सचिन तुस्सी ग्रेट हो!!!!




खूप दिवसाची सल होती आज अखेर ती पूर्ण झाली. सचिन तुला मानाचा मुज़रा!!!!

च्यायला हाफ़िसात असल्यामुळ आज तुझी खेळी पाहु शकलो नाही पण आता हायलाइट नक्की बघतो!!!

सईद अन्वरच रेकॉर्ड अखेरीस आज मोडलस नाही रे. . . तोडून, फोडून, मोडून काढल. . . नादभरी, नाद खुळा अन् गणपती पुळा. . . .चाबुक. . . .शब्द नाही आहेत आज वर्णन करायला.

फक्त एकच म्हनीन. . . .

झाले बहू . . . होतील बहू. . . पर या सम हाच!!!

6 comments:

आनंद पत्रे said...

आज भन्नाटच खेळला तो...विशीच्या पोरांना सुद्धा हेवा वाटावा असे खेळतो, म्हणजे केवळ बॅटिंगच नाही तर फिल्डींग देखिल... प्रथमच आज जवळपास पुर्ण ऑफिस कॅफेटेरिया मध्ये जमा झालं होतं, त्याच्या १८० पासुनच्या प्रत्येक धावेवर टाळ्यांचा कडकडाट होत होता.... मस्त मज्जा आली...

Pritesh Taral said...

सर्वात आनंद या गोष्टीचा होतोय की त्या पाकडयाच रिकॉर्ड तोडले

Anonymous said...

अनुमोदन, प्रितेशला.
ह्या वयात देखील ह्या मास्टरची रन्सची भूक शमलेली दिसत नाही..:)

Yogesh said...

@ आनंद खर आहे. . .भन्नाट खेळला आहे सचिन काल!!!

@ प्रितेश . . .तुझ्याशी १००% सहमत आहे.

@ सुहास. . .तू म्हणालास त्या प्रमाणे रन मशीन आहे मास्टर!!!

अपर्णा said...

झाले बहू . . . होतील बहू. . . पर या सम हाच...........+100000000000000000000000000000000000

संकेत आपटे said...

खरं आहे. आता सध्याच्या सामन्यात त्याला ५० वं शतक नोंदवण्याची संधी आहे. सचिन खेळतो म्हणून भारतात क्रिकेट बघितला जातो. सचिन ज्यादिवशी निवृत्त होईल त्यादिवसापासून देशातली अर्धी जनता क्रिकेट फॉलो करणं बंद करेल.