असा "आदर्श" घेतील का???

लालबहादुर शास्त्री...आपल्या देशाचे माजी पंतप्रधान...एक अशी व्यक्ती की जिने बोलण्यापेक्षाही आपल्या वागण्यातुनच एक आदर्श निर्माण केला.ही घटना आहे ते पंतप्रधान असतानाची....ते जेव्हा पंतप्रधान पदावर कार्यरत होते तेव्हा त्यांच्या वापरासाठी "इम्पाला" ही  कार  सरकारने देउ केली होती.

त्यांच्या मुलाला या कारविषयी प्रचंड आकर्षण होतं. एके दिवशी त्याने शास्त्रीजींच्या नकळत चालकाला सांगुन कार काढली व त्यातुन एक मस्त रपेट मारुन आला.शास्त्रीजींच्या  दररोजच्या प्रवासाची नोंद ठेवली जायची.त्यामुळे त्यांच्या लक्षात ही गोष्ट आली.त्यांनी त्यांच्या सचिवाला सांगुन मुलाने चालवलेल्या १४ कि.मी.ची वेगळी नोंद करुन ठेवायला सांगितली.महिन्याच्या शेवटी त्यांनी त्या १४ कि.मी.च्या इंधनाचा खर्च त्यांनी स्वतः दिला.

हे वाचल्यावर आज प्रश्न पडतो.....शा्स्त्रीजी पंतप्रधान असलेला देश नक्की हाच का???

आजच्या घडीला असा नेता शोधुनही सापडणार नाही.आम्ही इतिहासाकडे नक्की कोणत्या दृष्टीकोनातुन पाहतो?? त्यातुन शिकण्याऐवजी फ़क्त आपल्या स्वार्थासाठी आपल्या सोयीने त्याचा वापर करत राहणार आहोत का?? अस असेल तर "आदर्श" सारखे अनेक आदर्श उभे राहतील.

"साधी राहणी उच्च विचारसरणी" हे फ़क्त पुस्तकातच वाचायच अन प्रत्यक्षात मात्र "उच्च राहणी साधी विचारसरणी" अस वागायच.

हे बदलेल का कधी???

शास्त्रीजींसारखं नेतृत्व आम्हाला लाभेल का कधी???

20 comments:

Anonymous said...

योगेश, हे आदर्श ईतिहासात जमा केलेत आजकालच्या राज्यकर्त्यांनी.... आणि सामान्य लोक हळहळणे सोडुन बाकि काही करत नाहीत...

हे चित्र जोवर बदलत नाही तोवर कठीण आहे परिस्थिती...

आनंद पत्रे said...

सध्या तरी अशक्य वाटतेय :( :(

Anagha said...

योगेश, म्हणतात ना...तुमची जी योग्यता आहे तेच तुम्हांला मिळते. आणि आपली योग्यता आपणच ठरवत असतो. मग आपण आपली योग्यता बदलल्याशिवाय आपल्याला पुन्हां लालबहादूर शास्त्रींसारखे पुढारी कसे काय मिळणार? आणि आपली योग्यता बदलण्याचे काम आपण नाही तर दुसरे कोण करणार?
मला तुझा हा लेख आवडला....विचार करायला लावणारा...
आपल्या देशाच्या सध्याच्या परिस्थितीच्या जबाबदारीबद्दलची सर्व बोटे आपल्याकडेच वळत आहेत...

भानस said...

शिवाजी जन्माला यावा परंतु दुसर्‍याच्या घरी, ही मनोधारणा आहे आपली-आपल्या समाजाची. पायापुरते पाहण्याची सवय जन्मजात जडलेली. ती बदलली तर पुढे राज्य, देश हे विचार सुचतील...

खरेच असे आदर्श व्यक्तिमत्व इतिहासातच राहीले. आचरणात आणण्याचा विचार एकाही राज्यकर्त्याच्या मनाला शिवला नाही. वाईट वाटते.

श्रिया (मोनिका रेगे) said...

