आज
लोकप्रभामधे लिटिल चैम्प वर आलेला लेख वाचनात आला.खुप सुंदर लेख आहे अन वाचताना नकळत माझ्या मनात विचार आल,या पाच छोट्या मित्रानी आपल आयुष्य अगदी सुंदर करून टाकले आहे.खुप लोकाना त्यांची दुःख विसरायला लावली तर काहिना जगण्याची नवी उमेद दिली.हा कार्यक्रम पाहताना कुठे ही कृत्रिमता जाणवली नाही.झी च्या पूर्ण टीमने त्यांच बालपन कुठेही हरवून दिल नाही त्यामुलेच हा कार्यक्रम नितांत सुंदर झाला.माझा सोमवार आणि मंगलवार खुप छान जायचा.ऑफिसच टेंशन मनातील विचार सार
काही विसरून अगदी तल्लीन होउन त्यांच्या गाण्याचा आनंद घ्यायचो.या मुलानी खुप अविस्मरनीय अशे क्षण दिलेत त्याबरोबरच त्यानी मोठ्यना खुप काही शिकवल.या सर्व छोट्या चैम्पना अगदी मनापासून सलाम.