपण फ़क्त जेजुरी ला न जाता कडेपठारला पण जाउ या असा प्लॅन झाला.ठरल्याप्रमाणे पहाटे घरुन जेजुरीच्या दिशेने प्रयाण केल.सकाळी लवकरच आम्ही कर्हा नदीवर पोहचलो.स्वागताला पार्किंगची पावती घेउन उभा होता.
मी : हे पार्किंग देवस्थानच की सरकारच?
तो: हे खाजगी पार्किंग आहे.
मी: अरे पण हे तर नदी पात्र खाजगी कस?
तो:(च्यायला लय शहाण दिसतय...मनात) ओ तुम्हाला जायच असेल तर पावती फ़ाडावी लागेल नाही तर जाता येणार नाही.
एकंदरीत सर्वांचा राग रंग पाहुन गुपचुप पावती फ़ाडली.प्रश्न पैश्यांचा नव्हता पण याला फ़ुकट पैसे का द्यायचे हा होता.असो गरजवंताला अक्कल नसते.
नदी पात्रात अन परीसरात घाणीच साम्राज्य होत.प्रचंड प्रदुषण होत.अश्या पाण्यात आंघोळ करावी लागणार होती.बिलकुल चिडचिड न करता त्यातल्या त्यात बर्यापैकी स्वच्छ असणारी जागा शोधुन आंघोळ उरकुन घेतली.त्यानंतर लगेच गोंधळी तयारच होता ठरलेली पुजा, नैवेद्य इ. सोपस्कार उरकुन घेतले.आता वेळ आली दक्षिणा द्यायची.मी आपले रु.१०१ काढुन ठेवले (मला तर ते ही जास्त वाटत होते) पण रु.५०१ च्या कमी घ्यायला काही तयार होइना.त्याच गिर्हाइक वाढत होत त्यामुळ त्याला घाइ होती. "अहो भाउ लग्न एकदाच होत. ५०० नी तुम्हाला काय फ़रक पडणार आहे.खंडोबाच्या नावानं द्या की"..अस म्हणत त्यान मोर्चा बायकोकडे वळवला "अवो वहिनी तुम्ही सांगा की ऐकतील तुमच"....च्यामारी लय वांड दिसतय..(मनातल्या मनात)...चल घे बाबा ५०१ तर ५०१...अस म्हणुन ५०० ची नोट त्याच्या हातावर टेकवली...(घे लग्न करायची खुप हौस होती ना..अस उगीच कोणी तरी म्हणल्याचा मला भास झाला)
आता आम्ही कडेपठारच्या दिशेने निघालो.पायथ्याशी पोहचल्यावर कडेपठार पाहुनच खुप दमछाक होणार याचा अंदाज आला होता.आम्ही सर्व जण मस्त मजा करत हळु हळु गड चढायला सुरुवात केली उन्हाळा असल्यामुळे सकाळच्या कोवळ्या उन्हात पण त्याची तीव्रता भासत होती.नवीन लग्नाची जोडी म्हणुन आजु बाजुची जनता आमच्याकडे नवलाइने पाहत होती.मजल दरमजल करत आम्ही अखेर गडावर पोहचलो.गडाचा परीसर,मंद थंडगार वारा याने सगळा थकवा आपोआप गळुन गेला.थोडा वेळ आराम करुन मग आम्ही पुजेसाठी मंदीरात निघालो.मंदीर खुप सुंदर आहे.दीपमाळ, जुनं दगडी बांधकाम तर निव्वळ अप्रतिम आहे.
आम्ही जोडीने आत मध्ये प्रवेश करताच एखाद्या शिकार्याला सावज सापडल्यानंतर जसा आनंद होतो तसा काहीसा भाव मला तिथल्या पुजार्यांच्या चेहर्यावर वाटला.इथे पण आपल्याला कापणार आहेत याची मला नकळत जाणीव झाली.नवपरीणीत जोडप्यांसाठी असणारी पुजा अगदी सराइतपणे त्याने उरकुन घेतली.पुजा काय केली हे मात्र काही समजल नाही.तो काही तरी मंत्र पुटपुटत होता...काय ते त्यालाच त्याच माहित.(मी मंदीराच अंतर्गत बांधकाम न्याहळ्याणतच गुंग होतो अधे मधे तो काही तरी मंत्र बोलायला लावायचा तेवढे फ़क्त म्हणायचो) अखेरीस पुजेचे सोपस्कार पार पडले नेहमीप्रमाणे दक्षिणा देण्याची वेळ आली.मी पैसे देण्याअगोदरच त्याने रु.१००० ची मागणी केली. मी ऐकुनच हादरलो ...याने १००० रुपये देण्याइतपत अशी पुजा केली तरी काय? नेहमीप्रमाणेच मी आपला वाद विवादाला सुरुवात केली.शेवटी कसा बसा तो ५००वर तयार झाला.(च्यायला ४ वर्ष इंजिनिअरिंग करण्या पेक्षा पुजारी झालो असतो तर बर झाल असत.)
