खरच आपला भारत गुणवत्तेची खाण आहे. भारतातल्या प्रत्येक काना कोपर्यात अस्सल गुणवान हिरे आहेत.खालील दोन विडीयो पाहा या अशा गुणवत्तेच्या जोरावर आपण उद्याच्या उज्ज्वल भविष्याच स्वप्न पाहिला काहीच हरकत नाही.
विनोद ठाकुर ...हा अवघा २१ वर्षाचा तरुण दोन्ही पायांनी अपंग...घरची परिस्थिती अत्यंत गरीबीची...याचे वडील चालक तर आइ गृहिणी आहे. धडधाकट तरुणाला लाजवेल असा याचा उत्साह. त्याच्या फ़क्त डोळ्यात पहा...किती स्वप्न आहेत...आपण अपंग आहोत या गोष्टीचा त्याने कुठेही सहानभुती मिळवण्यासाठी उपयोग केला नाही.त्याचा नाच बघताना तर विश्वासच बसत नाही.
खरच कोठुन आणत असेल हा एवढा उत्साह?? निराशेचा कुठेही मागमुस ना्ही......स्वतःच्या अस्तिवाची ही लढाइ तेवढ्याच धैर्याने चालु आहे.
आता हा खालचा दुसरा विडीयो पहा.ही सर्व मुलं एका वस्तीवरील आहे.यांनी भंगारातुन सगळी संगीत वाद्य बनवली आहेत.यातील बहुतेक मुल ही शाळेत जातच नाही अन कोणीही संगीताच शिक्षण घेतलेल नाही.
मला खर तर रियल्टी शो या प्रकाराचा खुप तिटकारा आहे पण हे पाहिल्यावर वाटत की या कार्यक्रमाद्वारे या अशा लोकांना आपली गुणवत्ता सिद्ध करण्यासाठी मंच मिळाला.
भारतात अशे कि्ती तरी लोक असतील की ज्यांच्याकडे अशीच गुणवत्ता असेल पण केवळ योग्य मार्ग न मिळाल्यामुळे कुठे तरी भरकटले असतील किंवा जगापुढे कधी येउ शकत नाही.
खर तर ही आपल्या सरकारची जबाबदारी आहे...अश्या गुणवान लोकांना शोधुन त्यांना उत्तम सुविधा व संधी देणं गरजेच आहे.पण अस काही विधायक काम केल तर ते सरकार कसल???
Widget by Css Reflex | TutZone
8 comments:
खरंच बरेचदा प्रश्न पडतो...ह्यांना इतकी प्रेरणा कुठून मिळते, की हेच लोकांसाठी प्रेरणास्थान बनण्याइतकी भरारी घेतात!
रिऍलिटी शोजला असं एकदम निकालात नाही काढता येणार... सारेगम (हिन्दी) मधुन अनेक उत्तम गायक/गायिका मिळाले आहेत...
इथं पर्यंत न पोचणारे सुद्धा कितीतरी अनाम प्रेरणादायी लोकं असतिलच...
बाप रे.. किती विलक्षण इच्छाशक्ती असेल या लोकांची !!!
विभि...अगदी खर आहे...ही लोक एवढी एनर्जी आणतातच कुठुन देव जाणो.
आप...बरोबर आहे...सा रे ग म प चांगला कार्यक्रम आहे...इतर शो मध्ये जिंकलेले फ़क्त तेवढ्यापुरते स्टार होते नंतर त्यांचे काय झाल???
>>इथं पर्यंत न पोचणारे सुद्धा कितीतरी अनाम प्रेरणादायी लोकं असतिलच...
अगदी बरोबर..
हेरंब..अगदी खर आहे खुप विलक्षण इच्छा शक्ती असते या लोकांची.
मला पण खर तर रीऍलिटी शोज चा तिटकारा येतो,पण असे कार्यक्रम पाहिले की चकितही होते...तुला सांगु का मनमौजी,मी ज्यांच्याकडुन स्केचिंग शिकते न..ते सुध्दा handicapp आहेत..दोन्ही हात त्यांचे लहानपणीच मशिन मधे येउन पुर्ण तुटले आहेत.......तरी ही निव्वळ इच्छा शक्तीच्या बळावर ते तोंडात पेंसील धरुन शिकवतात...त्यांच्या कडु शिकताना मस्त वाटते.....
पोस्ट खूपच छान झाली आहे. मुद्देसूद लिखाण आहे.
Post a Comment