पुण्याहुन येणारे आम्ही पाच लोक होतो त्यामुळे गाडी करुन जाउ या अस अगोदर ठरल होत परंतु गाडी पेक्षा बाईकवर जाणं जास्त सोयीच राहिल त्यामुळे मी अन सागर. अनिकेत, अभिजीत अन विकास अशे पाच जण मिळुन तीन बाईकवर जाउ या अस ठरल.
आता महत्वाच काम म्हणजे बाईक शोधायच ती जबाबदारी सागर सदगुणी मुलावर दिली.भरपुर प्रयत्न करुनही त्याला बाईक मिळाली नाही.तरी पण पठ्ठ्याने प्रयत्न सोडले नव्हते....शुक्रवारी रात्री मी साधारण ८.३० ला या सासमु ला फ़ोन केला तेव्हा आमचा झालेला संवाद असा..
मी: अरे काय झाल...मिळाली का बाईक??
सासमु: नाही रे...मित्राची बाइक नाही मिळत आहे.
मी: बर ठीक आहे...आपण स्कुटीवर जाउ रे...टेन्शन घेउ नकोस
सासमु: चालेल...बघु रात्री १२ वाजता मी मित्राकडे जाउन येतो...त्याने दिली तर बघु या.
(आता रात्री १२ ला कोणत्या मित्राकडे गेला होता हे विचारु नका...तो सदगुणी आहे)
मी:वक्के...फ़क्त मला तस कळव.
एकुणच रागरंग पाहुन मी स्कुटीवर जाव लागणार याची तयारी सुरु केली...अपेक्षेप्रमाणेच सासमु चा सकाळी ६.३० ला समस आला बाईक मिळाली नाही तुझी स्कुटी घेऊन ये...आपण स्कुटीवरच जाउ या....त्याला ७.१५ला वाकडला पोहच असा रिप्लाय धाडुन दिला.
मी साधारण ७.४५ ला वाकडला पोहचलो तत्पुर्वीच अनिकेत आणि मंडळी पोहचली होती.मला उशीर होण्याच कारण म्हणजे...वारजेच्या पुलावरुन थोड पुढे आल्यानंतर भटक्या वाजला म्हणुन रस्त्याच्या कडेला थांबलो होतो तोच तिथे एक काका पाठीमागुन आले...त्यांच्या बाईकमधील पेट्रोल संपल होतं..एकंदरीत त्यांची अवस्था पाहुन बर्याच दुरुन गाडी ढकलत आले आहेत अस दिसत होत...त्यांना थोड पेट्रोल हव होत...मी टाकी नुकतीच संपुर्ण भरली होती त्यामुळे मला पेट्रोल द्यायला काहीच अडचण नव्हती पण स्कुटीमधुन पेट्रोल काढायच कस हाच प्रश्न होता...थोडा फ़ार प्रयत्न केला पण यश काही मिळाल नाही...मलाही वेळ होत होता त्यामुळे त्यांनी तु जा मी बघतो अस म्हणल्यावर मी तिथुन निघालो....वाकडला पोहचलो तर सासमु सोडुन सगळे पोहचले होते. सासमु ला फ़ोन केला तर साहेब अजुनही होस्टेलवरच होते... "अरे तुम्ही पोहचलात काय???तुमच्याच फ़ोनची वाट पाहत होतो...१५ मिनीटे थांबा आलोच मी." अस उत्तर मिळाल्यावर आम्ही समजुन घेतल स्वारी लवकर काही येत नाही त्यामुळे तिथे बाजुलाच गाड्या लावुन आम्ही गप्पा टप्पा चालु केल्या. अखेरीस सासमु आठ वाजता पोहचला....त्यानंतर आम्ही कामशेतच्या दिशेने मार्गस्थ झालो.