अनघा आणि भानस ह्यांची मते अगदी बरोबर आहे. मला असेच वाटते आपण आपला देश देशातले लोक किती बदलले.
सच्चाई,सचोटी,देशाभिमान ह्या गोष्टी परत एकदा खऱ्या अर्थाने मनामनात रुजल्या पाहिजेत.पुढच्या पिढ्या सर्वांसमोर आदर्श ठरू शकतील असे काही घडवले पाहिजे सर्वांनी मिळून केला पाहिजे हा प्रयत्न.शास्त्रीजी एक आदर्श व्यक्तिमत्व होते.तसेच अनेक राजकीय नेते होऊन गेले जे खऱ्या अर्थाने 'नेते' होते.ह्यांना घडवणारे ह्यांचे आई वडील,आणि त्या काळचा भारत.समृद्ध देश हा ह्यातल्या लोकांमुळे बनतो.आपला भारत पण बनू शकतो ह्यावर विश्वास हवा आणि प्रयत्न हवेत.शास्त्रीजी सच्चे होते,देशावर त्यांचे प्रेम होते, तसे खऱ्या अर्थाने देशावर प्रेम नवीन पिढीत निर्माण होणे गरजेचे आहे.हे काम आई वडील आणि गुरुजन करू शकतील.ह्याला संस्कार म्हणतात.स्वार्थ त्याग करणे खूप कठीण आहे हे जरी खरे असले तरी कुठेतरी सुरवात जर होऊ शकली तरी हळू हळू फरक नक्कीच पडेल.

खऱ्या अर्थाने'मेरा भारत महान!' म्हणताना मग अभिमानाने मान उंच होईल!

Yogesh said...

तन्वी ताइ...नितीमत्ताच इतिहासजमा झाली आहे..

Yogesh said...

आप...सध्या खरच खुप अवघड आहे... :(

Yogesh said...

अनघा ताइ...अगदी बरोबर आहे...प्रतिनिधी निवडुन देणारे आपणच आहोत त्यामुळे आपली जबाबदारी जास्त आहे पण आपल्या समाज मेंदुपेक्षा हृदयाने जास्त चालतो ही मुख्य अडचण आहे.

Yogesh said...

श्री ताइ...आजु बाजुची परिस्थिती पाहिली खुप वाईट वाटत...पण आपण आपल्यापासुन तरी हे बदलवण्यासाठी सुरुवात करायला हवी अस मनापासुन वाटतय.

Yogesh said...

श्रिया ताइ....अगदी सहमत..

सौरभ said...

:) असं नेतृत्व नक्कीच मिळेल... मला निवडुन दिलं तर... :D

btw nice post...

THEPROPHET said...

आपण सध्या 'आदर्श' ची व्याख्या बदलण्यात बिझी आहोत! :(

Suhas Diwakar Zele said...

आदर्श ह्या शब्दाचे अर्थ आपल्यातीलच काही राजकारण्यांनी आदर्शपणे बदलेला आहे रे... :(
शास्त्रीजी सारखा माणूस निराळाच रे...

Anuja Khaire said...

योगेश दादा किती सुंदर लिहिलं आहेस! Thought provoking post! I hope this provokes thoughts of thoughtless politicians in our country…

हेरंब said...

>> हे वाचल्यावर आज प्रश्न पडतो.....शा्स्त्रीजी पंतप्रधान असलेला देश नक्की हाच का???

अनघा म्हणते त्याप्रमाणे आपल्यालाच आपल्यामध्ये बदल करायला लागणार आहे.

Yogesh said...

सौरभ....चालेल...तु नेता बनण्याची तयारी सुरु तर कर :) :)

Yogesh said...

विभि...अगदी बरोबर आहे.

Yogesh said...

सुहास...अनघा ताइ म्हणते त्या प्रमाणे आपणच आता हे बदलायला हव नाही तर भविष्य खुप कठीण आहे.

Yogesh said...

>>योगेश दादा ...

दादा नको...फ़क्त योगेश चालेल.. :) :)

प्रतिक्रियेबद्दल आभार

Yogesh said...

हेरंब ..अगदी सहमत..