संदीपची कविता....

संदीप खरे.....बस्स नाम ही काफ़ी है...

तशी संदीपची प्रत्येक कविता आवडते पण ही एक मला प्रचंड आवडणारी कविता.

आज मी आयुष्य माझे चाचपाया लागलो
नेमके ते हरवले जे मी जपाया लागलो...

शोधले माझेच पत्ते आत मी माझ्या किती
जग हरवलो तेव्हाच कोठे सापडाया लागलो...

ठरवले हे पाहीजे, ते पाहीजे , ते ही हवे
मागण्या ताज्या तवान्या मी थकाया लागलो...

मी सुखाला पाळले बांधून दारी माझीया
ते सुखाने झोपले मी गस्त द्याया जागलो...

गीत माझ्या लेखणीचे इतुके भिनले तिला
ती लिहाया बैसली अन मी सुचाया लागलो...

मज न आता थोडकी आशा कुणी की म्हणा
आज मी माझ्याच साठी गुणगुणाया लागलो...

काय हे आयुष्य माझे , काय हे जगणे तरी
मला सोडून मी सर्वा आवडाया लागलो...

-संदीप खरे.

14 comments:

हेरंब said...

मस्तच..

गीत माझ्या लेखणीचे इतुके भिनले तिला
ती लिहाया बैसली अन मी सुचाया लागलो...

आणि

काय हे आयुष्य माझे , काय हे जगणे तरी
मला सोडून मी सर्वा आवडाया लागलो...

ही दोन जास्तच आवडली !!

श्रिया (मोनिका रेगे) said...

खूपच छान आहे कविता!आवडली :)

aativas said...

वाचली नव्हती ही कविता आधी. छानच आहे.

भानस said...

मी ही वाचली नव्हती. बरे झाले तू पोस्टलीस. आवडली!

Yogesh said...

हेरंबा....ठांकु रे :)

Yogesh said...

श्रिया ताय...धन्यवाद..संदीपची प्रत्येक कविता अगदी जबरदस्त असते पण ही मला खुप आवडते.

Yogesh said...

सविता ताइ ठांकु....

Yogesh said...

श्री ताइ ठांकु...

Sagar Kokne said...

माझी हि अतिशय आवडती कविता...
मी तर खूप मोठा पंख आहे संदीपचा...

संदीप खरेंच्या इतर कविता इथे मिळतील...
http://sandeepkharekavitangaani.blogspot.com/

Yogesh said...

सागर ...धन्यवाद...

THEPROPHET said...

मस्तच रे...
मी फारशा वाचलेल्या नाहीत त्याच्या कविता... नेहमी फक्त ठरवत असतो! :)

Yogesh said...

विभि नक्की वाच रे...एक्दम सहीच लिहतो रे तो.

ranjitsingh [r.king] said...

lakhani maji tuchyawar nahi bhinali
tari shabdha tila awadat hote,
uchyar maja tila kalat navata
tari manat hoti tu boltos te srav khote



sweet kavita ahw re

विरेंद्र said...

mansparshi kavita