माझी स्कुटी असल्याने...अनिकेत अन अभिजीत दोघांनाही अगदी निवांत बाइक चालावायला लागत होती.मला वाटत प्रथमतःच त्यांनी महामार्गावर एवढी निवांत बाइक चालवली असेल.आम्ही वाटेत असतानाच सुहासचा "आम्ही लोणावळ्यात नाश्ता करतो अहोत तुम्ही पण नाश्ता करुन घ्या" असा फ़ोन येउन गेला.रस्तामध्ये कुठे चांगले हॉटेल दिसल नाही त्यामुळे थेट कामशेतलाच नाश्ता करण्यासाठी थांबलो..कामशेतमध्ये मी पहिल्यांदाच अशी मिसळ खाल्ली की जी मध्ये मटकी व्यतिरिक्त मसुरची डाळ अन हरभरे होते.असो तिथे आमचा नाश्ता होईपर्यंत मुंबई वरुन येणार्यांपैकी महेंद्रकाकांची गाडी पोहचली होती.
महेंद्र काका व सुरेश (अरे आपल ते देवेंद्र) या बझकरांना भेटण्याची ही पहिलीच वेळ...याअगोदर फ़क्त बझवरची ओळख...महेंद्र काका म्हणजे चांगलच वजनदार (भारदस्त) व्यक्तीमत्व आहे ;) मग सेनापतींची गाडी आली...सेनापतींना पण प्रथमच भेटलो...आता राहिलेल्या एका गाडीची वाट पाहत होतो...एकुणच आजचा ट्रेक चांगला धमाल होणार आहे याची जाणीव झाली होती.
तिसरी गाडी मार्ग चुकली होती त्यामुळे त्यांना घ्यायला मी,अनिकेत व सासमु महामार्गावर जाउन थांबलो.तिसरा ग्रुप आल्यानंतर आम्ही तिकोन्याच्या दिशेने मार्गस्थ झालो.पवनानगर पर्यंत आम्ही अगदी व्यवस्थित पोहचलो...तिथे गेल्यावर सासमुला सुहासला फ़ोन करु रस्ता विचारयला सांगितल अन इथेच गडबड झाली...आता भरकटायची वेळ आमच्या दोघांची होती.पवनानगरच्या थोड पुढे आल्यावर डावीकडे वळुन मग सरळ यायच होत त्याऐवजी आम्ही एकदम सरळ निघालो...धरणापासुन खुप पुढे आलो तरी आम्हाला तिकोना येण्याच काही चिन्ह दिसेना..मला तर प्रत्येक डोंगर तर तिकोनाच आहे की काय असा भास व्हायचा...बराच वेळ झाल्यावर मग जाणवल की आपण रस्ता भरकटलो आहोत.तोपर्यंत सर्वजण तिकोन्याच्या पायथ्याशी पोहचले होते....संपुर्ण रस्त्यावर फ़क्त आम्हीच होतो त्यामुळे रस्ता विचारायचा तरी कोणाला?? थोड अंतर मागे फ़िरल्यावर एक मावशी भेटल्या मग त्यांनी व्यवथित मार्ग सांगितला...आम्हाला पवना ध्ररणाच्या सुरुवातीला परत जावा लागणार होत...शेवटी एकदाच आम्ही तिकोन्याच्या पायथ्याला पोहचलो तोपर्यंत ११.३० झाले होते.
सर्वांची ओळख झाल्यावर रोहन ने सर्व सुचना दिल्या त्यानंतर गडाच्या दिशेने सर्व लोक निघाले.उन भरपुर होत त्यामुळे चांगलीच दमछाक होणार होती.आजुबाजुचे डोंगर हिरवाइने नटले होते....समोरच पवना धरणाचा जलाशय दिसत होता.एकंदरीतच सर्व वातावरण अगदी मस्त होत.फ़ोटोगिरी अन गप्पा टप्पा करत आम्ही सर्वजण गडावर पोहचलो.
एवढ सगळ भटकुन झाल्यावर आता चांगली भुक लागली होती.आता जरा खादाडी सुरु असतानाचे फ़ोटो पहा.
