फेरीवाला अन एक अपघात

शनिवारी नेहमीप्रमाने मी गावी निघालो होतो.दुपारी ३.०० ची बस होती.खुप उन्ह होत तेव्हा विण्डो सीट हावी होती पण नेहमीप्रमाने पोपट झाला.गाड़ी सुटायला तसा अवकाश होता पण गर्दी खुप होती.प्रत्येकजन आपल्या विचारात गुंग होते तेवढ्यात नेहमीप्रमाने शेंगादानेवाला आपल्या प्रसिद्ध आवाजात ओरडत निघाला गाडीत त्याने संपूर्ण फेरी मारली पण सगले जन इतके विचारात गुंग होते की त्याच्या कड़े कोणीच लक्ष दिले नाही त्याने तो खुप नाराज झाला शेवटी तो अचानकच खुप मोठ्याने ओरडला अरे शेंगादाने घ्या। । । । त्याक्षणी सर्वांच लक्ष त्याच्याकडे गेले.मला त्याच हे वागन खुप अनापेक्षित अस होत मला,मी त्याला काही विचारणार त्या अगोदरच तो म्हणाला मी अगदी शांतपणे गेलो तर कोणीच लक्ष दिले नाही अन मी मोठ्याने ओरडलो तर सगले लक्ष द्यायला लागले.त्या बरोबर सर्वजन हसले,अन तो पण आता खुष झाला कारन क्षणभर तरी त्याने सर्वाना हसवल होत.त्या नंतर प्रत्येक जन आपल्या विचारात गुंग झाले,पण काही केल्या माझ्या मनातून तो शेंगादाने वाला जात नव्हता मी नकळत त्याचा विचार करत होतो.त्याच्या आयुष्यात तस् पाहिल तर दुख असेल पण तरी ही तो किती आनंदी होता अन सर्वांच्या आयुष्यात आनंदाची उधलन करत होता.तस् पहिल तर किती छोटा प्रसंग होता पण खुप काही शिकवून गेला.पण यातून माला एक जाणवल आपण खरचइतके भावनाशुन्य खालो आहोत का की आपल्याला जेव्हा कोणीतरी खुप ओरडा करतो तेव्हाच आपण लक्ष देतो.रोजच्या जीवनात किती तरी गोष्टी असतील की ज्याआपण दुर्लक्ष करतो.असाच मी विचार करत होतो तेवढ्यात अचानक गाड़ी थांबली बाहेर पहिल तर खुप भयानक अपघात झाला होता,रस्त्यावर रक्तचा सडा होता,जीप आणि बसची टक्कर झाली होती,जीप मधील सर्व प्रवासी मरण पावले होते तर बस मधील काही जन जख्मी जाले होते.आमची बस जरावेल तिथे थांबली अन तशीच पुढे निघाली, आम्ही काहीच करू शकत नव्हतो,चालकाने शक्य ती मदत केलि अन तो निघाला .आता मात्र मी त्या मरण पावलेल्या लोकांचा विचार करू लागलो,कोण असतील ,त्यातील कोणावर तरी समपूर्ण घराची जबाबदारी असेल त्याच्या मागे आता त्याच्यावर अवलंबून असणार्या लोकांच काय??? खुप सारे प्रश्न मनात होते तसाच विचार करत माझ गाव कधी आल ते समजलाच नाही।
मी तसाच घरी निघालो एव्हाना संध्याकाळ झाली होती,माझ्या डोळ्यासमोरून तो अपघात काही जात नव्हता.मी जेव्हा माझ्या घ्रराजवल पोहचलो तेव्हा माझे बाबा माझी वाट बघत बाहेर ओट्यावर बसले होते,त्यांच्याकडे पाहिले तर ते मला पाहून खुप खुश झाले होते अन त्या वेळीच मला विचार आला तो त्या अपघातात मरण पावलेल्या लोकांच्या घरचा ते पणआपल्या प्रियाजनाची अशीच वाट बघत असतील पण ?????????????????????
आता नकळत मला आतून खुप दुख अन अस्वस्थ झाल होत कारन त्या लोकांच्या दुखची मी कल्पना देखिल करू शकत नव्हतो.मन अगदी सुन्न झाल होत।
एक शेंगादानेवाला अन एक अपघात किती विरोधाभास असणारे प्रसंग मी अनुभवले होते पण शेवटी याला जीवन ऐसे नाव.ते चालूच असणार .

0 comments: