खुपदा अस होत की एखाद्या माणसाच्या वागण्यावरून आपण त्याचा स्वभाव ठरवून टाकतो.म्हणजे बघा एखाद्याने पैसे खर्च करताना खूप विचार केला तर वाटत यार हा पक्का कंजुस आहे, कधी कोणी जास्त स्पष्ट बोलल तर तो फटकळ. अस खूप सार वर्गीकरण केलेल असत आपण.पण आपण कधी हा विचार करत नाही ह्या व्यक्तीचा स्वभाव असा का झाला असेल?? अशी कोणती परिस्थिती याने अनुभवली असेल की ज्यामुळे याचा स्वभाव असा झाला.माझ तर अस मत आहे की कोणतीही व्यक्ती ही त्याने अनुभवलेल्या परीस्थीतीतून घडत जाते.
आमच्या कंपनीत असाच एक आर्किटेक्ट मित्र आहे की जो कोणतीही गोष्ट करताना अगोदर पैश्याचा विचार करतो. मग तुम्ही ते भाजी खरेदी जा किंवा कोठे फिरायला जायचा प्लान करा.याला विचारायच म्हणजे याचा नेहमीचा प्रश्न किती पैसे लागतील??अन् मग त्यावरून त्याचा निर्णय होनार. कधी कधी हे आम्हाला सगळ्याना खूप त्रासदायक वाटत. त्यामुळे कसलाही प्लान असला की त्याला कोण विचारणार अन् मग त्याला त्यासाठी तयार कोण करणार हा सगळ्यात गहन प्रश्न!! कारण ग्रूप मध्ये एकट्याला सोडून जाणं. पण बुद्धीला पटत नाही. तसा त्याला पगारपाणी पण चागला.राहणीमान पण टापटीप.अस सार असताना हा असा का वागतो याच कोड आम्हाला सगळ्याना असायच.
काल रात्री कार्यालायातच आमचा गप्पाचा फड जमला होता. आमच्या ह्या मित्राचा प्रेम विवाह त्यामुळे आम्ही त्याला त्याची प्रेम कहाणी विचारली.कुठे भेटलास, कोणी प्रपोज केल ई. नेहमीचे साचेबद्ध प्रश्न. हे सांगताना त्याने त्याच्या आयुष्याची कहाणीच आमच्या पुढे ठेवली.अन् ते ऐकून आम्ही सारे स्तब्ध झालो.
माझा हा मित्र अन् त्याचा भाउ हा एवढाच याचा परीवार. याची आई लहानपणीच वारली. अन् हा 12वीला असताना याचे वडील वारले. अश्या या अनाथ भावाडांना त्याच्या दूरच्या मामाने आसरा दिला. दोघांमध्ये हा थोरला असल्याने आता लहान भाउ, स्वतःच शिक्षण, भावाच शिक्षण अशी दुहेरी जबाबदारी याच्यावर आली.
याने पार्ट टाइम जॉब करत बी.आर्क पूर्ण केल तर भावाला कॉम्प्यूटर इंजिनीअर केल. हे सार करताना परीस्थीतीने आयुष्याच्या प्रत्येक वळणावर त्याची परीक्षा घेतली. ह्या जगात आई बापाच छ्त्र हरवाल्यानंतर जगणं किती कठीण असत हेच त्याने अनुभवल.
त्याच्या महाविद्यालयीन मैत्रीणी बरोबरच याने लग्न केल. हा महाराष्ट्रीयन तर ती उत्तर प्रदेशची.त्यावेळी लग्न करायाच म्हणजे सगळ्यात मोठा प्रश्न होता बोलणी करणार कोण?? हा तर सगळ्यात मोठा अन् भाउ तर तेव्हा शिकत होता.जवळच अस कोणीच नाही.
शेवटी मनाच धाडस करून हा अन् याचा लहान भाउ अशे दोघेच जण लखनौला तिच्या घरी गेले. तोपर्यात तिने सुद्धा घरी या सगळ्याची पूर्व कल्पना दिली होती. नशीबाने , याला पाहिल्यानंतर तिच्या घरून काहीच विरोध झाला नाही. यानंतर लग्नाच्या गोष्टी ठरवण्यासाठी मोठ कोणी तरी असाव म्हणून तो याच्या दूरच्या त्या मामाला घेऊन आला अन् मग याच लग्न झाल.
नुकताच त्याने अन् त्याच्या भावाने मिळून पुण्यात फ्लॅट घेतलाय. 3-4 महिन्यापुर्वीच त्याला मुलगा झालाय.त्याच घर चालत ते फक्त पगारावर.
हे सार ऐकल्यावर मला तरी वाटल की अरे यार जर एवढ्या जबाबदारीच्या ओझ्याखाली माणूस असेल तर तो जे काही वागतो ते माझ्या मते तरी योग्यच आहे. प्रत्येक वेळी जर खर्च करताना तो पैश्याचा विचार करत असेल तर त्यात गैर अस काहीच नाही.कारण शेवटी त्याला शून्यातून विश्व निर्माण करायाच आहे अन् ते ही कोणाच्याही आधाराशिवाय!!!
आज ही जेव्हा जेव्हा मला खूप बोअर होत किवा खूप टेन्शन येत तेव्हा मी माझ्या बाबांशी बोलतो.त्यांच्याशी बोलल की खूप बर वाटत. आई बाबा आहेत ही भावना जे सुख देते, ते सुख तुम्हाला कुठेच मिळू शकत नाही.
मी स्वतः माझ्या आई बाबं शिवाय?? . . .याची कल्पना सुद्धा करवत नाही. आपल्याकडे काही नसल तरी चालेल पण आई वडीलाच छत्र हे आपल्या डोक्यावर असायलाच हव!!!
Widget by Css Reflex | TutZone
8 comments:
त्याची कहाणी ए॑कुन वाईट वाटल आणि कौतुक ही. आई बाप नसताना एवढं सार एकट्याच्या जीवावर करण आज तरी अशक्य आहे. खरंच मानल्या तुझ्या मित्राला. मी सुद्धा अशाच एका व्यक्तीला ओळखतो जो आई वडीलाचं छत्र नसताना मोठा झाला. अशा कहाण्या ए॑कल्या की वाटत आपण खुप सुखी आयुष्य जगतोय, नाही का ?
@ Ajay Kharach yaar we R so lucky!!!
Thanks!!
’माझ तर अस मत आहे की कोणतीही व्यक्ती ही त्याने अनुभवलेल्या परीस्थीतीतून घडत जाते.’
हे मात्र अगदि खरं आहे. मनुष्याला परिस्थितीच घडवत असते.
सध्याच्या तुझ्या मित्राचे बाबतीत अजून तर त्याच्या जबाबदाऱ्याही पुर्णत्वास गेलेल्या नाहीत. मात्र असली धीराची व ठाम स्वभावाची माणसेच यशस्वी होतात
काका, तुम्ही प्रतिक्रिया दिलीत खूप आनंद झाला!! आपले स्वागत!! असेच भेटत जा!!
आपला,
मनमौजी!!
अगदी चटका लावून जाणारी पोस्ट. पण तेवढीच नवी उमेद देणारीही.
Hi,
Really a nice post...
Manala chatka lavun geli yaar...
अगदी बरोबर यार...आपण उगाच वरवर जे दिसतं त्यावरून सरळ त्या व्यक्तीबद्द्ल काही अंदाज लावतो जे खूप वेळा चुकीचे असतात...हा अनुभव भिडला ...
@ पंकज, भूषण, अपर्णा आभार!!!
Post a Comment