आता कडेपठार वरुनच जेजुरी गडावर जायच होत.अंतर खुप होत.जेजुरी गडावर जाइपर्यंत खुप दमछाक होणार होती.त्यात भाची कडेवर होती त्यामुळे हळु हळु चालाव लागत होत.शेवटी एकदाच जेजुरी गडावर पोहचलो.लग्न सराइ असल्यामुळे दर्शनासाठी प्रचंड गर्दी होती.रांगेत उभ राहिलो तर दर्शनासाठी ३ ते ४तास लागणार होते.त्यामुळे दर्शन पासाची काही सोय आहे का हे पाहयला गेलो.अवघ्या प्रत्येकी ५० रुपयात फ़क्त तीन मिनीटात दर्शन अस ट्रस्टच्या वतीने लावलेल्या बुथवर एकजण बोंब ठोकत होता.पटकन दर्शन होइल या अपेक्षेने मी आम्हा सर्वांचे पास काढले अन मंदीरात आत मध्ये गेलो तिथे पाहिल तर
पास असणार्यांसाठी वेगळी अशी रांग नव्हती.दर्शन रांग अन पास असणारे यांची सामाइकच रांग होती.तिथे असणार्या पुजार्याला या संदर्भात विचारल तर तो म्हणाला पास हा देवस्थान ट्रस्टचा आहे त्याच्याशी आमचा काही एक संबंध नाही तुम्हाला तक्रार करायची असेल तर ट्रस्टच्या कार्यालयात जा.शेवटी तब्बल अर्धा तास वाट पाहिल्यानंतर प्रचंड रेटा रेटीतुन आमचा नंबर आला.नवपरिणीत जोड्यांसाठी तिथे असणार्या पुजार्याने आम्हा दोघांना बाजुला घेउन कसली तरी पुजा केली, नाव घ्यायला लावली अन १०००रुपये दक्षिणा घेतली.तिथे वाद घालण्याची काही संधीच नव्हती कारण येणार्या प्रत्येक नव्या जोडप्याकडुन ते अश्याच रितीने पैसे घेत होते.ती पुजा आटोपुन निघतोय तोच अजुन एका पुजार्याने पकडले अभिषेक करावा लागतो म्हणुन त्याने ५००रुपये (इथे पण त्याने अभिषेकाचे रेट सांगितले होते...५०० हा सर्वात कमी रेट.) घेतले.ह्या लोकांची पद्धत अशी काही आहे की ते नवख्या लोकांना बचावाची काही संधीच देत नाही.
आतील दर्शन पुर्ण करुन बाहेर जात होतो तर तिथेच अजुन एक पुजारी भेटला, अहो बाशिंग उतरवल्याशिवाय जाता कुठे इकडे या असा जोरदार आवाज दिला.सुरुवातीला काय बोलतोय काही समजलच नाही.हा नक्की काय म्हणतोय हे पाहण्यासाठी त्याच्या जवळ गेलो.
पुजारी:लग्नात काय बांधल होत? मुंडावळी की बाशिंग
मी: बाशिंग
पुजारी: मग तुम्हाला बाशिंग उतरावयला लागेल.
मी: ते गृहप्रवेश झाल्यावरच उतरवलय
पुजारी: नाही तस नाही उतरवत ते इथच उतराव लागत.
मी: नाही उतरवल तर.
पुजारी: सांगितल ना कुलाचाराप्रमाणे ते इथे उतरावच लागत.
