स्वाइन फ़्लु : आता तरी जागे व्हा!!!!!!!!!!!!

गेले १०-१५ दिवस जिथे तिथे फ़क्त स्वाइन फ़्लुच्या बातम्या आहेत.या सगल्याचा आता मात्र जाम वैताग आला आहे.बातम्या ऐकुनच स्वाइन फ़्लु झाल्यासारख वाटायला लागल आहे. या स्वाइन फ़्लु ने मात्र पुन्हा एकदा सरकार अन राजकारणी यान्चा भान्डफोड केला आहे. नैसर्गिक आपत्ती असो किन्वा मानव निर्मित आपत्ती असो आम्ही त्याचा मुकाबला करुच शकत नाही हे सिद्ध झाल आहे.
गेले महिनाभर सरकार अन आमचे नेते लोक यानी ज्या पद्धतीने परिस्थिती हाताळली त्यावरुन त्यान्ची कार्यक्षमता लक्षात आली.महासत्तेची स्वप्न पाहत असलेल्या भारताची एका विषाणुने अगदी वातहात करुन सोडली आहे. मनात फ़क्त एकच प्रश्न येतो, एवढा मोठा देश, गुणवत्ता, साधन, सम्पती सार काहि असुनही आम्ही कोणत्याच सन्कटाचा सामना समर्थपणे करु शकत नाही.
आपण प्रत्येकाने आत्मनिरीक्षण करण्याची वेळ आली आहे. एवढी मोठी आपत्ती आलेली असताना आमच्या सरकारजळ परिस्थिती नियनत्रणाखाली आणण्यासाठी कोणतीही योजना नसावी याहुन मोठ दुर्दैव काय असु शकत?

निवडणुकांच्या काळात मते मागायला येत असलेल्या तथाकथित जनतेच्या सर्व सेवेकांना जाब विचारयची वेळ आली आहे.

आता तरी जागे व्हा!!!!!!!!!!!!

2 comments:

Deepak said...

खरं आहे!
अशा परिस्थितीतच आपल्या राजकारण्यांची कुशल नितीमत्ता आणि कार्यक्षमता लक्षात येते.
मी ही यावरच एक लेख लिहिला होता = आपण यांना पाहिलंत का?

भुंगा

Yogesh said...

@ भुंगा. . .
प्रतिक्रियेबद्द्ल आभार