पहिल बक्षीस..

दोन ऑक्टोबर ...गांधी जयंती....प्रथेप्रमाणे शाळेत सर्वजण जयंती साजरी करण्यासाठी जमले होते.मुख्याध्यापकांच्या हस्ते गांधीजींच्या प्रतिमेची पुजा झाली.त्यानंतर शाळेने भाषण स्पर्धा आयोजित केली होती.



या स्पर्धेमध्ये सर्वात छोटा स्पर्धक मीच होतो.माझ नाव पुकारल्यानंतर मी भाषणासाठी उठलो अन ते पाच ते सात ओळींच भाषण ठोकुन आलो.भाषण पण अगदी टिपीकल होतं...

"अध्यक्ष महोदय,गुरुजन वर्ग अन जमलेल्या बंधु भगिनींनो मी जे काही दोन शब्द सांगणार आहे ते तुम्ही शांत चित्ताने ऐकावे ही नम्र विनंती.म.गांधीचे पुर्ण नाव मोहनदास करमचंद गांधी होते.त्यांचा जन्म २ ऑक्टोबर रोजी पोरबंदर येथे झाला.प्रेमाने त्यांना सर्वजण बापु म्हणत.एवढे बोलुन मी माझे भाषण संपवतो.जयहिंद.जय महाराष्ट्र."

हे आयुष्यातील माझ पहिलं भाषण.आजही हे भाषण माझ्या कस लक्षात आहे हे मला पण ठावुक नाही.

यानंतर निकालाच्या वेळी माझ नाव पुकारण्यात आल...माझा नंबर आला होता.... मला बक्षीस मिळाल होत...आयुष्यातील मला मिळालेलं पहिल बक्षीस...किती होत माहित आहे का??? २५ पैसे.



अन हे बक्षीस मला मुख्याध्यापकांच्या हस्ते मिळाल होत त्यामुळे जाम खुष झालो होतो.कारण तेव्हा मुख्याध्यापक म्हणजे एकदम सगळ्यात भारी अन त्यांनी बक्षीस दिल म्हणजे कॉलर टाईट.

मला अजुनही आठवतय ते २५ पैसे मिळाल्यानंतर मला मी जगातील सर्वात श्रीमंत माणुस वाटत होतो.मी कितीतरी दिवस ते तशेच जपुन ठेवले होते.घरी कोणी आल की मी माझ बक्षीस दाखवायचो.

त्यानंतर जसा मोठा होत गेलो तसा बर्‍याच वक्तृत्व स्पर्धेत भाग घेतला बर्‍याच वेळा बक्षीस मिळवली पण २५ पैश्याच्या बक्षीसात जी मजा होती ती कशालाच नाही.

आजही त्या पहिल्या बक्षीसाच मुल्य होऊच शकत नाही. :)

13 comments:

श्रिया said...

पहिले बक्षीस,:):):)सगळे पहिले वहिले खासच असते नाही?

सागर said...

Congr8s :)

हेरंब said...

सध्या घरात वक्तृत्व बंद झाल्याने तुला जुनं वक्तृत्व आठवलं ना रे योमुं?? ;) (हघे)

सुहास झेले said...

सही मला पण मिळाले होते स्केचपेनचा बॉक्स बक्षिस म्हणून..खरच त्याची सर कशालाच नाही

अनघा said...

अभिनंदन! :)

भानस said...

योमू, नाणं जपून ठेवल आहेस की खर्चून टाकलंस रे? :D
मला भाषण आवडलं. एकदम मोजकं आणि नेमकं... दोन शब्द. :)

Yogesh said...

नक्कीच श्रिया ताइ....ते आपण शब्दात नाही सांगु शकत.

Yogesh said...

साबा...आता अभिनंदन का करतो आहेस का रे? ;)

प्रतिक्रियेबद्दल आभार.

Yogesh said...

च्यायला....झाली का गोची तुला कस काय समजल रे???? अनुभवाचे बोल आहेत वाटत.

Yogesh said...

अनघा ताइ ठांकु....

Yogesh said...

सुहास अगदी बरोबर...पहिल्या बक्षीसाची सर कशालाच नाही.

Yogesh said...

श्री ताइ...काश ते नाण जपुन ठेवल असत..:)

आनंद पत्रे said...

सध्या घरात वक्तृत्व बंद झाल्याने तुला जुनं वक्तृत्व आठवलं ना रे योमुं?? ;) (हघे) +++++++++


माझा तरी अनुभवच आहे