खुप दिवसानंतर काल निवांत वेळ होता तेव्हा कधी नव्हे ते सकाळी पेपर वाचायला घेतला ( रोज तसा रात्रीच वाचतो )तर समजल की आज महिला दिन आहे।त्यावरील 2-3 लेख वाचले अन त्यानंतर दूध घ्यायला तसाच बाहेर पडलो।थोड़ा फिरण्याचा मूड आला म्हणुन तसाच फिरायला निघालो मी मनात महिला दिनाचा विचार करत होतो तोच एक महिला कचरा वेचताना दिसली तेव्हा मनात विचार आला खरच आपण महिला सबलिकरानाचा उदो उदो करतोय हा कितपत खरा आहे ?? पुरुषप्रधान संस्कृतीत महिलाना सामावून घेतले आहे???

जर तस असेल तर महिलांवर होणारे अत्याचार ,शोषण त्यांचे जाणारे बळी हे सार कश्याच प्रतिक आहे??आजच्या साबलिकरनाच्या युगात खरच आपली आई,बहिन,मुलगी जेव्हा कॉलेज ला किंवा जॉब ला जातात तेव्हा खरच त्या सुरक्षित असतात याचा आपल्याला पूर्ण विश्वास आहे???

बस मधून जाताना,बागेत फिरताना एवढच काय तर रस्त्यावरून चालताना सुद्धा महिला स्वतःला एका वाईट नजरेपासून बचाव करत असतात.अशे किती तरी प्रसंग आपल्यासमोर घडतात पण ते सार आपल्याला इतके सवयीचा झाल आहे की आपल्याला त्याकडे लक्ष द्यायला पण वेळ नाही।

आम्ही महिलना समान हक्क दिलाय म्हणजे नक्की काय केले आहे?? हा प्रश्न मला खुप वेळा पडतो.अन सगळ्यात महत्वाच म्हणजे अरे तुम्ही हक्क देणारे कोण??आज कोणतीही जाहिरात असो ती एका सुंदर स्त्री शिवाय पूर्ण होते का?? हाच समान हक्क??लाख रुपये कमावानारी आजची स्त्री घरी आल्यावर तिला घरची काम करावीच लागतात त्यातून त्याना कधी सुट्टी आहे का??या उलट पुरूष कामावरून घरी आला की त्याला फ़क्त आराम हवा असतो अन प्रत्येक गोष्ट मनासारखी हावी असते अन तस नसेल तर आरडाओरडा करायला साहेब रिकामे!!!! मग आता सांगा हा कसला समान हक्क???

जेव्हा कधी कुठे महिलेवर अत्याचार होतो तेव्हा आम्ही न्यायालय उभारतो ,पुरावे जमावतो पण शेवटी न्याय मिलतो की नाही हे आज पर्यंत मला तरी माहित नाही कारन फ़क्त अत्याचार झाल्याची बातमी असते २ -३ दिवस पेपर ला लेख येतात ,मोर्चे निघतात,अन आरोपी काही दिवसानी मुक्त होतात.पण तिच्या आयुष्याच काय?? आम्ही कधी विचारच करत नाही?? का काय गरज aahe ???

आज ही वेश्या वस्तीत किती तरी महिलना फसवून आनल जात त्यांच्यावर नको ते अत्याचार केले जातात की ज्यांची आपल्याला कल्पना पण नही??? जिथे आम्ही स्त्रीला लक्ष्मी,सरस्वती मानतो तितेच त्याच संस्कृतीत आम्ही तरुण महिलाना भर रस्त्यात,बागेत संस्कृति रक्षानाच्या नावाखाली मारतो ???

मग कास बदलेल हे सार ?? काय करायला हव??? मी खुप आशावादी आहे कधी तरी हे चित्र बदलेल याचा मला विश्वास आहे.मला वाटत प्रत्येकाने आपल्यापासून सुरुवात केलि तर नक्कीच हे सगल बदलेल गरज आहे ती फ़क्त इच्छाशक्ति ची।

1 comments:

संकेत आपटे said...

खरं आहे. अजूनही ग्रामीण भागांत लहान मुलींची लग्नं होतात; अजूनही मुलगी झाली तर तिला जीवे मारण्यात येतं. खरंच आपलं प्रबोधन झाल्याशिवाय ही परिस्थिती बदलणार नाही...