उद्या आपला स्वातंत्र्यदिन, प्रत्येक भारतीयासाठी अत्यंत अभिमानाचा दिवस.पुर्वसंध्येला प्रत्येकजण उद्याच्या तयारीत मग्न आहे. आज प्रत्येक रस्त्यावर, सिग्नलवर, चौका चौकात झेंदयांची विक्री करणारांची गर्दी आहे, तरी स्वाइन फ्लू मुळे यांची गर्दी थोडी कमी आहे. खूप प्रकारचे ध्वज सायकलला किंवा बांबुला अडकवून यांची विक्री चालू असते.
आपल्यासाठी स्वातंत्र्यदिन आणी प्रजासत्ताक दिन हे दोन दिवस देशप्रेमाचे अस्तत.इतर दिवशी आपल्याला देशाशी काही घें देण नसत. मग या दिवशी देश प्रेम व्यक्त करण्यासाठी खूप सारे मार्ग शोधले जात्तात त्या पैकिच एक म्हणजे कागदी किंवा प्लास्टिकचा ध्वज घायचा टेबलवर ठेवायचा, कारमध्ये, भिंतीमध्ये ाडकायवायचा, नाही तर हातात घेऊन गावभर हिंडत बसयाच. मनाला वाटेल तेव्हा हव्य त्या जागी फाडकावायचा. . . अरे तो आपला राष्ट्र ध्वज आहे शो पीस नाही. . कशाच भान नाही. दुसर्या दिवशीच हे ध्वज रस्त्यावर अन् आमच बेगडी देश प्रेम सुद्धा!!! कचरा कुंडी,रस्त्यावर फाटलेले, चुरागळून पडलेले हे ध्वज सर्रास तुडवलेले जातात अन् त्याच आम्हाला काही सोयर सुतक नसत. आपल्याला जे स्वातंत्र्य मिळाल आहे या मागे खूप बलीदान आहेत. त्या बरोबरच मिळालेले स्वातंत्र्य टिकवण्यासाठी तेवढेच जवान शहीद झाले आहेत.
स्वातंत्र्य दिनाला धवज घ्यायचा नंतर तो कित्येक दिवस धूळ खात पडलेला असतो. . .मग परत येतो प्रजासत्ताक दिन की परत नवा ध्वज. . .अन् पुन्हा तोच प्रवास चालू. . .आणी आमच्या आजूबाजूला हे सार घडत असताना आम्ही मात्र नीर्विकार असतो. . आम्हाला याचा काहीच फरक पडत नाही. हेच आपल देश प्रेम??? हीच स्वातंत्र्यसैनिकंच्या बलिदानाची किमत आहे??? हे आपण किती दिवस अस वागायच??
या वर्षी तरी ध्वज घेताना किमान खालील विचार करा. . .प्लीज. . . 1. केवळ हौस म्हणून किंवा स्वस्त मिळतो आहे म्हणून ध्वज विकत घेऊ नका 2. ध्वज घेण्यापूर्वी आपण तो कशासाठी अन् कुठे लावणार आहोत याचा नक्की विचार करा 3. घ्यायचा असेल तर शक्यतो कायम स्वरूपी टिकतील अशे धातूचे ध्वज घ्या 4. वाटेल त्या ठिकाणी स्टिकर्स चिटकवू नका 5. आजु बाजूला पडलेले ध्वज पायदळी येऊ देऊ नका 6. ध्वजाचा मान राखा 7. जे मान ठेवत नसतील त्यानाही मान ठेवण्यास भाग पाडा. आपल्या राष्ट्र ध्वजाचा मान ठेवणे ही आपली नैतीक जबाबदारी आहे याची जाणीव सदैव ठेवा. . . .जय हिंद