खादाडी झाल्यावर पुन्हा थोड भटकलो अन मग आम्ही परतीच्या मार्गावर निघालो...जाताना अनुजा.देवेंद्र,सुहास यांना मी बकरा मिळालो होतो त्यामुळे चांगलाच टाइमपास झाला.(आता माझा बकरा का झाला व्हता हे म्या आज्याबात सांगणार नाय.)
खाली पोहचलो तर अजुन समस्या आमची वाटच पाहत होती...माझ्या स्कुटीचं मागच चाक पंक्चर झाल होत.पवनानगर शिवाय पंक्चर काढुन मिळणार नव्हत त्यामुळे अंदाजे ५-६ कि.मी.कसरत करुन पोहचायला लागणार होत.पंक्चरच्या दुकानापर्यंचा प्रवास अगदी अविस्मरणीय असा होता.कामशेतला सर्वांसोबत चहा घेउन मग आम्ही पुन्हा पुण्याच्या दिशेला रवाना झालो.सुदैवाने तिथुन परतताना काही अडचण आली नाही.
महेंद्र काका,श्रीताइ,आका,अनुजा, देवेंद्र,सेनापती,सासमु,सपा,सुझे,भामुं यांच्याशी फ़क्त आंजावरच बझ किंवा ब्लॉगच्या माध्यमातुन भेट व्हायची...पण शनिवारी या सर्वांना भेटुन खुप छान वाटल...यांच्यासोबत अजुनही नवीन मित्र मंडळी भेटली.
या ट्रेक मध्ये बझवरील इतर कट्टेकरी हेरंब,विभि,आप,देवकाका,श्रेता,अपर्णा,तन्वी ताय,मीणल यासर्वांना खुप मिस केल.
खरतर खादाडी काय काय केली याचा उल्लेख मी वर केला नाही...पण तो केला नाही तर तुम्हाला सर्वांना खुप वाईट वाटेल त्यामुळे खाली देत आहे.
थेपले,भाकरी,बटाट्याची भाजी,चटणी,बाकरवडी,थालीपीठ,,सामोसे,अळुवडी,मोसंबी,सफ़रचंद,बेसनलाडु.
अरे सर्वात महत्वाच म्हणजे अनुजाने आणलेल टांग....आता ही टांग काय आहे...हे जर मी असच सांगितल तर त्याच महत्व नाय कळणाय त्याच महत्व कळायच असेल तर त्यासाठी पुढ्च्या ट्रेकला याव लागणार.
टीप:
१. पोस्ट खुप घाइत खरडली आहे तवा चु.भु.दे.घे.
२. ब्लॉगर बहुतेक गंडल आहे त्यामुळे फ़ोटु टाकता आले नाहीत. :(
Widget by Css Reflex | TutZone
15 comments:
मस्त रे ........
धमाल मज्जा आली ट्रेक ला....
सागर : सचिन कुठे आहेस ?
मी : तिकोना गडावर आहोत आम्ही.
सागर : अरे आम्हीं पण गडावरच आहोत ....
भरपूर मज्जा केलेली दिसतेय तुम्ही लोकांनी आणि खादाडी पण! छोटे मोठे अडथळे प्रत्येक ट्रेकमधे येतातच पण त्यामुळेच ट्रेक जिवंत होतो, हो ना! माझी यावेळची संधी हुकली पण हिवाळी ट्रेकला मी नक्की येणार.
अरे ही पोस्ट अर्धवटच आहे. तुझा बकरा का झाला होता ? तुझा पंक्चर काढेपर्यंतचा अविस्मरणीय प्रवास ? अनुजाची / अनुजाचं टांग हे सगळं पोस्टमध्ये व्यवस्थित यायला हवं..त्याकरता प्रत्येकी एक पोस्ट यायला हवी. शिवाय मुंबईकरांचे अनुभव अजून वाचायचे आहेतच. पण हरकत नाही आम्ही तुझे आणि आका ने काढलेले फोटो पाहून घरबसल्या हा ट्रेक एन्जॉय केला म्हणायला हरकत नाही.
