पांगिरा- विश्वास पाटीलकालच विश्वास पाटील यांची "पांगिरा" कांदबरी वाचून झाली. पांगिरा अन् डोंगरवाडी या दोन गावांची ही कहाणी.
यात पांगिरा गाव हे नायक अन् त्याभोवतीच सारी कांदबरी फिरते.

पांगिरा दुसर तिसर काही नसून ही काळ्या मातीची कर्मकथा आहे.निसर्गाच वरदान लाभलेल पांगिरा हे गाव.
मुबलक पाणी, कसदार काळीभोर जमीन. सगळी बागायती.फक्त उसाची भक्कम शेती करणार हे गाव. उसाच्या शेती बरोबरच गावाची श्रीमंती वाढली, माडीची घर, गाड्या,ट्रक्टर, हॉटेल हे सार काही आल. तालुक्यात गावाची पत वाढली.आतापांगिरा हे महत्वाच सत्ता केंद्र झाल.

गावाने कात टाकायला सुरूवात केली. नवनवीन याओजणा अं सुख सुविधा गावात यायला लागल्या. गावात वीज आली तास उसाची शेती वाढली, अमाप पाणी उपसा होऊ लागला.नंतर दूध डेअरी आली.

आता हा गावगाडा चालवायचा म्हणजे गावाचा कारभारी आलाच अन् जिथे सत्ताधारी आले तिथे विरोधक आलेच.
मग सुरू होतो सत्तेचा खेळ. राजकारणाच्या पटलावर आपल वर्चस्व सिद्ध करण्याचा एक खेळ. मग त्यात वाटेल ते करण्याची तयारी.

या गावातील प्रत्येकाला एक धुंधी आहे अन् त्यातच ते सारे जण जगत आहेत. "सार्‍या जगाला दुष्काळ पण पांगिरा सुकाळ" असा यांचा भ्रम. याटक पाण्याचा अमाप उपसा, वृक्षतोड, हे सार काही चालू आहे. सिदुबा अन् यमाई या दोन देवांच्या श्रद्धेवर हा गाव चालतो.त्याला कोंबड कापल की सगळे गुन्हे माफ. या अश्या वागण्यातच त्यांचा उद्याचा विनाश आहे अस कोणी सांगितल तर त्याला हे वेड ठरवणार.

तर असा हा गाव आता पुढे काय होत हे वाचण्यात मजा आहे.विश्वास पाटील यांनी सध्याच वास्तव लिहल आहे. पारंपारीक खेड अन् आधुनिक सुधारणावादी खेड यातील स्थित्यंतर अचूक लिहल आहे.

नव्या व्यवस्थेते जिल्हा परीषद, पंचायत समीती आल्या.बलुतेदारी गेली, जाती व्यवस्था निकालात निघाली, कूळ कायदे गेले. पंचाच्या साक्षीने चालणारा गाव गाडा ढासळला. पाटील,कुलकर्णी गेले अन् तलाठी, ग्रामसेवक अशे नवे बलुते आले. आमदारकी, जिल्हा परीषद, ग्राम पंचायत अश्या प्रत्येक ठिकाणी राजकारणाचा पट खेळला जाउ लागला. अन् त्यातून सुरू झाला एक आपल्याच विनाशाचा खेळ.

हे सार या पुस्तकात आहे. एका सर्व संपन्न गावाकडून दुष्काळी गाव अश्या या स्थित्यंतराच वर्णन यात आहे. विश्वास पाटील यांनी उभा केलेला "पांगिरा" हा सामाजिक भान हरवलेल्या सध्याच्या खेड्याच प्रतिनिधीत्व करतो.

या कादंबरीतील मुरार पाटील ही व्यक्तीरेखा मला खूप भावली. करारी पण तितकाच हळवा. जिद्दीवर आपल्या मुलाला वकील करणारा.परंपरेबरोबरच आधुनिकतेची कास धरणारा. मुरार पाटील अन् त्याची बायको राधाई ह्या दोघांमधील प्रसंग खूप भाव स्पर्शी आहेत.विश्वास पाटील यांच्या लेखणी ने अत्यंत ताकतीने ते आपल्यासमोर उभे केले आहेत.

एकदा तरी जरूर वाचावी अशी ही कांदबरी आहे.

उद्ध्वस्त खेडी, वैराण राणे
पाण्याचा गैर वापर, दुष्काळाचे गाणे
टपोर्या कणसारखी मातीतली माणसे
आधुनिकीकरण, सहकार अन् लोकशाहीचा फेरा
गावाच्या काळ्या - पांगिरा एका तपाचे तीन तेरा
हाच पांगिराचा लोकविलक्षण पसारा!!!

7 comments:

अभिजीत said...

खूपच मस्त कादंबरी आहे ही. विश्वास पाटील यांची इतर पुस्तके सुद्धा वाचनीय आहेत !

Ajay Sonawane said...

धन्यवाद बरं का, पुस्तक आता नक्कीच वाचेन.

-अजय

Yogesh said...

@ Abhijit Thanks!!!

Yogesh said...

Ajay. .nakkee vaach khup chhan aahe.

Harshal said...

Tumhala mahiti ahe ki nahi mahit nahi pan ya kadambarivar rajeev patil ("jogva" fame) chitrpat kadhat ahet.google var search karun bagha. chhan post lihili ahe ! good !!

Yogesh said...

@ हर्षल हे माहीत नव्हत मला. गुगल बाबा वर शोधतो आता. प्रतिक्रियेबद्दल आभार!!!

Anonymous said...

होय चित्रपट येतोय. भारी स्टारकास्ट आहे!
:)