कुलाचार म्हणाल्यावर काय बोलणार??? उतरवल इथ बाशिंग (म्हणजे काही तरी पुजा केली...न समजणारे मंत्र म्हणाला) ....पुन्हा ५०० ला चंदन....मनातल्या मनात खुप चरफ़डत होतो पण करणार काय??? हे सार संपवुन झाल बाहेर आलो ...आता तरी सुटलो अस वाटत होत तोच तळी भरायची बाकी आहे..ती भरुन घेउ या...तीर्थरुपांनी आदेश दिला.त्यामुळे तळी भरायल गेलो.तिथे पण सगळीकडे भेटले तशेच तळी भरणारे तयारच होते. तळी भरली...(यांचे आत्ताच दोनाचे चार हात झालेत लवकरच सहा हात होऊ दे...असा आगाउपणा त्याने केला.)तळी,शिदा देणे अस मिळुन याने पण पाचशे घेतले.
अवघ्या काही मिनीटात मी ३५०० हजाराला कापलो गेलो होतो.खर तर या सगळ्या गोष्टींचा संताप येत होता.देवाच्या नावाखाली ढळढळीत लुट चालु होती पण यांना अडवणार कोणीच नव्हत.हाच आमचा खरा धर्म आहे का??एवढे पैसे घेउन पण गडावर सगळा आनंदी आनंद होता.चहु बाजुला प्रदुषण,सुविधांचा अभाव, भिकार्यांचा सुळसुळाट.सगळा भोंगळ कारभार आहे.दुर्दैवाने याकडे सर्वांनीच दुर्लक्ष केलेल आहे.
या सगळ्यात मला देव कुठ भेटलाच नाही.मंदीरात गेल्यानंतर मनाला जे समाधान लाभत ते मात्र इथ आल्यावर मी हरवुन बसलो होतो.अस्वस्थ मनानेच जेजुरी सोडल तेव्हा दुरवर डोंगरावर गडापासुन दुर माणसापुढे हतबल झालेला खंडोबा आपल्या परीवारासह आराम करत असल्याचा भास झाला.
सोन्याने मढवलेला किंवा पैश्यांचा बाजार मांडलेला देव मला खुप दीन दुबळा वाटतो.शिर्डी किंवा तिरुपती यापेक्षा गडावर असलेल्या छोट्याश्या मंदीरात असणारा देवच मला भावतो.तिथल्या वातावरणातच मला जास्त समाधान लाभत.
Widget by Css Reflex | TutZone
21 comments:
देवीला साकडे घालतो........
दादा-वहिनी तुम्हावर देवीची कृपादृष्टी राहो.
सौख्यभरे नांदा.
-- (पुजारी)सचिन.
(५०००/- रु. ताबडतोप पोस्टाने पाठवून द्या. देवीचा आशीर्वाद आणि प्रसाद आम्हीं पाठवण्याची व्यवस्था करू)
देवाच्या दारात बाजार मांडलाय.
btw इतक्या वर्षांनी केल्यावर देव/देवी सगळे फेडून घेतात.
kharaya tujha, mi hi asa anubhav ghetala ahe
>>>>सोन्याने मढवलेला किंवा पैश्यांचा बाजार मांडलेला देव मला खुप दीन दुबळा वाटतो.शिर्डी किंवा तिरुपती यापेक्षा गडावर असलेल्या छोट्याश्या मंदीरात असणारा देवच मला भावतो.तिथल्या वातावरणातच मला जास्त समाधान लाभत. ....अगदी बरोबर!!
यावेळेस सुट्टीत आम्हिही जेजुरीला गेलो होतो असलाच अनुभव आला रे.... नको वाटतात असली देवस्थान मग!!!
अरे हे सगळे दलाल आहेत दलाल!
>>सोन्याने मढवलेला किंवा पैश्यांचा बाजार मांडलेला देव मला खुप दीन दुबळा वाटतो.शिर्डी किंवा तिरुपती यापेक्षा गडावर असलेल्या छोट्याश्या मंदीरात असणारा देवच मला भावतो.तिथल्या वातावरणातच मला जास्त समाधान लाभत.
एकूणएक मनातलं!
>> या सगळ्यात मला देव कुठ भेटलाच नाही.
"देव देहात देहात, का हो जाता देवळात.." कोणीतरी म्हणून ठेवलंच आहे..
कसली वाईट्ट लुटालुट आहे रे ही. आणि तीही देवाच्या नावाखाली. काही वेळाही अश्या असतात नं की अगदी नाईलाजाने आपला बळी जातोच. :(
खरं तर या प्रथाच बदलायला हव्यात. घरातही कुलस्वामिनीची मूर्ती, फोटो असतेच की. हे असे लुटून घेण्यापेक्षा तान्हया बाळांच्या अनाथालयात संपूर्ण दिवस घालवावा व हे सारे पैसे अजून जमेल तितकी भर घालून त्यांना गरजेचे सामान आणून द्यावे. कुलदेवता भरून पावेल.
