आजच्या कलीयुगात जिथे पैसा म्हणजे सर्वस्व झाल आहे तिथे पैशाहुन ही माणुसकी मोठी असते याचा प्रत्यय आपल्या कृतीतुन देणारे हे उद्योगपती आहेत झवेरे पुनावाला.त्यांच्याकडील गंगादत्त या ड्रायव्हरचे नुकतेच निधन झाले.त्याचे निधन झाले तेव्हा पुनावाला मुंबईला महत्वाच्या कामासाठी गेले होते.गंगादत्त यांच्या निधनाची बातमी कळताच त्यांनी आपल्या सर्व मिटींग रद्द केल्या.त्याच बरोबर मी येइपर्यंत गंगादत्त यांचे अत्यंसंस्कार करु नये अशी विनंती गंगादत्तच्या कुटुंबयींना करण्याचा निरोपही दिला.त्यांना अत्यंसंस्कारांसाठी उपस्थित राहयचे होते.त्यांनंतर त्यांनी खाजगी हेलिकॉप्टरने पुण्याकडे धाव घेतली.
पुण्यात आल्यानंतर त्यांनी गंगादत्त जी लिमोझीन चालवायचा ती फ़ुलांनी सजविण्यास सांगितली.ती लिमोझीन पुनावाला यांनी विकत घेतल्यापासुन गंगादत्त यांनीच चालवली होती.त्यामुळे गंगादत्त याची अंत्यंयात्रा याच गाडीतुन व्हावी ही पुनवाला यांची इच्छा होती.गंगादत्त यांच्या कुटुंबीयांनी याला मान्यता दिल्यानंतर पुनावाला या अत्यंयात्रेत सहभागी झाले.
ज्याने आपल्यासाठी आयुष्यभर गाडी चालविली त्याच्या शेवटच्या प्रवासामध्ये आपण गाडी चालवुन आदरांजली वाहिली पाहिजे या भावनेतुन त्यांनी गंगादत्त यांच्या घरापासुन स्मशानभुमीपर्यंत गाडी चालवली.
यावर झवेरे पुनावाला यांची प्रतिक्रिया होती.... "पैसे तर सगळेच कमवितात पण ते कमविताना ज्यांच्या जोरावर आपण ते कमवितो त्यांच्याविषयी आपण कृतज्ञता बाळगणे आवश्यक असते."
काल ही बातमी पुणे म.टा.मध्ये आली होती...आजच्या जगात जिकडे तिकडे स्वार्थ,भ्रष्टाचार,गुन्हेगारी माजलेली असताना मिट्ट काळोखात मिणमिणता प्रकाश दिसावा..असाच हा प्रसंग आहे...
Widget by Css Reflex | TutZone
29 comments:
अतिशय सुरेख..
आणि लेखाचं शिर्षकही एकदम छान...
हे असं काही कुठे माणुसकी दिसणारं वाचलं कि खूप बरं वाटतं... आभार ही पोस्ट लिहिल्याबद्दल. :)
khup manala bhavun gelay. He is one of Roll models we should look at ...!!
Hats off to poonawala!
आज जे आपल्या महाराष्ट्रात चालू आहे त्यात हा प्रसंग मनाला चटका लावून गेला बघ... बाकी काय लिहु.
हॅट्स ऑफ...
योगेश मन:पुर्वक आभार रे ही पोस्ट लिहील्याबद्दल...
हे असे लहानमोठे माणूसकीचे झरे जगण्याची संजिवनी देतात पुन्हा... पुनावाला यांचे खूप कौतूक वाटले...
पोस्टचे नाव अत्यंत समर्पक दिलेस....
कमाल. खरंच कमाल.
हि पोस्ट लिहिल्याबद्दल धन्यवाद
अन शीर्षक अगदी समर्पक
खरंच काय ग्रेट माणूस आहे हा !!
योमुं, ही पोस्ट टाकल्याबद्दल विशेष आभार !!
Phaar chaan
एक वेगळ वागण आहे खर पूनावाला यांच!
आप...धन्यवाद...
अनघा ताइ..खर आहे अशी माणुसकी पाहिल की बर वाटत..
राजीव...ब्लॉगवर आपल स्वागत अन आभार...
महेंद्र काका ...धन्यवाद...
सुझे...हे वाळवंटातील ओअॅसिस सारख आहे
तन्वी ताइ..अगदी बरोबर म्हणते आहेस..प्रतिक्रियेबद्दल आभार.
सौरभदा...हाभार्स रे..
सागरा...ठांकु रे...
हेरंब खरच खुप ग्रेट आहे....अशी माणस खुप कमी वेळा पाहयला मिळतात.
अमरेश...ब्लॉगवर आपल स्वागत अन आभार..
सविता ताइ...माणुसपण जपणारा माणुस एवढच म्हणीन मी...
माणुसकी अजून शिल्लक आहे !
Touching...
समर्पक शिर्षक! अशी माणसे आजही ज्या समाजात आहेत तिथे खरेच मिणमिणता प्रकाश जिवंत आहे.
योमू, पोस्टबद्दल धन्यू रे.
किरण...ब्लॉगवर स्वागत अन आभार...
सिद्ध...धन्यवाद...
श्री ताइ...ठांकु...ठांकु...
पोस्ट फारच भावली मनाला! अशी माणसं आहेत म्हणून अजून जग चालू आहे! :)
Post a Comment