विजयादशमीच्या हार्दिक शुभेच्छा

सर्व वाचकांना विजयादशमीच्या हार्दिक शुभेच्छा !!!


चप्पलवटा - गोष्ट एका वाल्याची!!

ही कहाणी आहे कलीयुगातील वाल्याची. अध्यात्माची कास धरली तर जीवनात किती बदल घडू शकतो याच हे उत्तम उदाहरण आहे. प्रसिद्ध कॅमेरामेन देबु देवधर यांच्या हाताखाली लाइट्मन म्हणून काम केलेला . . . त्या दरम्यान दारूच व्यसन लागल. . व्यसनाच्या इतका अधीन गेला की होत नव्हत ते सार काही दारुत घाळवुन बसला मग सुरू झाली आयुष्याची वाताहत. . . जवळचे कोणीच राहील नाही. . .सोबतीला उरली ती फक्त हाता पायांची थरथर आणी एकटेपण. . .सगळा अंधकार झाला होता जीवनात . . . . त्या क्षणी एक आवाज आला "भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे." . . .गर्द अंधारात एक आशेचा किरण मिळाला मग सुरूवात झाली नव्या आयुष्याची. गुरू मार्ग सापडला अन् त्यामुळे जगाकडे , जीवनाकडे बघण्याचा दृष्टीकोन बदलला. . . नवी उमेद मिळाली. . . आध्यात्मीक चमत्कार यापेक्षा वेगळा काय असु शकतो??? स्वामींना गुरू मानून त्यांच्या ओढीने थेट अक्कलकोट गाठल. . . अन्नछत्रा बाहेर भाविकांच्या चपला सांभळन्याची जबाबदारी घेतली . . .त्याचा मोबदला म्हणजे फक्त दोन वेळेच जेवण. . . सेवाभावी वृत्तीने हा प्रवास सुरू झाला. . .जसे दिवस सरत गेले तशी दारू पण सुटली. . अश्यातच मग त्याने स्वतःचे हे अनुभव शब्दबद्ध करायला सुरूवात केली. . .हे सार लिखाण झाल पादत्रान कक्षात . . स्वामिंच्या दारी अश्यातच अजुन एक चमत्कार झाला . . नागपूर येथील प्रकाशण संस्थेचे संचालक अन् स्वामी भक्त प्रदीप मुळे तिथे दर्शानाला आले असताना चर्चेत कुठेतरी या लिखाणाविषयी समजल अन् त्यानंतर जन्माला आल एक आगळ वेगळ पुस्तक " चप्पलवटा ".या पुस्तकात त्यांना आलेले अनुभव शब्दबद्ध करण्यात आलेले आहे. ही कथा आहे विवेक कळके यांची . . .हा प्रवास आहे एक दारुडा ते स्वामी सेवेकरी असा. . आता त्यांनी ठरवल आहे की राहिलेले आयुष्य स्वामी चरणीच व्यतीत करायच.
मला नाही वाटत चमत्कार याहून वेगळा काही असु शकेन. . . अध्यात्म माणसाच्या आयुष्यात किती बदल घडवू शकतो. . जर सर्वांनीच गुरू मार्गाने वाटचाल केली तर आयुष्याच नंदनवन व्हायला वेळ लागणार नाही. . . ज्ञानेश्वर माउली , तुकाराम महाराज यांनी जो काही मार्ग दाखवला आहे तो जर अनुसरला गेला तर माणूस सुखी व्हायला अन् ह्या जगात शांती नांदायला वेळ लागणार नाही.
मागील आठवड्यात याविषयी लोकमतने दखल घेत बातमी प्रसिद्ध केली आहे.

शिक्षक दिनाच्या निमित्ताने!!!!!

