खरी कमाई!!!

2 दिवसांपुर्वी भानस यांच्या ब्लॉगवर "खरी कमाई" ही पोस्ट वाचली अन् त्यावरून ही पोस्ट लिहतोय.

गेले 2 महिने मी प्रोजेक्टसाठी कैरोला आहे, ताई पुण्यात अं आई बाबा दोघे पण गावी आहेत.
बाबांना गुरुवारी संध्याकाळी अचानक चक्कर आली, त्यामुळे आई ने लगेच घराशेजारील दवाखान्यात नेल. चेक अप केल्यानंतर लक्षात आल की त्यांचा बी.पी लो आहे व हृदयाचे ठोके पण कमी झालेत अन् त्यात त्यांना हृदयविकाराचा त्रास त्यामुळे त्वरीत मोठ्या हॉस्पीटल ला नेणं गरजेच होत. कारण हृदयविकाराचा झटका येण्याची पण शक्यता होती. त्यामुळे प्राथमिक उपचारानंतर ताई त्यांना चेक अप ला पुण्यात घेऊन आली.

शनीवारी पुण्यातील डॉ. हिरेमठ यांच्याकडे चेक अप केल्यावर त्यांनी त्वरीत ऐंजिओप्लास्टी करण्याचा सल्ला दिला.
यासाठी साधारण 2 .25 लाख खर्च होणार होता अन् थोडी रक्कम अगोदर भरावी लागणार होती. त्या क्षणी ताइने मला फोन करून कळवलं. आता माझ्यापुढे प्रश्न होता तो फक्त पैश्यांचा. शनिवार असल्यामुळे मला ट्रान्सफर पण करता येणार नव्हते.

मी विचारात होतो अन् मनात नकळत स्वांमी समर्थांचा जप करत होतो, तेवढ्यात सच्याचा मेसेज आला. (सच्या माझा एकदम जिवलग मित्रा आम्ही इंजिनिअरिंगचे पासूनचे मित्र.) " तू काळजी करू नकोस मी आहे."त्याच्या फक्त एका मेसेजाने मला खूप रिलीफ मिळाला.
त्यानंतर त्याने अवघ्या तासात 1,60,000 जमा केले. आमच्या सगळ्या ग्रुपने अगदी क्षणाचाही विचार न करता आप आपली खाती रिकामी केली.त्यात रोहिणी म्हणून माझ्या मैत्रीणीची मैत्रीण तिने पण मदत केली,की जिला फक्त 1 ते 2 वेळा भेटलो असेल.

या नंतरच्या भावना व्यक्त करण्यासाठी खर तर माझ्याकडे शब्दच नाहे आहेत. खर सांगायच तर या भावना शब्दात व्यक्तच होऊ शकत नाही.

पण फक्त एवढच नाही तर प्लास्टी होऊन डिस्चार्ज होइपर्यंत सगळेजण आई अन् ताई सोबत थांबले होते. या दरम्यान आई किंवा ताई यांना कधीच मी त्यांच्यासोबत नाही अस वाटल नाही इतका सारा आधार या सर्वांनी दिला.

मी यासाठी माझ्या मित्रांना धन्यवाद म्हणणार नाही किंवा हे उपकार आहेत अस पण म्हणणार नाही. मी म्हणेन ही फक्त मैत्री आहे अन् ही मैत्री आयुष्यभर अशीच असावी.

अन् सगळ्यात महत्वाच म्हणजे डॉ. हिरेमठ, बाबांचे ब्लॉकेज जास्त होते म्हणून ताई ला वाटत होत की आता बहुतेक बायपास करावी लागेल पण त्यांनी ऐंजिओप्लास्टी करा असा सल्ला दिला.
जेव्हा त्यांना समजल की भारताबाहेर आहे अन् ताई व आई शिवाय घरातील दुसर कोणी नाही तेव्हा त्यांनी आपुलकीने पैसे कसे जमा करणार, काही अडचण आहे का?? चौकशी केली.त्या क्षणी त्यांनी डॉक्टर म्हणून दिलेला आधार ताई व आई ला मानसिक बळ देऊन गेला

मला वाटत मी कधीही न पाहिलेले डॉ. हिरेमठ , 1-2 वेळाच भेटलेली रोहिणी किंवा आमच्या ग्रुपची मैत्री हीच खरी कमाई आहे!!!

9 comments:

साळसूद पाचोळा said...

समाजात चांगली मंडली असतात, ती आपल्या वारंवार भेटतही असतात, त्यांचं चांगुलपन टिकविन्याची/वाढविण्याची जबाबदारी आपली असते, आपल्या निरंतर मैत्रीची असते... आपल्या स्वभावाची असते... असेच अनेक मित्र आपनास आणि साऱ्यांस मिळोत , मग संकटे कितीही येवोत... त्याची तमा नाहिच..

आपला..

साळसुद पाचोळा.

Anonymous said...

पोस्ट वाचले आणि क्षणभर काय वाचलं याचा विचार करित राहिलो. पुन्हा एकदा संपुर्ण पोस्ट वाचले, आणि थरकाप उडाला..
इतक्या दुर असतांना स्वतःला काहीच करणं शक्य नाही, तेंव्हा मित्रांवरच अवलंबुन रहावं लागतं.आणि असे विश्वासु मित्र असायला पण भाग्य लागतं..
मी स्वतः पण या स्थितीतुन गेलो आहे.. म्हणुन समजु शकतो तुमची मनःस्थिती.. !!

Ajay Sonawane said...

जगात अजुनही माणुसकी जिवंत आहे याचं अजुन एक उदाहरण. तु इथे नसताना तुझ्या मित्रांनी जी मदत केली ती खरंच कौतुकास्पद.

-अजय

Unknown said...

जगात माणुसकी आहे अजून याची प्रचिती येते अशी!!!!!पण आपण दुर असताना आपल्या नातेवाईकांना काही झाले की येणारी हतबलता फार त्रास देते!!!

Yogesh said...

@ सचिन धन्यवाद...अगदी बरोबर असे मित्र असतील तर कसलीच तमा नाही.

Yogesh said...

@ महेंद्रजी, खर आहे असे मित्र लाभायला पण भाग्य लागत. मी तर स्वतःला खूप भाग्यवान समजतोय.

Yogesh said...

@ तन्वी @ अजय प्रतिक्रियेबद्दल आभार!!!

अपर्णा said...

मनमौजी आज अचानक या ब्लॉगवर आले आणि एकामागून एक पोस्ट वाचतेय..जमेल तिथे कॉमेन्ट करतेय...खरंच असे मित्र मिळणं भाग्याचं आणि आपण त्यांचे आभार न मानता त्यांना लक्षात ठेवणं जास्त महत्त्वाचं....

Yogesh said...

@ अपर्णा. . आपण त्यांचे आभार न मानता त्यांना लक्षात ठेवणं जास्त महत्त्वाचं....अगदी बरोबर आहे!!