मुस्कान...

मुस्कान....टपोरे डोळे...गोरी पान...चेहर्‍यावर अतिशय गोड हसु... अवघी ९ वर्षाची चिमुरडी.. अगदी बाहुली सारखी.. पाहिल्याबरोबर कोणीही प्रेमात पडेल इतकी गोड...परवाच्या दिवशी लिलावती हॉस्पीटलमध्ये भेटली.पोटाचा कॅन्सर झाल्यामुळे त्यावरील उपचार सध्या तिथे चालु आहे...अवघ्या काही महिन्यांची सोबती आहे.

सतत काही ना काही बडबडत असते. पुर्ण वॉर्डमध्ये सर्वांसोबत काही ना काही गप्पा चालु असतात.प्रत्येक नर्स, वॉर्ड बॉयला हुकुम सोडत असते.एका हाताला टोचलेल्या सुया तश्याच घेउन सगळीकडे फ़िरत असते. आपल्याला काही तरी असाध्य असा रोग झालाय याची तिळमात्रही कल्पना नसलेली...स्वतःच्या एक वेगळ्या अश्या विश्वात रमलेली...प्रत्येकाच्याच चेहर्‍यावर काही क्षण का होइना सर्व दुःख विसरायला लावुन "आनंद" देणारी ही मुस्कान.

आपण काही महिन्यांचेच सोबती आहोत याची तिला कल्पना सुद्धा नाही...जीवन म्हणजे काय अन मृत्यु म्हणजे काय??हे समजण्या्चही तिच वय नाही. अश्या वयातच तिच्या नशिबी हे भोग आले आहेत.तिची आइ हे सार दुःख पचवुन ही उभी आहे.कारण बाप नसलेल्या मुस्कान ला फ़क्त तिचाच काय तो आधार आहे.
परवाच्या रात्री तिला रक्ताच्या बॉटल अन इंजेक्शन देताना पाहिल अन मन अगदी सुन्न झाल.तिच्या छोटुकल्या हातांवर जेव्हा सुया टोचत होते तेव्हा मनाला असंख्य अश्या वेदना होत होत्या.मी नाही पाहु शकलो हे सार....तिथुन उठुन थेट बाहेर येउन बसलो ते असंख्य अशे प्रश्न घेउनच की ज्यांची उत्तर मला कधीच मिळणार नाहीत.


ती संपुर्ण रात्र मी खुर्चीवर बसुन काढली...चेहर्‍यावर समोर फ़क्त मुस्कानचाच चेहरा होता...सकाळी  तिच्या चेहर्‍यावर असणार गोड हसु उपचारादरम्यान अगदी कोमेजुन गेल होत.

तिला डेअरी मिल्क खुप आवडत म्हणुन दुसर्‍या दिवशी सकाळी कॅडबरी घेउन आलो. तिला जेव्हा ती कॅडबरी दिली तेव्हा ती इतकी आनंदी झाली की बस्स....एका छोट्याश्या कॅडबरीतही एवढा आनंद सामावलेला असतो हे मला तेव्हाच समजला.जगातला सर्वात मोठ सुख मिळाल्याचा आनंद होता तो....त्या एका क्षणाने मी अंतःर्मुख झालो.
तिच्या अगदी समोरच्याच बेडवर एक अंदाजे ८०-८५ वर्षांचे आजोबा अगदी जर्जर अवस्थेत पडले होते.प्रत्येक गोष्टीसाठी त्यांना दुसर्‍यावर अवलंबुन राहव लागत होत.होणार्‍या प्रत्येक वेदना त्यांच्या सहनशक्तीच्या पलीकडच्या होत्या.पडल्या जागीच ते हे सर्व सहन करत होते. समोरच त्यांच्या ह्या वेदना अन त्यांची ही अवस्था पाहणारा त्यांचा हतबल असा मुलगा होता.
हे किती विचित्र आहे ना. . . . जिला आयुष्याचा अर्थ पण समजला नाही किंवा अजुन आयुष्य जगल पण नाही अशी मुस्कान अजुन जगायला मिळाव म्हणुन मृत्युशी लढते आहे कदाचित यात लवकरच तिची हार होणार आहे न दुसरीकडे मनसोक् युष्य जगलेले आजोबा आहेत की ज्यांना आजाराच्या वेदना असह्य होऊन ते मृत्युची वाट पाहत आहेत पण तो काही येत नाही.
हे अस का असत???
खरच ह्या विश्वात देवाच अस्तित्व आहे का???
असेल तर तो असा न्याय का करतो???

13 comments:

mau said...

khup chhan lihile aahes re...khup waait vatate na baghun...devaachaa nyaay kahi wegalaach !!

Unknown said...

DEVACHA NAAAY KHARACH AAGLA!! VACHUN DOLYAT PANI ALE!! SUNDER LIHILE AAHE!!!!

हेरंब said...

:( :( :( :( :( :( :( :(

सागर said...

हे अस काही पाहिलं वाचाल ऐकल कि काय बोलाव काही समजत नाही.मी देवाकडे प्रार्थना करतो अश्या वेळी कारण माझ्या हातात तेवढच आहे :(

Prasad Kulkarni said...

देव इतका निष्ठुर असु शकतो...यावर विश्वास बसत नाही :-(

अपर्णा said...

asa wachala ki bharlyaa dolyanni comment lihina ashakya asta re......:( :( :(

सौरभ said...

:( she is living by her name... Muskan...

Yogesh said...

प्रतिक्रियेबद्दल सर्वांचे आभार.

Suhas Diwakar Zele said...

God Bless Her

THEPROPHET said...

:(
मित्रा,
देव कधीच न्याय करत नाही! अख्खं जग अन्यायावरच चालतं..

शांतीसुधा (Shantisudha) said...

योमुं असा विचार केला तर....प्रत्येक जीव जन्माला येताना आपापलं प्रारब्ध घेऊन आलेला असतो. मुस्कानचं प्रारब्ध काही महिन्यांचंच राहीलं असेल. त्यामुळे कदाचित तिचा आत्मा आनंदित असेलही. त्याला मुस्कानच्या जन्मातून मुक्ती मिळणार म्हणून. कदाचित कुणी थोडेसेच भोग राहीलेल्या जीवाने मुस्कानच्या रूपात जन्म घेतला असेल. म्हणून थोड्याच दिवसांचा सोबती.....नंतर मुक्ती.
पण हेच त्या ८० वर्षांच्या आजोबांच्या बाबतीत उलट असेल. त्यांचे भोग संपलेले नसतील. त्यांचं प्रारब्ध जेवढं असणार तेवढं ते जगणार. लहान मूल काय किंवा मोठं वयस्कर माणूस काय आपल्याला कोणाच्याच यातना सहन होत नाहीत. पण यातना कोणीच वाटून घेऊ शकत नाही. कारण कर्मही वाटून घेता येत नाही.......प्रारब्ध तर नाहीच नाही. फार तत्त्विक झालं वाटतं. श्रीराम॥

साळसूद पाचोळा said...

तो(देव) चागंला आणी वाईट नसतो... तो देव असतो.
त्यानेच घालुन्न दिलेले नियम तो कडेकोट पणे पाळतो एवढेच

मीनल said...

:(