कांदे पोहे



आता तुम्हाला प्रश्न पडला असेल कांदे पोहे म्हणजे आता लग्न या विषयावर कही लिहनार आहे की काय

पण खर सांगू का मी कांदे पोहे ह्या खाद्य पदार्थावर अगदी मनापासून फ़िदा आहे , कधी कधी वाटत कांदे पोहे हे खर तर राष्ट्रीय खाद्य असायला हव।

लहान असताना आई जेव्हाकांदे पोहे करायची तेव्हा तो दिवस म्हणजे आमच्यासाठी अगदी भाग्याचा असायचा.इतर दिवशी दूध बिस्किट नाही तर उपीटअसा कही तरी बेत असायचा.गरमा गरम पोहे अन त्यावर किसलेले खोबर अन लिम्बू क्या बात है????

असे पोहे खातानाचा आनंद हा अवर्णनीय आहे.जेव्हा इंजीनियरिंग ला होतो तेव्हा ४ वर्षात दिवसाची सुरुवात हो फ़क्त पोहे अन चहा अशीच व्ह्यायाची तय मध्ये कधीही बदल झाला नाही.एक कॉलेजला दांडी पण सकाळी पोहे खाणार नाही हे केवल अशक्यच

आमच्या कोलेजेवर शिवा भाऊ ची टपरी होती आमचे कित्येक उन्हाले अन पावसले तिथे पोहे खान्यात गेले ( त्याचा इतिहास नंतर लिहीनच) ते दिवस आज देखिल खुप मिस करतो.

पुण्यात आल्यानंतरही चांगले पोहे कुठे मिळतात याचाच शोध अगोदर घेतला होता.खाली काही अड्डे सांगतोय की जिथे खुप छान पोहे मिळतात।

१.बिपिन - सह्याद्री हॉस्पिटल जवळ असलेली टपरी।

२.आनंद उडुपी - शनिवार वाडयाजवळ ,कसबा पेठ

३.गौरी शंकर-अलका चौक

४.तिलक-तिलक रोड

५.रामनाथ - बालाजी नगर

तसे खुप आहेत पण आता मला जेवढे लक्षात येत आहेत ते लिहतोय.या पैकी बिपिन चे पोहे टेस्ट केलेच पाहिजे.तिथे मिलनारे पोहे निव्वल अप्रतिम आहेत।

तस् पहिल तर कांदा पोहे म्हणजे यंदा कर्तव्य आहे !!!!!!! या च परवलीचा शब्द.जेव्हा मुलगी पाह्यला जातात तेव्हा कांदे पोहे हा मेनू करायचा हा रिवाज ज्यानी कोणी केला खरच ग्रेट म्हणायला हव.हो की नाही???






0 comments: