गूढ मृत्यू...

आज सकाळी स्टार न्युज वर संजय गांधीच्या मृत्यू वरचा "वो १२ मिनीट" हा रिपोर्ट पाहिला. आज पर्यंत त्यांच्या मृत्यू बद्दल खूप सार्‍या कथा आहेत पण सत्य मात्र काय आहे याबाबत कोणा कडेच ठोस असा पुरावा नाही. प्रत्येक जन आप आपल्या सोयी नुसार सांगत असतो. एकदा हाफिसात असाच या विषयावर काथ्या कूट चालू होता तेव्हा एका मित्राच्या म्हणण्या नुसार हा अपघात इंदिरा गांधीनी स्वतः घडवून आणला होता. त्याला याबाबत विस्तृत स्पष्टीकरण मागीतल तेव्हा मात्र त्याचा पोपट झाला.(च्यामारी उचलली जीभ लावली टाळ्याला)त्याच्या म्हणण्यानुसार संजय गांधी हे डोईजड झाले होते म्हणून त्यांची हत्या करण्यात आली. मला मात्र तो निव्वळ फालतुपणा वाटला. कोणतीच आई अस वागू शकत नाही.

असाच एक लेख महाजालावर वाचण्यात आला....तो इथे वाचू शकता

याच प्रमाणे अशे खूप सारे गूढ मृत्यू आहेत की ज्यांची आज पर्यंत उकल झालीच नाही. असाच एक प्रसिद्ध गूढ मृत्यू असणारी व्यक्ती म्हणजे नेताजी सुभाषचंद्र बोस. नेताजींच्या मृत्यू बद्दल कथा सांगाव्या तेवढ्या कमीच आहेत. सरकारने पण नेहमीप्रमाणे समित्या स्थापन करून याची उकल करण्याचा प्रयत्न केला.

स्वातंत्र्यानंतर, भारत सरकारने ह्या घटनेची चौकशी करण्यासाठी, १९५६ (शाह नवाझ समिती)  मध्ये एका आयोगाची नियुक्ती केली. त्या वेळा हाच निष्कर्ष निघाला की नेताजी त्या विमान अपघातातच मृत झाले होते. परंतु ज्या तैवानच्या भूमिवर हा अपघात झाल्याची खबर होती, त्या तैवान देशाच्या सरकारशी तर ह्या  आयोगांनी संपर्कच साधला नव्हता.

१९९९ साली मनोज कुमार मुखर्जी ह्यांच्या नेतृत्वाखाली तिसरा आयोग नेमला गेला. २००५ साली तैवान सरकारने मुखर्जी आयोगाला असे कळवले की १९४५ साली तैवानच्या भूमिवर कोणतेही विमान अपघातग्रस्त झालेच नव्हते. २००५ मध्ये मुखर्जी आयोगाने भारत सरकारला आपला अहवाल सादर केला. आयोगाने आपल्या अहवालात असे म्हटले की नेताजींचा मृत्यू त्या विमान अपघातात घडल्याचा कोणताही पुरावा उपलब्ध नाही. परंतु भारत सरकारने मुखर्जी आयोगाचा हा अहवाल नामंजूर केला.

ऑगस्ट १८, १९४५ च्या दिवशी नेताजी कसे व कुठे बेपत्ता झाले तसेच त्यांचे पुढे नक्की काय झाले, हे भारताच्या इतिहासातील सर्वात मोठे अनुत्तरीत रहस्य बनले आहे.

लाल बहादूर शास्त्री यांच्या ताश्कंद येथील मृत्यू हे सुद्धा असच एक एक गूढ आहे. त्यांचा नैसर्गिक मृत्यू होता की हत्या याबाबत ही वेगवेगळे मत प्रवाह आहेत पण सत्य काही माहीत नाही.

तशी गूढ म्रुत्युंची परंपरा ही अगदी इतिहासापासून आहे. अश्वत्थामा (हा अजुन जिवंत आहे अन् त्याला पाहण्यात आलाय अस काही लोकांचा दावा आहे) असो किंवा संत तुकाराम महाराज असो किंवा शिवाजी महाराज प्रत्येक मृत्यू मागे एक गूढ अन् त्यामागे प्रत्येकाची स्वतःची अशी एक कथा पण सत्य काय ते आजतागायत कधीच समजू शकल नाही किंवा यावर समाधानकारक संशोधन पण दिसत नाही...(हे माझ वैयक्तिक मत आहे)

आता नजीकच्या काळात पण असेच गूढ मृत्यू झाले जसे की डायना, मायकेल जॅक्सन, परवीन बॉबी, दिव्या भारती त्याविषयी पण फक्त  नवीन कथाच आल्या पण सत्य नाही.

