लालबहादुर शास्त्री...आपल्या देशाचे माजी पंतप्रधान...एक अशी व्यक्ती की जिने बोलण्यापेक्षाही आपल्या वागण्यातुनच एक आदर्श निर्माण केला.ही घटना आहे ते पंतप्रधान असतानाची....ते जेव्हा पंतप्रधान पदावर कार्यरत होते तेव्हा त्यांच्या वापरासाठी "इम्पाला" ही कार सरकारने देउ केली होती.
त्यांच्या मुलाला या कारविषयी प्रचंड आकर्षण होतं. एके दिवशी त्याने शास्त्रीजींच्या नकळत चालकाला सांगुन कार काढली व त्यातुन एक मस्त रपेट मारुन आला.शास्त्रीजींच्या दररोजच्या प्रवासाची नोंद ठेवली जायची.त्यामुळे त्यांच्या लक्षात ही गोष्ट आली.त्यांनी त्यांच्या सचिवाला सांगुन मुलाने चालवलेल्या १४ कि.मी.ची वेगळी नोंद करुन ठेवायला सांगितली.महिन्याच्या शेवटी त्यांनी त्या १४ कि.मी.च्या इंधनाचा खर्च त्यांनी स्वतः दिला.
हे वाचल्यावर आज प्रश्न पडतो.....शा्स्त्रीजी पंतप्रधान असलेला देश नक्की हाच का???
आजच्या घडीला असा नेता शोधुनही सापडणार नाही.आम्ही इतिहासाकडे नक्की कोणत्या दृष्टीकोनातुन पाहतो?? त्यातुन शिकण्याऐवजी फ़क्त आपल्या स्वार्थासाठी आपल्या सोयीने त्याचा वापर करत राहणार आहोत का?? अस असेल तर "आदर्श" सारखे अनेक आदर्श उभे राहतील.
"साधी राहणी उच्च विचारसरणी" हे फ़क्त पुस्तकातच वाचायच अन प्रत्यक्षात मात्र "उच्च राहणी साधी विचारसरणी" अस वागायच.
हे बदलेल का कधी???
शास्त्रीजींसारखं नेतृत्व आम्हाला लाभेल का कधी???

Widget by Css Reflex | TutZone