श्रेया
मनमौजी, मस्त वर्णन रे.कांचनताई ते त्याला कालच बोललो अश्या प्रसंगामुळेच यादगार होतात हे क्षण म्ह्णुन ...योगेश, बाकी ते तु काल शेअर्स बदल काय सांगत होतास रे ..o.. :)
अख्ख्या रस्त्यावर तुम्ही दोघेच स्कूटीवरून जाताय हे दृश्य डोळ्यासमोर उभं राहिलं! :P
लय भारी!!!!
पुढच्यावेळेस नक्की जमवू!
सकाळीच आ का चे फोटो पाहून ट्रेक मस्त झाला असणार याचा अंदाज आला होता
एकंदरीत जोरदार मस्ती केली तुम्ही सर्वांनी मिळून :)
येणाऱ्या दिवाळीच्या मुहूर्तावर एखादा असाच ट्रेक आयोजित करा आम्हीही येण्याचा प्रयत्न करू
cairi
क्या बात है ... बुझ्झ्फुल ट्रेक झ्हालेला दिसतोय ब्लोगर्स मंडळींचा.
पुढच्या वेळीस यायचा आम्हीही चंग बांधलाय .
अख्ख्या रस्त्यावर तुम्ही दोघेच स्कूटीवरून जाताय हे दृश्य डोळ्यासमोर उभं राहिलं! :P
लय भारी!!!!
पुढच्यावेळेस नक्की जमवू!+१
योगी तुला स्कूटीवर आणि इतर बाईकवर हे अगदी डोळ्यासमोर उभा राहिलं...पण मज्ज्जा तर आलीये ट्रेकला. शिवाय पहिल्या पोस्टचा मान तुझं...तेव्हा खादाडी फोटो नाहीत म्हणून थोडक्यात निषेध करते....(फक्त लिस्ट पुरता...) आता सगळी पोस्ट सोडून मला तीच का दिसली हे विचारू नकोस......
पुढच्या ट्रेकला वाहिनीला पण घेऊन जा....माझे सगळे जुने मित्र निदान एकदा तरी बायकोला बरोबर घेऊन येत ...मग त्याच नंतर परत येत नाहीत ही वेगळी गोष्ट...:)
वा रे वा !!! भलतीच धम्माल केलीत की.. पोस्ट एकदम झक्कास झालीये पण टू म्हणालास त्याप्रमाणे थोडी धावपळीत झाल्यासारखी वाटते आहे. श्रेता म्हणते आहे त्या सगळ्या टर्म्स, फोटू, खादाडी फोटू सगळ्या सगळ्याने भरलेला भाग-२ लवकर येऊ द्या.
भन्नाट धम्माल केली तुम्ही.... डिसेंबरात अजुन एक ठरवा रे...
वाह योगेश सगळा ट्रेक उभा केलास डोळ्यासमोर...खूप मज्जा आली तुम्हा सगळ्यांना भेटून आणि असेच भेटत राहू...
सर्वांचे खुप खुप आभार...डिसेंबरात पुन्हा एक मस्त ट्रेक करु या..
छान लिहील आहे!
मध्येच अनुजा अस वाचून गोंधळले..हं मग म्हटल ...सारखी नावं असली की असा गोंधळ होतो.. ! ट्रेकला जाण्याआधीच आणि नंतरच वर्णन छान आहे.
अरे... माझ्याकडून ही पोस्ट वाचायची राहून गेली होती. मस्त..मस्त.. तू सोडून कोणीच ह्या ट्रेक वर पोस्ट लिहिलेली नाही ... :( अगदी मी सुद्धा अजून लिहिलेली नाही...
Post a Comment