अस म्हणतात की सत्य कधी लपून राहत नाही मग इतक्या वर्षा नंतरही हे सगळे मृत्यू गूढ बनून का आहेत?? यातील सत्य कधी बाहेर येईल की नाही कोणीच सांगु शकत नाही.

15 comments:

अपर्णा said...

मला स्वतःला अशा गूढ गोष्टींची उकल करणारे कार्यक्रम फ़ारच आवडतात....य़ा पोस्टमध्ये बरचं कव्हर केलंस पण आणखी विस्तृत माहिती असेल तर एखादी गोष्ट संपुर्ण मांड..वाचायला आवडेल.

मीनल said...

हो ना.. बर्‍याच गूढ मॄत्यूंचे रहस्य तसेच आहे. कदाचित त्यांची चौकशी झाली असेल आणि त्यांना खरे माहितीही असेल पण आपल्यापर्यंत ते पोहोचू दिलेले नाही. नेताजी बोस, लाल बहादूर शास्त्री आणि बाकीही तू उल्लेख केलेले नेते, प्रसिध्द व्यक्ती काही लोकांच्या डोळ्यात खुपत असतीलच.

सुदीप मिर्ज़ा said...

Well...

Add Hitler and Manroe...

मनमौजी said...

अपर्णा...हे सगळे मृत्यू वादातीत आहेत. अन् यावर लिहणारे आप आपल्या सोईप्रमाणे लिहीत असतात त्यामुळे कोणावर विश्वास ठेवावा हा पण एक प्रश्नच आहे. पण एक आहे मला पण या सगळ्या विषयी खूप उत्सुकता आहे.

मनमौजी said...

मीनल...तू म्हणतेस त्याची पण शक्यता असु शकते सत्य आपल्या पर्यंत पोहचु दिल जात नसाव कारण त्या लोकांना माहीत आहे सामान्य जनता थोड्या या घटना विसरून जाते.यात त्यांचा स्वार्थ असु शकतो.

मनमौजी said...

सुदीप...
अशे खूप सारी लोक आहेत...लिहु तेवढ कमीच आहे..:)
बॉल्ग वर स्वागत आणि आभार.

THE PROPHET said...

गूढ मृत्यू हे जागतिक इतिहासात नेहमीच घडत आलेले आहेत...तू तुझ्या विचारांची साखळी छान मांडली आहेस!

हेरंब said...

छान लिहिलंस. या प्रत्येक गुढ मृत्यूत कोणाचा तरी फायदा झालेला आहे आणि हे मृत्यू घडवून आणणारी संबंधित व्यक्ती/समूह हे एवढे प्रबळ होते/आहेत की त्यामागचं सत्य कधीच आपल्यापर्यंत येणार नाही याची ते लोक काळजी घेतात.

अजून एक, कितीही अविश्वसनीय वाटत असलं तरीही संजय गांधींच्या मृत्यूच्या मागे इंदिरा गांधींचा हात होता ही शंका अनेक वेळा अनेक ठिकाणी बोलून दाखवली गेली आहे. मी याविषयी माझ्या आजीकडून बरेचदा ऐकलं होतं. पण अर्थात सत्य कधीच समोर येणार नाही आणि वर म्हटल्याप्रमाणे याला कारण म्हणजे त्यामागे असलेल्या प्रबळ व्यक्ती.. !!

मनमौजी said...

विभि...प्रतिक्रियेबद्दल आभार अन् ब्लॉग वर स्वागत!!!

मनमौजी said...

हेरंब...मी पण खुपदा हेच ऐकलय की संजय गांधींच्या मृत्यूच्या मागे इंदिरा गांधींचा हात होता ...पण याला सबळ असा पुरावा नाही...मी अगदी साधा विचार करतो..कोणती आई आपल्या मुलाला मारू शकते??? अगदी तो किती ही वाईट असला तरी???
असो...शेवटी ते पण एक गूढ आहे.

आनंद पत्रे said...

खरंय.. सत्य आपल्यापर्यंत येणे नाही

मनमौजी said...

आनंद...धन्यु..

Anonymous said...

योगेश,मस्तच झाला आहे लेख...
खरच या गुढ मृत्यूंमागच रहस्य कधी बाहेर येइल असे वाटत नाही...हेरंबने सांगीतलेल कारणही पटते..

मनमौजी said...

देवेंद्रा...हेरंब म्हणतो ते बरोबर आहे...कधी तरी सत्य समजेल अस आपण अपेक्षा तरी ठेवू...

Vaishnavi Sawant said...

I THINK, HE SAGLA MUDDAM LAPAVLA JAAT ASEL