उद्या शिक्षक दिन. . .मी शाळेत असताना मला हा दिवस खूप आवडायचा. कारण आमच्या शाळेत शिक्षक दिनी सर्व जबाबदारी 8 ते 10 च्या विद्यार्थंवर असायची .ह्या दिवशी शाळा चालवण्याची जबाबदारी ही त्यांची असायची. त्यामुळे महिनाभर अगोधर् सर्वांना वेध लागायचे, मग प्रत्येकजण आपली कामे ठरवून घ्यायचे. आप आपले विषय अन् त्या दिवसाचे टॉपिक याची तयारी चालू व्हायची. या दिवशी शाळेत जी मजा यायची ती काही औरच असायची. लहानपणीच खूप मोठे झाल्या चा तो अनुभव फार छान अन् खूप काही शिकवणारा असायचा.
आजची पोस्ट ही मी माझ्या शिक्षका साठी लिहीत आहे. त्यांच्या प्रती व्यक्त क्रुतज्ञता करण्याचा एक छोटा प्रयत्‍न.
1. देव गुरुजी:
बालवाडी ते 4थी पर्यंत आम्हाला यांच मार्गदर्शन मिळाल. अतिशय कडक अन् त्याहून किती तरी प्रेमळ आहेत. त्यांआ प्रत्येक गोष्ट ही अतिशय काटेकोर लागायची थोडीसुद्धा चुक माफ नसायची. माझ गणित केवळ यांच्यामुलेच पक्क झाल. शुद्धलेखन हे फकत टाक वापरुन लिहायच असा त्यांचा नियम होता. शाई पेन अन् बॉल पेन याला अगदी बंदी होती. लहानपनात त्यांनी जे काही संस्कार केले त्यामुळेच मी घडलो.
मी त्यांचा फक्त एकदाच मार खाल्ला होता , तो ही गणित शिकताना (मला आठवणीत राहिलेला तसा भरपूर वेळा आम्हाला प्रसाद मिळाला असेल पण आठवत नाही). गणितात ते आम्हाला हिशोब सांगायचे, आम्हाला त्याच उत्तर हे तोंडी द्याव लागायच म्हणजे वहीवर किंवा पाटीवर कोणतीही आकडेमोड करायची नाही. ते हिशोब सांगताना आमचा कधी लक्ष नसायच त्यामुळे हमखास उत्तर चुकाय्च. अस 2-3 वेळा झाल असेल त्यानंतर त्यानी काणाखाली जो आवाज काढला तो अजूनही विसरलो अन् हिशोब पण कधी चुकला नाही.

2. लोंढे मॅडम:
पाचवी ते सातवी या आमच्या वर्ग शिक्षक होत्या. त्यांचा मराठी हा विषय. त्यांच शिकवण इतक सहज सुंदर होत की अवघड असणारे भावार्थ अगदी साध्या सोप्या भाषेत त्या शिकवायच्या. त्यांच मराठी वर प्रभुत्व तर होतच त्या सोबत त्यांना आमच मन पण अगदी अचूक समजायच. आमच्या आनंदात, यशात ,अपयाशात पत्येक क्षणात त्यांचा सहभाग असायचा.
सातवीला स्कॉलरशिपला 2 गुण कमी मिळाल्यामुळे माझा मेरीठ लिस्ट चा नंबर गेला होता. त्यावेळी केवळ त्यांच्यामुलेच मी त्या अपयश स्वीकारू शकलो. त्यांनी त्यावेळी केलेला उपदेश आज ही मला उपयोगी पडतोय.

त्यांनी आम्हाला केवळ एक आदर्श विद्यार्थी नाही तर एक आदर्श माणूस म्हणून कस जगाव हे शिकवल.

3. डॉ. बी.एम. करमरकर
करमरकर सर मला थर्ड इयरला सेकंड सेमला जीओलॉजी या सबजेक्टला गेस्ट लेक्चरर होते. खूप कमी दिवस त्यांचा सहवास मला मिळाला पण त्यात त्यांच्या मार्गदर्शनाने मला अगदी बदलून टाकल . मी आजतागायत एवढा डेडीकेट्ड माणूस पहिला नाही. सर म्हणजे ज्ञानाचा अथांग सागर आहेत. इतक्या ज्ञानी व्यक्तीमत्वाचा मला सहवास मिळाला याचाच मी भाग्य मानतो.
अहो ह्या माणसाने पूर्ण महाराष्ट्र पालथा घातला आहे. सगळे घाट, पठार ह्यानी पायी फिरले आहेत. सगळे खड्कांचे प्रकार त्यांचे गुणधर्म आजही ह्या वयात त्यांच अगदी तोंड्पाठ आहे. कधी ही काहीही विचारा प्रत्येक प्रश्नाला अगदी अचूक उत्तर मिळणार. जीओलॉजीचा विकीपेडीयाचा म्हणा की!!!
एवढा ज्ञानी माणूस पण राहणीमान बोलन अगदी साध. . विशेष म्हणजे एकाही विद्यार्थ्याला त्यांनी कधीही एकेरी हाक मारली नाही. प्रत्येकाला ते नेहमी आदरातीच बोलवायचे. एवढ्या मोठ्या मनाचा माणूस शोधून ही सापडणार नाही.
ह्या वयात ही त्यांचा नवतारूणाला लाज्वेल असा उत्साह आहे ,आज ही ज्ञान लालसा तेवढीच आहे.
या सर्वां विषयी लिहील तेवढ कमीच आहे. काही भावना अश्या असततात की त्या आपण कधीही शब्दात व्यक्त करू शकत नाही.
मी आज जो काही आहे तो केवळ या सर्वांचे आशीर्वाद अन् संस्कार यामुळेच!!!