मोदींचा गुजरात...

साधारण एक तीन वर्षापुर्वी कंपनीच्या कामानिमित्त अहमदाबादला राहण्याचा योग आला होता.तेव्हा नरेंद्र मोदी यांच्याविषयी प्रसारमाध्यमातुन दोन प्रकारच्या प्रतिमा रंगवल्या जात होत्या काहींना ते "मसीहा" वाटत होते तर काहींना ते "खलनायक" वाटत होते.त्यामुळे नरेंद्र मोदी ह्या रसायनाविषयी मनात कमालीची उत्सुकता होती.अहमदाबादला विमानतळावर उतरलो तेव्हा हॉटेलवर घेउन जाणार्‍या चालकाला सहज मोदींविषयी विचारलं....

"अरे भैय्या, आपके ए नरेंद्र मोदीजी कैसे इन्सान है?? आपको क्या लगता है??"

यावर त्याच उत्तर होत..

"साब, थोडे दिन में गुजरात के घर घर में मोदीजी तस्बीर होगी.बडा सच्चा इन्सान है।"

एका सामान्य माणसाच्या नजरेतुन ही मोदींची प्रतिमा होती. नुकतच "वायब्रंट गुजरात" झाल त्यातुन गुजरात मध्ये येणारे उद्योजक सर्व उद्योजकांनी मोदींबद्दल काढ्लेले गौरवोद्गार....हे सगळ पाहिल्यावर मला त्या चालकाची आठवण आली त्यावेळी त्याने काढलेले उद्गार नक्कीच खरे झाले आहेत.अभिमान वाटावा अशीच कामिगिरी नरेंद्र मोदींनी करुन दाखवली आहे.तुमच्याकडे इच्छाशक्ती असेल तर तुम्ही काय करु शकता हेच मोदींनी दाखवुन दिल आहे.

विरोधक आज मोदींच्या नावाने कितीही कंठशोष करीत असले तरी सत्य परिस्थिती लपुन राहत नाही.आज मोदींवर सामान्य नागरिकापासुन ते मोठ्यातल्या मोठ्या उद्योगपती पर्यंत प्रत्येकाचाच मोदींवर विश्वास आहे.याच सर्वात उत्तम उदाहरण म्हणजे मोदींच्या फ़क्त एका एस.एम.एस.वर नॅनो प्रकल्प गुजरातमध्ये आला.

हा विश्वास एका रात्रीतुन आलेला नाही त्यामागे मोदींची विकासाची दुरदृष्टी, त्यांनी घेतलेले कष्ट. त्यांचे विकासासाठी केलेले नियोजन,कुशल नेतृत्व हे सार काही आहे.राज्यामधील मुलभुत गरजांवर केलेला विकास.

मोदी सत्तेवर आल्यानंतर प्रथम त्यांनी "ज्योतीग्राम" योजनेच्या माध्यमातुन संपुर्ण राज्य भारनियमन मुक्त केल.गुजरातमधील वीजचोरी रोखली.सामान्य शेतकर्‍यापर्यंत पोहचले त्यांचे मुद्दे पटवुन दिले अन महत्वाच म्हणजे सर्वांना ते पटल त्याचचं फ़ळ त्यांना मतपेटीतुन मिळाल.

त्यानंतर सरदार सरोवराच्या माध्यमातुन पाण्याचा प्रश्न सोडवला. सरदार सरोवराच्या विरोधात असणार्‍या पर्यावरणवाद्यांना ते पुरुन उरले.नर्मदेच्या पाण्याचा अगदी योग्य पद्धतीने नियोजन अन उपयोग करुन पाण्याचा प्रश्न सोडवला.

दळणवळणाचा प्रश्न हाती घेतला.गुजरात मधील रस्ते जर पाहिले तर एकदम चकाचक.अगदी खेड्यातील रस्ते सुद्धा व्यवस्थित आहेत.थोडक्यात काय तर मोदींनी ज्या मुलभुत गरजा आहेत म्हणजे रस्ते,वीज अन पाणी यावर अगदी नियोजनबध्द काम केल. पण हे सार करताना सर्व कामगार अगदी पारदर्शक कुठे सुद्धा भ्रष्टाचाराचा लवलेश नाही.

उद्योजकांना फ़क्त सुविधाच नाही तर पारदर्शक कारभाराचा विश्वास पण दिला त्यामुळेच कोणतही काम किंवा योजना लालफ़ितीच्या कारभारात अडकत नाही.संपुर्ण शासकीय यंत्रणेवर मोदींचा वचक आहे.त्यामुळे सर्व काम कशी फ़टाफ़ट होतात.

आजमितीला नरेंद्र मोदी खरोखर "विकासपुरुष" झाले आहेत.

हे सगळ पाहताना माझ मन नकळत महाराष्ट्रात काय चालु आहे याचाच विचार करत होत.गुजरात ज्या वेगाने पुढे जात आहे त्याच वेगाने आपली अधोगती चालु आहे.भ्रष्टाचार,जाती-पातीच राजकराण,भाषावाद,बाबुगिरी यासगळ्यात महाराष्ट्र भरडला जात आहे.जे मोदींना गुजरात मध्ये शक्य आहे ते महाराष्ट्र मध्ये एकाही नेत्याला किंवा पक्षाला शक्य नाही.स्वतःच्या तिजोर्‍या भरण्यात मश्गुल असणारे नेते ह्या स्वराज्यात निपजले आहेत हेच महाराष्ट्राच दुर्दैव आहे.

