????

लेखाच शीर्षक पाहुन तुम्हाला थोड आश्चर्य वाटल असेल ना....पण हा मला पडलेला प्रश्न आहे. (यात काय नवीन ते तर नेहमीचचं आहे)

आज संध्याकाळी "सकाळ" (हो सकाळ संध्याकाळीच वाचतो) वाचायला घेतला तर "राजीव गांधीं राष्ट्रीय पारितोषिक" याची मोठी जाहिरात दिसली.मग सहज विचार केला आपल्या देशात सरकारची कोणती पण योजना ही फ़क्त राजीव गांधी,इंदिरा गांधी अन पंडीत नेहरु या तीन नावांभोवतीच का घुटमळते???

जरा हे पहा...
१.राजीव गांधी राष्ट्रीय पारितोषिक योजना
२.राजीव गांधी ग्रामीण विद्युतीकरण योजना
३.राजीव गांधी उद्योग मित्र योजना (लघु उद्योजकांसा्ठी)
४.राजीव गांधी श्रमिक कल्याण योजना
५.राजीव गांधी शिल्पी स्वास्थ्य विमा योजना
६.RAJIV GANDHI NATIONAL CRÈCHE SCHEME FOR THE CHILDREN OF WORKING MOTHERS
७.Rajiv Gandhi Scheme for Empowerment of Adolescent Girls
८.इंदीरा आवास योजना
९.इंदीरा गांधी राष्ट्रीय पेन्शन योजना
९.जवाहरलाल नेहरु रोजगार योजना
१०. जवाहरलाल नेहरु नागरी पुनर्निमाण योजना

ह्या उदाहरणादाखल दिलेल्या काही योजना आहेत.या योजनांमध्ये करोडो रुपये ओतले जातात ते पण तुम्ही आम्ही भरणार्‍या करातुनच.याचा खर्‍या गरजुंना किती लाभ होतो याबद्द्ल शंकाच आहे.असो तो वेगळाच मुद्दा आहे त्यावर वेगळीच पोस्ट होऊ शकते.


तर मी काय म्हणत होतो ...राज्य सरकार असो किंवा केंद्र सरकार जेव्हा कधी योजना जाहीर करतात ती या तीन नावांच्या पलीकडे कधीच जात नाही.भगतसिंग,राजगुरु किंवा लालबहाद्दुर शास्त्री यांच्या नावाने कधी कोणती योजना ऐकली आहे का हो??(माझ्या तरी ऐकण्यात नाही एखादी असेल तर जरुर सांगा)

ह्या तीन व्यक्ती सोडल्या तर भारतात अशी एक पण लायक व्यक्ती झालीच नाही का??

सरकारी योजना तर सोडाच रस्ते, उड्डाणपुल,सरकारी दवाखाने, विमानतळ,जलाशय,संग्राहलये, उद्याने काही असो यांची नाव असलीच पाहिजे.सगळीकडे यांच्याच नावाचा उदो उदो करुन सरकारला नक्की साधायच तरी काय आहे??

 आज भारतातल्या खेडोपाडी मुलभुत सुविधा पोहचल्या नाहीत पण ह्या तीन नावांच्या रुपाने कोणती ना कोणती योजना मात्र नक्कीच पोहचली आहे.यामागच राजकारण न समजण्या इतपत  भारतीय मुर्ख आहेत का???



फ़क्त योजना जाहिर करुन मुलभुत गरजा अन विकास साधता नाही.खरोखर विकास साधायचा असेल तर तो वातानुकुलीत खोलीत चर्चा झोडुन साधता येत नाही त्यासाठी खेडॊपाड्यात पोहचुन काम करण्याची गरज आहे हे ज्या दिवशी राजकारण्यांना कळेल तेव्हाच याच उत्तर मिळेल.

विरोध हा नाव देण्याला नाही तर त्याच्या मागुन केल्या जाणार्‍या राजकारणाला आहे.





14 comments:

हेरंब said...

अरे किमान ४५० योजना यांच्याच नावावर आहेत. हे बघ..

Pura Desh Nehru, Gandhi ke naam ! Over 450 Schemes named after Nehru, Gandhi : http://www.deccanherald.com/content/12096/government-schemes-projects-named-nehru.html

श्रिया (मोनिका रेगे) said...

मनापासून जनतेसाठी काही करावे,आणि ते पण निस्वार्थी वृत्तीने करावे हे कितीश्या राजकारण्यांना जमते आहे हा एक प्रश्नच आहे.काही न काही लपलेला स्वार्थ(प्रसिद्धी,मतांसाठी करण्यात येणारी सोय इत्यादी.)वा'अर्थ(पैसा)ह्यासाठी हि मंडळी तत्पर असतात.तुझे अगदी खरे आहे योगेश.ज्या व्यक्तींनी खरोखर देशासाठी काही केले,अश्यांची आठवण म्हणून कुठे काही दिसते आहे का आज! खरोखर अश्या लोकांना पुढे जाऊन आपले नाव कुठे दिसावे अशी इच्छा पण नसेल.असे हे'भगत सिंग'सारखे अनेक थोर,'चिरंजीवी'आहेत खरया अर्थाने आपल्या सर्वांच्या मनात ह्यांचे नाव कोरले गेलेले आहेच नाहीका?

Anonymous said...

नावांमागे राजकारण असे आहे- नव्या पिढीला केवळ गांधी नेहरू लक्षात राहावे म्हणजे आपोआप कोंग्रेसचे ब्रांडिंग होत राहील.
रस्यावर होर्डिंग लावण्यासारखा हा प्रकार आहे- थोडा सोफेस्टिकेटेड आहे इतकंच.

aativas said...

इतकचं नाही तर या योजना 'गांधी' घराण्यातल्या लोकांच्या जन्मदिनी अथवा पुण्यतिथीच्या दिवशीच जाहीर होतात! तुमचा मुद्दा मला पटला.

पण असही वाटत की ज्यांच्याबद्दल आपल्याला आदर आहे त्यांची नाव अशी देऊ नयेतच! नाहीतर लोकमान्य टिळक रस्त्यांच 'लोटि रोड' होत आणि महात्मा गांधी मार्गावर महागडी दुकान येतात!

Suhas Diwakar Zele said...

तुझ्या मनात आहे जे प्रश्नचिन्ह ते माझ्यापण..
पण मग कळत ओ डार्लिंग ये है इंडिया :(

Yogesh said...

हेरंब ...सगळ कठीण आहे...काय बोलु आता???

Yogesh said...

श्रिया ताइ अगदी बरोबर आहे...हे सर्व थोर नेते चिरंजीवी आहेत...आपल्या मनात ह्यांची नाव कोरली गेली आहेत.

Yogesh said...

प्रणव...संधी-साधु राजकरण आहे...दुसर काय????जनतेच्या मुलभुत प्रश्नांशी काही एक घेण देण नाही.

Yogesh said...

सविता ताइ...अगदी सहमत...रस्त्याला थोर पुरुषांची ना्वेच देउ नये...किती मोठी विटंबना आहे.

Yogesh said...

सुहास...शेवटी असच म्हणायच अन गप्प बसायच.

आनंद पत्रे said...

बापरे ४५० , अवघड आहे.. खरोखर ब्रॅंडींग आहे हे :(

Yogesh said...

अप्पा बरोबर आहे....ब्रॅंडींग आहे हे...

THEPROPHET said...

माया है माया!!!! :(

Yogesh said...

विभि...पैसा बोलता है..