पोस्ट छानच झालीये. तुझा आधी त्रासलेला मग चिडलेला आणि शेवटी हताश-हतबल चेहरा डोळ्यासमोर आला. :D
मनमौजी छान लिहिलं आहेस. तुझ्या भावना मी तंतोतंत समजू शकतो. असल्या जाचामुळे मी तिर्थस्थानी जाणच सोडलं. स्थान-महात्म्याच्या आणि जागृत देवस्थानाच्या नावाखाली नुसती लुट आणि गलिच्छपणा. त्यापेक्षा घरच्या देवाची पुजा केली आणि पैसे एखाद्या सेवाभावी संस्थेला दिले तर देव नक्कीच पावेल. शेवटचे दोन परिच्छेद तर एकदम भन्नाट.
सपा....पाठवले आहेत...मिळताच कळव बर का???
अजय..धन्यु रे...हे अशे अनुभव आले की जाम वैताग येतो.
तन्वी ताय...जेजुरीला तर परत जाण्याची माझी इच्छाच राहिली नाही.निव्वळ भक्तीचा बाजार मांडला आहे.
विभि..अगदी बरोबर बोललास "दलाल" आहेत हे सगळे.
हेरंब...हे सर्व माहित असुनही शेवटी मंदीरे उभी राहतातच ना??? आयुष्यभर अतिशय साधेपणाने राहिलेल्या साइ बाबांच्या शिर्डीत आज काय चालु आहे?? हे माहितच आहे. आता देव सुद्धा पैश्यावाल्यांचा झाला आहे.
श्री ताइ अगदी बरोबर आहे.यापासुन धडा घेत मी आता ठरवलय एक तर अश्या ठिकाणी जायच नाही अन गेलो तरी फ़क्त दर्शन करायच.ते पैसे कुठेतरी अनाथलयात द्यायचे.
अभिलाष...धन्यु रे!!
मनातलं बोललास
(अति विलंबीत प्रतिक्रियेकरीता क्षमस्व)
च्यामारी भाव वाढले वाटत ...आमच्या वेळी १०० आणि ५०० असा भाव चालू होता ...
:)
चला तेवढेच समाधान , बर झाल लवकर उरकलं
हाहा... सगळ्या देवस्थानांची अशीच दुर्दशा झालीये...
अतल्या....तु स्वस्तात उरकुन घेतल रे...चतुर आहेस. :) :)
आप, सौरभ ...धन्यवाद.
swari jra ushir jhalay pan tari commentatey...
parking cha wachun aata trambakeshwar la gelo hoto tyachi aathwan jhali...khadda parking che paise dya ani dewalat kai...jaude.....tyannar Shirdi mhanaje tar kai bolayachich soy nahi....
mi khar sangu wel modun devstan la jawa ka ?? hach wichar karte.....
यो्गेश, अरे दरवर्षी हा अनुभव आम्हालाही येतो. अर्थात आम्ही आजपर्यंत त्याला कधीच बळी पडलो नाही. आम्ही सरळ पूजा नाही करायची म्हणून सांगतो. गेल्यावर्षीपासून तर आम्ही पुण्यातंच खंडॊबा मंदीर आहे तिथे जाऊन दर्शन घ्यायला लागलो आहोत.
श्रेया
माझा क्षणभर विश्वासच बसला नाही यावर. बाजाराचे देखील काही नियम असतात, ते देखील देवस्थानात पाळले जात नसतील तर त्याला काय म्हणायचं? भाविकांना "कस्टमर" समजलंत तरी हरकत नाही, पण मग "कस्टमर केअर" डिपार्टमेंट ठेवा. त्यांच्या कंप्लेंट कॉर्पोरेट पद्धतीने हाताळण्याचे कौशल्य मिळवा. हॉटेलात पाण्याबरोबर किंवा पाण्याआधी रेटकार्ड समोर ठेवले जाते. सर्विस इंडस्ट्री आज बदलत चालली आहे. सेवेचे मूल्य ठरवताना कंपनीच बंद पडणार नाही याची काळजी घेणं महत्त्वाचं आहे! आम्ही कोणालाही उत्तरदायी नाही, जबाबदार नाही अशी भूमिका कोणत्याही धंद्यात घेता येत नाही, धर्माच्याही नाही.
Post a Comment