काही दिवसांपुर्वीचा एक घटना आठवते आहे....जेव्हा आदर्श अन इतर गोष्टींवरुन महाराष्ट्रातल्या राजकारण्यांमध्ये कलगीतुरा चालु होता तेव्हा मोदी मुंबई मध्ये गुजरातसाठी एक रोड शो करुन गेले होते.त्याची साधी दखल सुद्धा आपल्या नेत्यांनी घेतली नव्हती.तेव्हा महाराष्ट्रात चालु असणार्‍या घडामोडींबद्दल एकही टिप्पण्णी केली नाही...ते आले...त्यांनी पाहिल...अन ते जिंकले.यातुनच ते किती धुरधंर राजकारणी आहेत हे दिसुन येत.

महाराष्ट्रालाही असाच एक नरेंद्र मोदी लाभो हीच सदिच्छा.

जाता..जाता...खाली दोन दुवे देत आहे ते जरुर पाहा...पहिला आहे गुजरात राज्य सरकारचा अन दुसरी महाराष्ट्र सरकारचा...मग मी जे वर म्हणलोय ते नक्की पटेल.

गुजरात राज्य सरकार :
http://www.gujaratindia.com/index.htm

महाराष्ट्र राज्य सरकार:
http://maharashtra.gov.in/

14 comments:

Anagha said...

खरं आहे...मी एका शुटसाठी महाराष्ट्र, गुजरात आणि आंध्र प्रदेश आत आत गावांमध्ये फिरले. त्यावेळी सगळीकडे गुजरात अतिशय स्वच्छ आणि प्रगती ढळढळीत दिसत होती...त्या तुलनेत महाराष्ट्र बराच खाली आणि आंध्र तर गचाळच वाटला होता.

aativas said...

आणखी एक म्हणजे त्यांचा नोकरशाहीवर असलेला वचक! आणि ते धर्माची भाषा करत नाहीत .. वीज, शिक्षण, पाणी अशा मूलभूत गोष्टींवर त्यांनी भर दिला.

हेरंब said...

खरंय.. कॉंग्रेस त्यांना कितीही 'मौत का सौदागर' म्हणून दूषणं देऊदेत त्याने काहीही फरक पडत नाही.. एक दिवस ते गुजरातला एवढ्या उच्च पातळीला नेऊन ठेवतील की ते नक्की कॉंग्रेसच्या मौतचा सौदागर बनतील !!

आणि आपला महाराष्ट्र !!!!!! अगदी याउलट ... अतिवेगाने रसातळाला जाणारं एक महान राज्य.. खरंच असा एखादा मोदी आपल्या महाराष्ट्राला तातडीने हवाय !!!

Anonymous said...

असा एखादा मोदी आपल्या महाराष्ट्राला तातडीने हवाय !!!

Yogesh said...

अनघा ताइ...सध्याचा महाराष्ट्र पाहुन तो लवकरच आंध्रच्याही खाली जाइल अस वाटतय.

Yogesh said...

सविता ताइ अगदी बरोबर आहे...मोदी म्हणजे वन मॅन आर्मी आहेत.

Yogesh said...

हेरंब...कॉंग्रेसने संपुर्ण देशाच वाटोळ केल आहे...सगळीकडे भ्रष्टाचार अन महागाई बस्स एवढच आहे.

Yogesh said...

राज...महाराष्ट्रालाच नव्हे तर संपुर्ण देशाला मोदींची गरज आहे.

सौरभ said...

nice writeup... kharach pratyek state sathi ek Na.Mo. pahije...

सिद्धार्थ said...

अगदी गेल्या महिन्यापर्यंत माझं देखील मोदींबद्दल मत मिडियाच्या देखाव्यावर आधारित होत पण गेल्या काही दिवसात जे काही वाचलं आहे त्यावरून भारतात देखील असा नेता आणि असा चोख कारभार घडू शकतो ह्यावर विश्वास बसायला वेळ लागला. दुर्दैवाने असा नेता फक्त एका राज्यातच घडला. जे मोदींना १० वर्षात जमले ते केन्द्र सरकारला सहा दशके जमू नये ही शोकांतिका.

आनंद पत्रे said...

अनघा आणि योगेश, तुम्ही आंध्राचा कुठला भाग पाहीला ते माहित नाही, पण आंध्रा सुद्धा बर्‍यापैकी प्रगत आहे, गेल्या वर्षी सर्व बाबतीत नं. ३ वर होतं.
असो बाकी गुजरात आणि मोदी बाबत सर्व मते पटली आणि महाराष्ट्राची अधोगती वेगाने होत आहे, एव्हडंच काय तर बिहारही सुधारतो आहे.. कॉन्ग्रेस पुर्ण जिम्मेदार आहे :(

Yogesh said...

सिद्ध...माझ पण आता पुर्ण मतपरीवर्तन झाल आहे.

@आप...बरोबर म्हणतो आहेस...कॉंग्रेस पुर्ण वाटोळ केल आहे.

THEPROPHET said...

मिळेल मिळेल.. .एक दिवस महाराष्ट्रालाही मोदी मिळेल! :)

Yogesh said...

विभि...सध्या तरी तोच आशावाद आहे.